Monday, May 27, 2024
Homeआध्यात्मिकआज कार्तिकी एकादशी.. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू बोला हा एक...

आज कार्तिकी एकादशी.. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू बोला हा एक श्लोक.. चंद्रभागेत स्नान केल्याचं मिळेल पुण्य.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो 4 ऑक्टोबर 2022 शुक्रवार चा दिवस आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी. तर मित्रांनो वर्षभरामधे जेवढ्या काही एकादशी येतात त्या सर्व एकादशींमध्ये कार्तिकी एकादशीला विशेष अस महत्व प्राप्त झालेलं आहे. या कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी असे देखील म्हटले जाते. कारण याच दिवसापासून श्री विष्णू हे योग निद्रेतून उठतात.

या दिवसापासून 4 महिन्यांपर्यंत श्री विष्णू हे निद्रित अवस्थेतून जागे राहत असतात आणि देवउठनी एकादशीला श्री विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते. मित्रानो या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला सुद्धा वारी करतात.

एकादशीच्या दिवशी श्री विष्णूच्या विठ्ठल रूपाचं दर्शन घेतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात. मित्रानो या दिवशी नदी मध्ये स्नान करणे देखील खूप पुण्याचं काम समजलं जात. या दिवशी जर आपण चंद्रभागेमध्ये स्नान केले तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते.

नदीत स्नान केल्याने आपल्याला जे पुण्य मिळणार आहे तेच पुण्य आपण घरच्या घरी कस मिळवू शकतो यासाठी काही उपाय आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत.

मित्रानो आंघोळीच्या पाण्यामधे फक्त हि एक वस्तू टाका ज्यामुळे तुम्हाला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे नक्कीच प्राप्त होईल. तर आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की काय टाकायचं आहे हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात कोणती आहे ती वस्तू.

तर या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला जी वस्तू टाकायची आहे ती वस्तू म्हणजे गंगाजल आहे. पूजा साहित्याच्या कोणत्याही दुकानांमध्ये तुम्हाला हे गंगाजल अगदी सहजच मिळेल. तर या गंगाजलाचेच काही थेंब आपल्याला आंघोळीच्या आपल्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्यांनतर या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे.

मित्रानो आंघोळ करताना आपल्याला एक श्लोक देखील म्हणावा लागणार आहे. तो श्लोक म्हणजे ” गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती । नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु ” तर मित्रानो या नद्यांच्या नावाचं आपल्याला आंघोळ करताना सतत उच्चारण करायचं आहे.

यामुळे चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल. या कार्तिकी एकादशीला चंद्र भागेच्या स्नानाच पुण्य प्राप्त करण्यासाठी हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular