Thursday, December 7, 2023
Homeआरोग्यआयुर्वेदात ताकाची तुलना अमृताशी केली जाते.. जाणून घ्या.. पोषक तत्वांनी भरपूर असलेलं.....

आयुर्वेदात ताकाची तुलना अमृताशी केली जाते.. जाणून घ्या.. पोषक तत्वांनी भरपूर असलेलं.. ताक पिण्याचे 10 आरोग्यदायी लाभ.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपल्या भारतीय आयुर्वेद शास्त्रानुसार ताक हे अमृतासमान मानले जाते. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रो ग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते.

महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.

ताकात विटामिन ” B 12 ”, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात.

ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज 90 % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.

ताक पिण्याचे हे 10 प्रकारचे फायदे जाणून घेऊयात..

1) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

2) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

3) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

4) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.

5) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

6) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

7) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

8) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2…3 वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.

10) महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular