Tuesday, March 5, 2024
Homeआध्यात्मिक90% लोक दिवाळीत या चुका करतात.. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होण्याऐवजी त्यांच्यावर...

90% लोक दिवाळीत या चुका करतात.. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होण्याऐवजी त्यांच्यावर नाराज होतात.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! काही दिवसांवर दिवाळी अगदी जवळ आली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बरेच जण जमेल तशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन तिची कृपा आपल्यावर बरसावी अशीच प्रत्येकाची ईच्छा असते. असं म्हणतात दिवाळीच्या 5 दिवसांत विशेषत धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करण्याचा प्रयत्न केल्यास घरात धन, धान्य, वैभव, लक्ष्मी यांची कमतरता कधीच भासत नाही. पण मित्रानो 90 टक्क्यांहून अधिक लोक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत नाहीच या उलट आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर निघून जाते. आपल्या घरातील धन, वैभव, सुख शांती, समाधान दुसऱ्याच्या घरी निघून जात. मित्रानो चुका काही मोठ्या नसतात पण त्यांचा प्रभाव खूप मोठा होतो. तर कोणत्या आहेत त्या 7 चुका त्या आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. व त्या कशाप्रकारे टाळाव्यात हे देखील पाहणार आहोत.

तर मित्रांनो लक्ष्मीपुजनाच्या दिवशी म्हणजेच धनत्रोयदशी या दिवशी तुम्ही ज्या लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीची पूजा करता आहात. ती मूर्ती किंवा ती तसवीर खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला हा फोटो मूर्ती कोणी गिफ्ट दिला असेल किंवा वास्तू शांती निमित्त कोणी दिला असेल किंवा कोणी एखाद्या तीर्थ क्षेत्री दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला घेऊन दिला असेल तर अशी मूर्ती किंवा फोटो चुकूनही लक्ष्मी पूजनामध्ये वापरू नये.

दुसऱ्याने घेऊन दिलेला फोटो किंवा मूर्ती आपण लक्ष्मी पूजनामध्ये वापरतो तेव्हा मनोभावे पूजा आपण करतो मात्र त्याचे फळ त्या समोरच्या व्यक्तीला मिळते. ज्या व्यक्तीने स्वतःच्या पैशाने ती मूर्ती अथवा फोटो तुम्हाला दिला आहे त्या व्यक्तीला या पूजेचे फळ मिळत. म्हणून मित्रानो लक्षात ठेवा मूर्ती किंवा फोटो हा स्वतःच्या धनाने खरेदी केलेला असावा. अनेकदा सत्कार झाला किंवा सन्मान म्हणून लक्ष्मीची मूर्ती भेट दिली जाते अशा मूर्तींची पूजा चुकूनही करू नका. तुम्ही स्वतः फोटो खरेदी करून त्याची मनोभावे पूजा करा, घरात कसलीच कमी पडणार नाही.

पूजेसाठी लागणारी संपूर्ण सामग्री..

मित्रानो पूजेसाठी तुम्ही जे काही साहित्य वापरता, हळदी कुंकू, धूप, अगरबत्ती इत्यादी. हि जी काही सामग्री आहे ती तुम्ही स्वतः जाऊन खरेदी करायला हवी. अनेकजण शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगतात कि येताना मला हे घेऊन या, ते घेऊन या. तुम्ही चाललाच आहात बाहेर तर आमच्यासाठी पण जरा पुजेसाठी साहित्य घेऊन या. मान्य आहे घरी सामान आणल्यावर तुम्ही त्यांना पैसे दिलेही असतील पण मित्रानो ज्याने ही सामग्री विकत घेतली आहे त्याच व्यक्तीस पूजेचे फळ प्राप्त होत असतं. म्हणून काळजी घ्या कि स्वतः जाऊन सामग्री खरेदी करायची आहे.

घरातील कोणतीही व्यक्ती सामग्री आणू शकते पण घरातील बाहेरील व्यक्तीकडे या बाबतीत मदत मागू नका. मित्रानो दिवाळी म्हणजे लखलखणाऱ्या दिव्यांचा सण. प्रत्येक जण आपले घर दिव्यांच्या उजेडाने उजळून जावे यासाठी प्रयत्न करत असतो. उंबऱ्यावर, रांगोळीच्या बाजूला, रांगोळीच्या मध्य भागी, तुळशीपाशी जिकडे जमेल तिकडे दिवे प्रजवलीत करून लावता. पण मित्रानो जेव्हा तुम्ही दिवे घेण्यासाठी बाजारात जाता तेव्हा तुमचे शेजारी पाजारी तुम्हाला बोलतील की आम्हाला सुद्धा बाजारातून येताना दिवे घेऊन या.

तर चुकूनही स्वतःच्या पैशातून इतरांना पणत्या, दिवे घेऊन देऊ नका. तुम्हाला घरी आल्यावर दिव्यांचे पैसे भेटतील सुद्धा पण तुमच्या पैशाने खरेदी केलेले दिवे जेव्हा दुसऱ्यांच्या घरी प्रजवलीत होतात तेव्हा तुमच्या जीवनातील तेज, प्रकाश, उज्वलता दुसऱ्यांच्या घरी निघून जाते. तेज, प्रकाश हा माता लक्ष्मीच्या धनाशी निगडित आहे. दिवाळीच्या निमित्ताने हि चूक करणे तुम्ही टाळा.

दिवाळी म्हटलं की भेटवस्तू उपहार आलेच तर अनेकजण दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देतात. भेटवस्तू द्यायला काहीच हरकत नाही पण चुकूनही सोने किंवा चांदीच्या वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ नका. मग ते सोने चांदीचे शिक्के असतील, दागिने असतील, ज्वेलरी असेल, भांडी असतील सोन्या चांदीच्या मुर्त्या असतील.

मित्रानों या पैकी कोणतीही वस्तू घराबाहेरील व्यक्तींना भेट म्हणून देऊ नये. हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार जर आपण दिवाळीच्या 5 दिवसांत सोने किंवा चांदीचे धातू दुसऱ्यांना भेटवस्तू म्हणून दिलात तर आपल्या घरात गरिबी, दारिद्र्य हळू हळू येऊ लागते. आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही.

या दिवाळ सणांमध्ये महिला मंडळ नविन भांडी वैगेरे सुद्धा विकत घेऊन येतात.. लक्षात घ्या भांडे कोणत्याही धातूचे असो. या  5 दिवसांत कोणालाही ते गिफ्ट म्हणून देऊ नका. असे केल्याने आपल्या घरातील सुख, समृद्धी कमी होते. घरात शांततामय वातावरण कधीच निर्माण होत नाही, परिणामी भांडण तंटे होऊन घरात अशांती पसरते.

त्यानंतर यामध्ये अत्तर असेल, परफ्यूम्स असतील. या वस्तूंना श्रीमंतांची ओळख म्हणून मानले जाते. जर तुम्ही अशा सुगंधित वस्तू दुसऱ्यांना भेट म्हणून देत असाल तर घरातील भौतिक सुख निघून जात. घरामध्ये सुखाची कमतरता भासते. तर मित्रांनो या काही छोट्या छोट्या चुका करणे टाळा. आपल्या सर्वांच्या जीवनात माता लक्ष्मींची असीम कृपा बरसत राहोत या मनोकामनेसह सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. धन्यवाद.!!

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular