Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकउपासनेनंतर स्वामींना बोला हा एक शब्द.. बाधा अडचणी दूर होतील मनोकामना पूर्ण...

उपासनेनंतर स्वामींना बोला हा एक शब्द.. बाधा अडचणी दूर होतील मनोकामना पूर्ण होतील.!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो आपलं आयुष्य सुखी व्हावं ही रास्त इच्छा घेऊन इथे प्रत्येक जण जगतोय, आपल्या सर्व अडचणी, बाधा दूर व्हाव्यात, जीवनाकडून ज्या इच्छा आपण बाळगून आहोत त्या सर्वच लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशी आपली मनोकामना असते. आपली नोकरी तथा व्यवसाय यात आपण हवं ते यश मिळवावं एकंदर सर्व गोष्टी मनासारख्या घडाव्या, जर डोक्यावर क-र्ज असेल तर ते लवकर फिटून जावं अशा माफक अपेक्षा घेऊन आपण दिवस काढत असतो. अनेक इच्छा आपल्या मनामध्ये घर करूनअसतात.

त्या पूर्ण होण्यासाठी आपण अनेक देवी देवांना पुढे वेगवेगळे नवस बोलतो. एखादं साकडं देखील घालतो. दा-न-धर्म करण्याचं कबूल करतो. अशातच जर अनेक उपास तापास करुन सुद्धा काही मनासारखं फळ मिळत नाही. परंतु मित्रांनो, एक असा शब्द आहे की जो आपण स्वामींच्या कडे बोलल्यास आपल्या सर्व अडचणी क्षणात दूर होत असतात. आणि आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी देखील मदत होते.

तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात तो कोणता शब्द आहे, ज्यामुळे स्वामी समर्थ महाराजांना आपल्या इच्छा तात्काळ पूर्ण कराव्या लागतात. ते आपल्याला अनेक आशीर्वाद देतात आणि आपली सर्व रखडलेली कामंही तात्काळ मार्गी लागतात, आ-र्थिक, अडचणी दूर होऊन धनाची बरसात होते. 

मित्रांनो शब्द म्हणजे असा वेगळा असा शब्द नाहीए फक्त आपण इतरवेळी बोलतांना सर्व शब्द बोलतो. पण महाराजांपुढे हा एकच शब्द आपण बोलायचं विसरुन जातो. बहुतांश लोकांना तर हा शब्द माहितीही नाही.

मित्रांनो तो शब्द आहे ‘धन्यवाद..!!‘. मित्रांनो, तुम्हाला असे वाटेल की असं कुणी देवी देवतांना धन्यवाद देत असता का.?? पण मित्रांनो या शब्दाची व्याप्ती काय आहे, महत्त्व काय आहे आणि हा शब्द कधी म्हणायला हवा..?? तो बोलण्याची विशिष्ट वेळ ती कोणती आणि बोलतानाची स्थिती कशी असावी हे आज आपण जाणून घेऊयात.

मित्रांनो अनेकजण स्वामी समर्थांची प्रार्थना करतात. मनोभावे अगदी श्रध्देने सेवा करतात. आपल्या पैकी अनेकजण देवांना नवसही बोलतात. याचवेळी मंदीरात जाऊन दा न ध र्म देखील केला जातो. 
मित्रांनो, दा न ध र्म करणे केव्हाही आपल्या मानवजातीसाठी उत्तम असते.

दा न ध र्म केल्याने माणसाला सर्व कामात यश लाभते ही गोष्ट जरी खरी आहे. आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर दानधर्म ही करतो मात्र आपण भगवंताला किंवा स्वामी समर्थ महाराजांना मनोमन ‘धन्यवाद’ हा शब्द बोलायचे विसरत असतो.

मित्रांनो हा शब्द आपल्याला इच्छित कार्याची पूर्ती झाल्यानंतर तसेच आपलं एखादं काम पूर्ण झाल्यानंतर समर्थांसमोर बसून कृतज्ञ भावनेने धन्यवाद असे बोलायचे आहे. कार्य पूर्ण होताच महाराजांपुढे धन्यवाद हा शब्द बोलायचा आहे.

मित्रांनो आपण आपल्या कामाचा एक भाग म्हणून समजा हवं तर, जर तुम्ही एका दिवसाला 50 रुपये कमाई करत आहात. तर आज तुमची कमाई तुम्हाला 50 रु इतकी मिळते आहे. या कमाईबद्दल तुम्ही भगवंतांच्या प्रति कृतज्ञ असायला पाहिजे. तसेच काम करून तुमच्या हातात जे तुमचे पन्नास रुपये येतात त्यासाठी सुद्धा त्या वेळेला तुम्ही मनात कृतज्ञतेची भावना ठेवून भगवंताचे धन्यवाद मानले पाहिजेत. तसेच तुमच्या मनात त्या अर्थाने निर्मळ भाव असले पाहिजे. 

मित्रांनो, अशी भावना सातत्याने आपण मनात बाळगल्याने, त्याचबरोबर कृतज्ञतेच्या भावनेतून देवासमोर धन्यवाद हा शब्द आपण कार्यपूर्ती नंतर बोलत राहिल्याने नक्कीच आपली सर्व कामं मार्गी लागतील. आपल्या व्यवसायामध्ये तेजी येईल. घराभध्ये धन – दौलत भरभराटी येईल. मुले सुखी राहतील. घरातील वृद्धांची तब्येत चांगली राहणार व त्यांचे आशीर्वाद तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. 

तर मित्रांनो, धन्यवाद या शब्दाचे महत्त्व इतके अगाध आहे. आणि अनेक उदाहरणे अशी देता येतील की समजा जर कधी आपले काही ठिकाणाहून पैसे येणे असतील. किंवा काहींना वैद्यकीय अडचणी असतील, काहींना नोकरीमध्ये अडचणी असतील किंवा तसेच तुमच्या पगार वाढी विषयी अडचणी असतील. तर अशा अनेक समस्यांवर हा उपाय आपण नक्कीच उपयोगात आणू शकतात.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular