Friday, December 8, 2023
Homeआध्यात्मिकआज जन्माष्टमीच्या पावन दिवशी या 5 वस्तु श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करा.. नकारात्मकता...

आज जन्माष्टमीच्या पावन दिवशी या 5 वस्तु श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करा.. नकारात्मकता दूर होईल.. भरभराटी लाभेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी ही भगवान श्रीकृष्ण भगवानांची जयंती म्हणून साजरी केली जाते. यंदा अष्टमी तिथी 18 ऑगस्ट रोजी रात्री 09:20 वाजता सुरू होईल आणि 19 रोजी रात्री 10:59 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता, त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.

जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करताना भगवान श्रीकृष्णाला त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्यास विशेष आशीर्वाद मिळतो. त्यामुळे जाणून घेवूया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी, ज्यांचा जन्माष्टमीच्या पूजेत समावेश केला पाहिजे. मित्रांनो कृष्णाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास, महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. या दिवशी प्रत्येकाला विविध पूजा विधी करून भगवान श्री कृष्णाचा आनंद मिळवायचा असतो.

मित्रांनो हिंदू धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व सांगितले जाते. या दिवशी लोक आपल्या जीवनात श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पूजा करतात. तसेच अनेक लोक या दिवशी उपवास करतात. या दिवशी रात्री पूजा केली जाते. दही आणि साखरेची मिठाई भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे. श्रीकृष्ण बालपणी दही आणि साखरेची मिठाई चोरत होते असे ग्रंथांमध्ये सांगितले आहे.

म्हणून जन्माष्टमीच्या पूजेमध्ये भगवान श्रीकृष्णाला दही, लोणी आणि साखरेचा प्रसाद अर्पण करा आणि त्याचबरोबर मित्रांनो भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे आणि त्यांच्या मुकुटात नेहमी मोरपंख असतं. असेही मानले जाते की, मोरपंख नकारात्मकता दूर करतात आणि ते घरात ठेवणे खूप लाभदायी आहे. आणि मित्रांनो धण्याचा प्रसाद जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये धण्याचा प्रसाद अवश्य समाविष्ट करा.

कारण मित्रांनो भगवान श्रीकृष्णाला हा प्रसाद खूप प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णाला धणे अर्पण केल्याने कधीही धनाची कमतरता भासत नाही. आणि मित्रांनो भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बासरीसह सर्वत्र दिसतात आणि बासरी ही त्यांची सर्वात आवडती वस्तू आहे. मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या पूजेत बासरी ठेवल्याने भगवान श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद मिळतो.

मित्रांनो पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण बालपणापासून गोमातेची सेवा करत आणि त्यांना गोमातेची विशेष ओढ होती. त्यामुळे जन्माष्टमीच्या पूजेमध्ये गोमातेची मूर्ती ठेवा किंवा गाईला प्रसाद द्यावा. आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशीच्या पूजेमध्ये पंचामृत अवश्य अर्पण करा. आणि भोगामध्ये तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करा. मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने नवीन वस्त्रे परिधान करावीत.

या दिवशी पूजेत नेहमी स्वच्छ भांडी वापरावीत. या भांड्यांमध्ये मांसाहारी अन्न कधी ही शिजले जाणार नाही याची विशेष काळजी घ्या आणि मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला लाल ओढणीने झाकून तुपाचा दिवा लावावा. या दिवशी रात्री फक्त पूजा करावी. आणि या दिवशी कोणाला दुःखी करू नका किंवा कुणाशीही गैरवर्तन करू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular