Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकअलभ्य लाभ दिप अमावास्या व गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी.. महत्त्व आणि पूजा विधी...

अलभ्य लाभ दिप अमावास्या व गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी.. महत्त्व आणि पूजा विधी जाणून घ्या.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावस्या म्हटलं जातं. चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्येकडे पाहिलं जातं. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी अमावास्य येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते.

या दिवशी पूर्वजांचे स्मरण करुन त्यांचे पूजन केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आदि करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व सांगितले आहे. योगायोगाने दीप अमावास्या आणि गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी जास्त वाढले आहे.

पंचांगानुसार, या वर्षी अमावस्या तिथी शनिवार, 27 जुलैपासून रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल. जी 28 जुलै रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटापर्यंत राहील. तर गुरुपुष्यामृतयोग 28 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल.

दीप अमावस्या महत्त्व – भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात पितरांचं स्मरण करून पिंडदान केलं जातं. मात्र आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिलं जातं. पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्ज्वलित करतात. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांन मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात, असं मानलं जातं.

गुरुपुष्यामृत योग – ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 27 नक्षत्रांचा उल्लेख केलेला आहे, त्यात पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व स्पष्ट करून सांगितले आहे. जेव्हा पण हे नक्षत्र गुरुवारी येत असते तेव्हा त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हटले जाते. हा योग सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. गुरुवारी भगवान विष्णूंसोबत बृहस्पती देवाची पूजा सुद्धा केली जाते. या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत. म्हणून शनिदेव आणि बृहस्पती या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव असणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular