Wednesday, June 12, 2024
Homeराशी भविष्यअकाली मृ'त्यू म्हणजे काय.? मृ'त्यूनंतर आत्मा कुठे जातो.? जीव कसा जातो.?

अकाली मृ’त्यू म्हणजे काय.? मृ’त्यूनंतर आत्मा कुठे जातो.? जीव कसा जातो.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, एखादा जीव जन्माला आल्यावर त्याचा मृ’त्यू हा अटळ आहे. मनुष्यच नव्हे तर, या सृष्टीवर येणाऱ्या प्रत्येक जीवाचा अंत हा निश्चितच असतो. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्तीचा मृ’त्यू हा होतच असतो. परंतु आपल्याला हे माहीत नसते की, अ’काल मृ’त्यू म्हणजे काय? अ’काल मृ’त्यू झाल्यानंतर काय होते? अकाल मृ’त्यूनंतर व्यक्ती प्रे’त आत्मा बनून फिरतो का? आणि अ’काल मृ’त्यु का होते? या सर्वाचे माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

अकाल मृ’त्यू म्हणजे वेळ येणा आधी झालेली मृ’त्यू होय. म्हणजेच एखाद्या नैसर्गिक आपत्ती मध्ये मृ’त्यू होणे, अ’पघात होऊन मृ’त्यू होणे किंवा आ’त्महत्या करणे. हे सर्व प्रकार आहेत. परंतु हे चुकीचे आहे. कारण मृ’त्यू अ’काल येतात असे आपण म्हणत असतो. परंतु ही सृष्टी संपूर्ण देवाच्या हातात आहे. त्याच्यामरजी शिवाय या सृष्टी मध्ये पानसुद्धा हालत नाही.

म्हणजेच मृ’त्यू हादेखील तो देवाच्या हातातच असतो. या सृष्टीचे कर्ताधर्ता श्रीकृष्णास म्हंटले जाते. श्रीकृष्ण ठरवतात या सृष्टीत केव्हा व काय केव्हा कधी व काय घडावे. त्यामुळे माणसाची मृ’त्यू हा देखील त्यांच्या मर्जीने होत असतो. त्याच बरोबर श्रीकृष्णाने असे देखील सांगितले आहे आपल्या कर्मावर आपले जन्म व म’रण किंवा त्याचे फळ अवलंबून असते.

ते कर्म या जन्मातील, मागील जन्मातील देखील असू शकते. जर कर्म वाईट असेल तर, त्याचे फळ हे आपल्याला वाईटच मिळत असते. जर मागच्या जन्माची कर्माची फळे आपल्याला मिळायची राहिली असतील तर, या जन्मात ती आपल्याला मिळत असतात. त्यावर देखील आपले मृ’त्यू अवलंबून असते. कोणतीही गोष्ट ही विनाकारण होत नसते. त्यामागचे कोणते ना कोणते कारण असते. मग ते मृ’त्यू देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे येत असते आणि हे कारण आपले कर्माचे फळ देखील असू शकते.

श्रीकृष्णाचा जन्म होण्याआधी देवकीच्यासहा पुत्र झाली होती. मग श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. परंतु या सहा पुत्रांचा वध जन्मताच झाला होता. आणि तो कंसने केला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, त्या लहान बालकाने कोणते कर्म केले की ज्यामुळे त्यांना जन्मताच मृ’त्यू मिळाला? तर ही सहा पुत्र म्हणजे ब्रह्म लोक आतील सहा देवता होते. ते ब्रह्मदेवाचे खूप लाडके होते. त्यांच्याकडून कोणतीही चूक झाली तरी ब्रह्मदेव त्यांना शिक्षा करत नव्हते.

यामुळेच त्यांना अ’हंकार आला होता आणि ते सारखी चूक करू लागली. त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांना रागामध्ये श्राप दिला की, तुम्ही दै’त्यांच्या जीवनामध्ये जन्म घ्याल. यावर त्या सहादेवन त्यांना त्यांची चूक कळाली व त्यांनी ब्रह्मदेवाची माफी मागितली. त्यामुळे त्यांनी प्रभाव कमी केला. परंतु त्यांना असे सांगितले की, तुमचा जन्म हा दैत्यांच्या कुळात होणारच. त्याप्रमाणे त्यांचा जन्म त्यांच्या कुळात झाला.

त्यावेळी त्यांना आपल्या मागच्या जन्माची संपूर्ण माहिती असल्याने त्यांनी ब्रह्मदेवांना खुश करण्यासाठी संपूर्ण आपले जीवन यज्ञ, पट यात घालवले. परंतु त्यांचे वडील हिरण्यकश्यप हे होते त्यामुळे त्यांना ते आवडत नव्हते. त्यामुळे या सहा जणांना त्यांनी श्राप दिला की, तुम्ही पुढील जन्मात जन्माला येताच एका राक्षसाचा हाता कडून मृ’त्यू होईल.

त्याप्रमाणे त्यांचा जन्म देवकीच्या पोटी झाला आणि ते जन्माला येतात एका राक्षसाच्या म्हणजेच कंसाच्या हातून त्यांचे म’रण झाले. त्यामुळे कोणतेही म’रण हे अकाळ नसते. त्यामागचे कोणते ना कोणते कारण असते. म्हणून अ’काल कोणतीही गोष्ट घडत नसते. अकाल मृ’त्यू कधीही येत नसतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular