Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकआपले पाय फक्त जमिनीवर असू द्या.. स्वामी समर्थ महाराज सर्व ठिक करतील.!!...

आपले पाय फक्त जमिनीवर असू द्या.. स्वामी समर्थ महाराज सर्व ठिक करतील.!! श्री स्वामी समर्थ..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मनुष्याची एक सवय असते जर त्याला जरासे यश जरी मिळाले तर तो लगेचच हुरळून जात असतो. ज्यांच्या कडे त्याच्यापेक्षा कमी धन आहे का जे त्याच्या तुलनेत जरा मागे आहेत त्यांना तो कमी लेखायला लागतो. इतरांना कस्पटासमान समजतो, त्यांची चेष्टा मस्करी करतो, अशाप्रकारे थोड्याश्या यशाने मनुष्य हवेत उडायला लागतो. प्रत्येकाची अपेक्षा असते आपण खूप प्रगती करावी, यशाची उंचच उंच शिखरे गाठवित, आभाळालाही स्पर्श करावा..

परंतु मित्रांनो आपण आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवावेत. यश पदरात पडल्यावर आपण कितीही मोठे झालो, कितीही मोठे यश मिळाले तरीही आपले जुने दिवस विसरून जाऊ नये. आपली पूर्वस्थिती विसरू नये. कारण आपण जमिनीपासूनच वर आलेलो आहोत याचे नेहमी भान आपण ठेवावे. कुणाची बरी वाईट, आर्थिक स्थिती, रंगरूप, शारीरिक रंग अथवा राहणीमानाची, खाण्यापिण्याची किंवा त्यांच्या गरिबीची मुलाबाळांची अथवा ते वापरत असलेल्या साध्यासुध्या कपड्यांचे चुकूनही चेष्टा करू नये.

त्यांना कधीही हिन लेखू नये. प्रत्येकजण आपल्या आपल्या पूर्वजन्माच्या पाप पुण्याच्या प्रारब्धानुसार बरे वाईट जीवन जगत असतो. आपल्याहून हुशार, दिसायला देखणे, बुद्धिमान, श्रीमंत, नीतिमान, कर्तव्यतत्पर तसेच सुख समृद्धीत लोळत असलेले अनेकजण असू शकतात. त्याच्या उलट अनेक प्रकारे दुःखी जीवन हे अनेकांच्या वाट्याला आलेले असते. पूर्व कर्मानुसार ते आपले जीवन जगत असतात. अंधारा मागून दिवस व दिवसानंतर रात्र हा निसर्गाचा नियम आहे. त्याचे उल्लंघन करू नका.

कर्मगती देवादिकांना सहज कुणालाही चुकलेली नाही. एखाद्या खेळात अथवा कलेत, संगीतात प्राविण्य मिळाले एखादा पुरस्कार अथवा सर्टिफिकेट मिळाले चार लोकात वाह वाह सुरू झाली, नोकरीत योग्यता नसताना वरची पोस्ट मिळाली की, अनेक जण हवेत तरंगू लागतात. आज जे गर्व करतात, उन्मत्तपणाने अथवा गुर्मीने वागतात, बोलतात. इतरांशी कृतज्ञतेची जाण ठेवत नाहीत त्यांनी आपल्या पुढे काय होणार आहे याचा अंदाज घ्यावा.

तुम्ही पन्नास पन्नास साठ साठ लाखाच्या गाडीने फिरत असाल, पण तुमच्या पडत्या काळात साथ दिलेल्या सायकलला विसरू नका. जेव्हाही पहिल्यांदाच नोकरीवर जाताना पाया पडून आ शि र्वा द घेतलेल्या व्यक्तींचा तरी मान ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारे उत्तुंग शिखरावर जाल पण त्यांचा अ’पमान झाल्यास त्यांच्या शापाने रसातळाला जायला जरा सुद्धा वेळ लागणार नाही हे कायम लक्षात ठेवा. एखादी मुंगी चावली तर कळा येतात. पण त्या मुंगीचे नांगी आपण पकडू शकत नाही.

त्यामुळे कधीही कुणाला कमी लेखू नका. प्र त्ये क जण आपापल्या परीने श्रेष्ठ असतो पण सर्वज्ञही नसतो हे विसरु नका. मुले आपल्या नोकरीवर असलेले आई-बाबा इतरांना कस्पटासमान लेखतात. तुमच्या मुलांचे अजुन कशात काही नाही मुले काय करतात असे ते टोचून विचारतात. पण आपले हायफाय मुले अथवा मुली बाहेर काय गुण उधळतात हे सांगत नाहीत. पुढील जन्मात त्याचे फळ त्यांना भोगावे लागते. मुले हुशार असूनही आर्थिक दुर्बलतेमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत हे ते विसरतात.

पूर्वीच्या काळातील मोठमोठे संस्थाने, जमीनदार, राजे राजवाडे यांच्यापुढील पिढीची आजची स्थिती कशी आहे ते पहा. कलियुगात जे कराल ते याच जन्मामध्ये भोगावे लागणार आहे, पापे जरी वाढतील.. म्हणजे चांगले कराल त्याचे फळही त्वरित मिळेल. असे सुदामा मित्र श्री कृष्णांनी सांगितलेले आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular