Monday, May 27, 2024
Homeआध्यात्मिक3 ऑक्टोंबर महाअष्टमीची संध्याकाळ.. लहान मुलांवरून ओवाळून ही एक वस्तू इथे टाका...

3 ऑक्टोंबर महाअष्टमीची संध्याकाळ.. लहान मुलांवरून ओवाळून ही एक वस्तू इथे टाका मुलांचे भाग्य चमकेल.!!

नमस्कार मित्रांनो आमच्या मराठमोळ्या पेज वर तुमचं स्वागत आहे.!! महाअष्टमी मुलांवरून ओवाळून (वारुन) ही एक वस्तू इथे टाका.. मुलांचे भाग्य चमकेल प्रगती होईल आणि कोणतेही संकट अडचणी दुःख मुलांवर येणार नाहीत. मुलं असतील किंवा मुली असतील कोणावरून ही तुम्ही वस्तू ओवाळू शकता मुले लहान असतील किंवा मोठे असतील काहीही फरक पडत नाही मुले म्हणजे मुले असतात त्या मुलांवरून तुम्ही ही एक वस्तू ओवाळून इथे टाका. हा उपाय पुरूषही करू शकतात किंवा स्त्रिया सुद्धा करू शकतात.

फक्त महाअष्टमी च्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या मुलांना.. किंवा मुलगी असेल तर सगळ्या जणांना तुम्ही घरातील देवघरासमोर बसवा. तसेच ज्या खोली तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या खोलीत एकत्र बसवा. जर तुम्ही हा उपाय करत असताना मुलांना देवघरासमोर बसवला तर त्यामध्ये दैवी शक्तीचा सुद्धा सहभाग असतो आणि ही वस्तू आपल्याला मुलांवरून उतरवायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे तर जी व्यक्ती मुलांवरून ओवाळून आहे.

त्या व्यक्तीने एक मूठ भरून कोणतही धान्य घ्यायचा आहे. आता धान्य कोणतही म्हणजे जर गहू ज्वारी बाजरी तांदूळ यापैकी कोणतेही धान्य तुमच्या घरा मध्ये उपलब्ध असेल ते धान्य तुम्ही एक मूठ भरून घेऊ शकता मुलांना एकत्र बसवायचे आहे. जर दोन तीन मुले असतील तर प्रथम एका वरून मग दुसऱ्या वरून मग तिसऱ्या वरून असे ओवाळायचे आहे. आणि ओवाळत असताना धान्य बदलायचे नाही एकदाच घेतलेल्या धान्य सगळ्या मुलांवरून उतरवायचे आहे.

हे धान्य उतरवत असताना आपल्याला आपला हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे. डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला गोलाकारात हात फिरवायचा आहे .ओवाळून घ्यायचे आहे. एका मुलावर दोन-तीन वेळेस तुम्ही हे धान्य उतरवून घ्या असे प्रत्येक मुलावरून उतरवून घेतल्यानंतर तुम्हालाही हे धान्य गाईला खाऊ घालायचे आहे. किंवा पक्ष्यांना खायला टाकायचे आहे तुमच्या घराजवळ कुठे घाई असेल तर त्या गाईला खायला घाला नसेल तर पक्षांना खायला घाला शहर भागात शक्यतो गाईला खायला घालायला मिळत नाही.

म्हणून हे धान्य पक्ष्यांना खायला टाका अशा रीतीने महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करा. मुलांवरील असलेली बाधा मुलांना लागलेली नजर आणि जे काही दोष असतील ते या उपायांमुळे निघून जाते तर हा उपाय नक्कीच करून पहा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular