नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, लैंगिक विषयावर फारस बोललं जात नाही..परंतु आज आपण या विषयावर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वयाच बंधन असतं का से क्स करण्याला ..? चला तर जाणून घेऊयात.
से क्स कधी करावा? से क्स कोणत्या वयात करावा? कोणासोबत करावा? से क्स करण्यासाठी वयाचं बंधन असतं का? तो साठीनंतर करावा का? असे एक ना अनेक प्रश्न. अनेकांच्या मनात. पौगंडावस्थेतील मुलगा, मुलगी असो, तरुण-तरुणी असो अथावा चाळीशीच्या उंभरठ्यावर असलेली मंडळी किंवा वयाची साठी पार केलेले लोक असोत.
से क्स अर्थातच शरीरसंबंध ही अनेकांच्या मनातली, परस्परातील संवादातील एक मुलभूत प्रक्रिया. केवळ चित्रपट, जाहीराती अथवा साहित्यच नव्हे तर प्राचिन काळातील पूरातन संस्कृतीपासून ते आजवरच्या समाजव्यवस्थेपर्यंत प्रत्येकालाच सेक्स बाबत कुतूहल वाटत आले आहे. वयाच्या साठीनंतर सेक्स करावा का? याबाबतही असेच अनेकांना कुतुहल. पाहा काय सांगतात तज्ज्ञ?
मित्रांनो, सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की, जेष्ठत्व वाढल्यानंतर लोक से क्स करत नाही, असे सर्वसाधारण म्हटले जाते. मनोरंजन, सौदर्यप्रसाधनांच्या जाहीराती आणि इतर गोष्टींमध्ये अनेकदा तरुण-तरुणी आणि सौंदर्याचे प्रतिनिधीत्व करणारे निरोगी मॉडेल्सच वापरण्याला प्राधान्य दिले जाते. या कक्षेत क्वचीतच एखादा घटक अंतर्भूत असतो.
त्यामुळे अनेकदा नकारात्मक परिणाम जाणवतो. अनेकांच्या मनात न्यूनगंड प्रामुख्याने जे लौकिक अर्थाने सुंदर दिसत नाहीत किंवा अधिक वयाचे असतात त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होतो की, आपण से क्स च करु नये. परंतू, वास्तवात तसे काहीच नाही. सर्व वयोगटातील लोक से क्स करु शकतात. हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा आणि सहमतीचा मुद्दा.
दरम्यान, जुलै 2020 मध्ये एका कंपनीने जवळपास 17 देशांतील जीवनशैलीबाबत सर्व्हेक्षण केले. यात सुमारे 14,500 नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. यात 36% नागरिकांनी वाढत्या वयासोबत लैं गि क इ च्छा कमी होते असे सांगितले.
वयाच्या साठीनंतर से क्स करावा का? – असे असले तरी लैं गि क तज्ज्ञ सांगतात की, सेक्स करण्यासाठी वयाचे बंधन नसते. जोपर्यंत तुम्ही शारीरिक आणि मानसिक रित्या तंदुरुस्त आहात तोपर्यंत तुम्ही से क्स करु शकता. हो, अगदी वयाच्या 60 वर्षानंतरही. से क्स आणि तारुण्य याचा काहीच संबंध नाही. अर्थात तुमच्या हालचालींवर काही मर्यादा नक्की येऊ शकतात.
आपली शारीरिक तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी नेहमी व्यायाम करत राहा. अनेकदा दैनंदिन व्यग्रसतेमुळे नियमीत व्यायाम करणे शक्य होत नाही. परंतू, अशा वेळी किमान दररोज वार्मअप तरी करत राहा. ज्यामुळे तुमचे शरीर आणि मनही प्रसन्न राहिल. से क्स हा सुद्धा विशिष्ट मर्यादेत एक प्रकारचा व्यायामच आहे. से क्स केल्याने रक्ताभीसरण सुधारते, हृदयाची कार्यक्षमता वाढते. स्वाशोच्छवासही वाढतो, असे तज्ज्ञ सांगतात.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!