Monday, May 27, 2024
Homeआध्यात्मिकआज दिप पूजनात एक गोमती चक्र घरी आणा.. गोमती चक्रामुळे भाग्य उजळेल...

आज दिप पूजनात एक गोमती चक्र घरी आणा.. गोमती चक्रामुळे भाग्य उजळेल माता महालक्ष्मी होईल प्रसन्न‌.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! दीपावली म्हणजे दिव्यांची आरास. दीपावलीच्या सणांमध्ये आपण प्रत्येक जण आनंदी असतो. दीपावली हा सण प्रत्येक धर्मातील लोक साजरा करत असतात. जाती धर्म पंथ यामध्ये एकता निर्माण करण्यासाठी या सणाचे महत्त्व आहे. या दिवाळीच्या अनेक अख्यायिका आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले आहे, जेव्हा श्री राम वनवास संपून जेव्हा अयोध्यामध्ये परतले होते तेव्हा मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करण्यात आली होती तसेच अंधकार मिटवून विजयाचा प्रकाश सगळीकडे पसरवण्याच्या हेतूने देखील दिवाळी साजरी केली जाते. आपल्या आजूबाजूला ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत.

त्या नकारात्मकतेवर विजय मिळवणे तसेच सकारात्मकता निर्माण करणे याचा अर्थ देखील दिवाळी असतो आणि म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रांमध्ये दिवाळीला एक विशेष महत्त्व आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरी करत असतात. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला महत्त्व असते यामधील लक्ष्मीपूजन आणि दिवाळी हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की, आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी विराजमान व्हावी.

माता महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सगळ्या अडचणी लवकरच दूर व्हायला हव्यात तसेच माता महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद आपल्यावर असायला हवा म्हणून आपण महालक्ष्मी व दिवाळीच्या दिवशी घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू आणत असतो. आजच्या लेखांमध्ये अशीच एक महत्त्वाची वस्तू तुम्हाला सांगणार आहोत, ही वस्तू वास्तुशास्त्रामध्ये आणि अध्यात्म शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानली गेलेली आहे. या वस्तूच्या मदतीने तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करेल.

धर्मशास्त्रांमध्ये आणि वास्तुशास्त्रांमध्ये सांगितले गेलेले काही उपाय जर तुम्ही दिवाळीच्या दिवसांमध्ये केले तर तुमच्या जीवनामध्ये खूप सारे सकारात्मक बदल घडवून येणार आहे आणि हे सारे उपाय करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे तंत्र मंत्र वापरायचे नाही. अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने देखील तुम्ही पूजा अर्चना करून माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सहज प्राप्त करू शकता.

दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण हे उपाय यांचा वापर केल्याने आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा संपूर्ण नष्ट होऊन जाणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव आणणार आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेक जण दिवे प्रज्वलित करत असतात परंतु दीप प्रज्वलित करत असताना बहुतेक वेळा आपण योग्य दिशेला दिवे लावत नाही आणि यामुळे आपल्याला सुख शांती मिळत नाही.

दिवे ही नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेला प्रज्वलित करायला हवे. उत्तर दिशेने पूर्व दिशाही माता महालक्ष्मीची आणि कुबेराची मानली जाते आणि अशावेळी जर आपण दिव्याचे तोंड पूर्वेला केल्याने आपल्या घरामध्ये सुप्रशांती वैभव नांदू लागते. दिव्याचे तोंड कधीही दक्षिण दिशेला लावू नये कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते.

दिवा प्रज्वलीत करत असताना सर्वप्रथम आपल्याला दिवा हा देव्हाऱ्यामध्ये लावायचा आहे. ज्या ठिकाणी माता महालक्ष्मी चा फोटो आहे तिथे लावायचा आहे त्यानंतर तुळशीच्या वृंदावन समोर आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच मुख्य दरवाजाजवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, असे केल्याने आपल्या घरामध्ये शुभ संकेत येवू लागतात. येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही गोमती चक्र घरामध्ये अवश्य आणा.

गोमती चक्राची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. या चक्राची पूजा केल्याने माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यानंतर हे गोमतीच्या प्रतिमा चांदीच्या चैन मध्ये परिधान करायचे आहे, असे केल्याने तुमच्या जीवनात माता महालक्ष्मीचा सहवास राहील. तुमच्या जीवनामध्ये नेहमी पैसा येत राहील आणि कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला भविष्यात निर्माण होणार नाही.

दिवाळीच्या दिवसात जर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढायची असेल तर आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि हा खडा घराच्या पूर्ण कोपऱ्यामधून फिरवायचा आहे त्यानंतर ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात अशा चौकाजवळ आपल्याला हा खडा उत्तर दिशेला तोंड करून वर फेकायचा आहे आणि मागे न बघता घरात यायचा आहे परंतु हा उपाय करताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे दिवाळीच्या दिवसात आपण लहानसहान उपाय केले तर तुमच्या घरात कधीच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. माता महालक्ष्मीचा प्रवेश तुमच्या घरामध्ये सहजच होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथे सादर केलेला लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहे. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular