Thursday, June 13, 2024
Homeराशी भविष्यअनेक वर्षांनंतर जुळून आलाय हा दुर्मिळ असा राजयोग, या 4 राशींना अचानक...

अनेक वर्षांनंतर जुळून आलाय हा दुर्मिळ असा राजयोग, या 4 राशींना अचानक मिळणार लखोंची माया.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीवरून व्यक्तीचे भाग्य कळते. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीचे नववे घर नशिबाची माहिती देते. कुंडलीचे नववे घर धर्म आणि कर्म बद्दल देखील सांगते. तसेच त्याच्या चांगुलपणामुळे माणूस आयुष्यात खूप प्रगती करतो. नवव्या घराचा स्वामी कुंडलीत राजयोग निर्माण करतो. नवव्या घरातून जाणून घ्या कुंडलीत राजयोग कसा तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह कोणत्याही राशीत परिवर्तन करतो किंवा अन्य ग्रहांसह युती बनावतो त्यावेळी मानवी जीवनावर म्हणजेच सर्व राशींवर कमी अधिक प्रमाणात फरक पडतो. काहींसाठी ग्रहांचे परिवर्तन शुभ मानले जाते तर काहींसाठी यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यावेळी 24 सप्टेंबरला शुक्र ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. कन्या रास ही दुर्बळ रास मानली जाते मात्र यावेळेस शुक्रासह गुरु व शनीसुद्धा स्वराशीत विराजमान असल्याने त्रिग्रही नीचभंग राजयोग बनत आहे. विशेष म्हणजे ग्रहांची ही स्थिती तब्बल 59 वर्षांनी जुळून आली आहे.

ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार बुध ग्रहसुद्धा उच्च स्थानी असून सूर्यासह युती बनवत आहे, यामुळे सर्वच राशी प्रभावित होणार असून अशा 4 राशी आहेत ज्यांना विशेष धनलाभ व प्रगतीचे योग आहेत. या राशी कोणत्या व त्यांना कसा फायदा होऊ शकतो पाहुयात..

वृषभ रास- त्रिग्रही नीचभंग राजयोग वृषभ राशीसाठी लाभदायी ठरण्याची चिन्हे आहेत. वृषभ राशीचा स्वामी शुक्र नीचभंग राजयोगातील प्रमुख ग्रह असणार आहे. तसेच या राशीत गुरु गोचरही झाले आहे. शनिदेव भाग्यकारी स्थानावर आहे व परिणामी धनलाभाची मोठी संधी आहे. केंद्रीय त्रिकोण राजयोग व समसप्तक योगामुळे अचानक व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात विशेष फायद्याची चिन्हे आहेत. वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी उत्तम योग आहे.

मिथुन रास – त्रिग्रही नीचभंग राजयोग आपल्यासाठी शुभवार्ता घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास अधिक लाभ होऊ शकतो तर नोकरदारांना सुद्धा टार्गेट पूर्ण करण्यात गती मिळेल. गुंतवणुकीसाठी आताच काळ सर्वात शुभ असू शकतो. तुमची बरेच दिवस अडकलेली कामे मार्गी लागतील असे संकेत आहेत.

सिंह रास – त्रिग्रही नीचभंग राजयोग आपल्यासाठी करिअर व व्यापारात वृद्धी होण्याचे संकेत आहेत. सिंह राशीचा स्वामी सूर्य बुधादित्य राजयोगात केंद्रस्थानी आहे. सिंह राशीत शुक्र गोचर करून नीचभंग राजयोग तयार झालेला आहे.तुम्हाला नव्या व्यवसायात पदार्पण करायचे असल्यास आता शुभ काळ ठरू शकतो तसेच नोकरी बदलण्यासाठीही हा काळ फायदेशीर असू शकतो. नोकरीत प्रगती होण्याची व पगारवाढीची चिन्हे आहेत.

वृश्चिक रास – त्रिग्रही नीचभंग राजयोग वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी धनलाभासह मानसिक आनंदही घेऊन येऊ शकतो. तुमच्या उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुक होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवे ग्राहक तुम्हाला जोडले जातील व बराच काळ अडकलेला पैसा पुन्हा मिळण्याची ही संधी आहे. अचानक व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular