स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो आज देवशयनी आषाढी एकादशी आहे. असे मानले जाते भगवान श्री हरी विष्णू पुढील चार महिने निद्रीस्त होतात. आणि चार महिन्याच्या नंतर कार्तिक एकादशीस पुन्हा योग निद्रेतून जागे होतात. भगवान श्री हरी विष्णू याना प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात चांगला दिवस म्हणजे आषाढी एकादशी होय.
पंढरपूर ला जाऊन आपण विठ्ठल माऊलीची पूजा करतो तेच माऊली भगवान श्री हरी विष्णूचे एक रूप आहे. आणि मित्रांनो भगवान श्री हरी विष्णू याना प्रिय असलेल्या वस्तूची आपण पूजा या दिवशी केल्यास त्याचे लाभ आपल्याला नक्की मिळतात. आज आपण असाच एक छोटासा उपाय पहाणार आहोत ज्यामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न होतील.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या छोट्याशा उपायांमुळे आपल्या जीवनातील जे काही असंख्य अडचणी आहेत त्यापासून दूर होण्यास मदत होईल. मित्रांनो आज आपण एक छोटासा तुळशीचा छोटासा उपाय पहाणार आहोत. प्रत्येकाच्या घरात किंवा घरासमोर तुळस असते.
ज्या घरात तुळशीची रोज पूजा होते अशा घरात वाईट गोष्टींचा प्रभाव कमी होतो असतो. अशा घरात आर्थिक समस्या कधीच शक्यतो जाणवत नसतात. रोज घरातील पूजा झल्यावर आपल्या घरातील तुळशीला जल नक्की अर्पण करावे.
आषाढी एकादशी च्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा अवश्य करायची आहे शिवाय त्याच दिवशी संध्यकाळच्या वेळी एक मंत्र जपा आपल्याल करायचा आहे. “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ” हा मंत्र जप करण्या आधी स्वच्छ हात पाय धून घेणे. कमी कमी एकशे आठ वेळा आपल्या हा मंत्र जप करायचा आहे. त्याच बरोबर तुळशी समोर एक तुपाचा दिवा अवश्य लावा.
एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा दिव्याच्या खाली आसन ठेवायला विसरू नका. आसन कोणत्याही प्रकारचे असेल तरी चालेल, जसे कि थोडेशे तांदूळ घेऊन त्यावर दिवा ठेवा, एखाद्या छोट्याशा डिश मध्ये दिवा ठेवला तरी चालेल. त्याच सोबत तुपाचा दिवा लावताना त्यात थोडे हळद टाकायला विसरू नका. कारण त्या दिव्याचे शुद्धी करण नक्की होईल.
देवशयनी आषाढी एकादशी हा दिवस भगवान श्री हरी विष्णू यांचा आहे त्यामुळे संपूर्ण दिवस भर भगवान श्री हरी विष्णू यांचे नामस्मरण नक्की करावे. श्री हरी विष्णूला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात जसे कि पिवळ्या रंगाची फुले, तुशीची पाने, आणि खीर अर्पण अवश्य करावी.
त्याच सोबत श्री विठ्ठलाची सुद्धा पूजा आणि नामस्मरण करावे. “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ” या मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर शक्य असेल तर तुळशीला अकरा प्रदक्षणा घालाव्यात जर का शक्य नसेल तर स्वतः भवती प्रदक्षणा घातल्या तरी चालेल.
त्याच सोबत या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्या वरती तोरण बांधावे अंब्याच्या पानाचे असेल तर खुपच चांगले. त्याच सोबत एका वाटीत हळद घेऊन त्यात थोडे गंगा जल मिक्स करून त्या पासून दरवाज्यावरी स्वस्तिक काढावे. ज्यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी येत राहील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!