Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकमी नास्तिक तरी स्वामींनी माझ्याकडून त्यांचे अनुभवाचे मासिक प्रकाशित करून घेतले.!! स्वामींच्या...

मी नास्तिक तरी स्वामींनी माझ्याकडून त्यांचे अनुभवाचे मासिक प्रकाशित करून घेतले.!! स्वामींच्या एका भक्ताचा अनुभव..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, घरामध्ये शांततेचे वातावरण राहावे आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी आपल्यातील अनेक स्वामीभक्त स्वामींची अगदी मनापासून सेवा पूजाअर्चा करत असतात आणि त्याचबरोबर सकाळी लवकर उठून स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून स्वामींच्या मंत्राचा जप ही करत असतात परंतु मित्रांनो आपल्या भक्तांनी केलेल्या या सर्व भक्तीचे फळ स्वामी आपल्या भक्तांना संकटाच्या काळामध्ये देतच असतात याबद्दल आपल्याला सर्वांना माहीतच आहे कारण आपल्यातील बरेच जण स्वामीभक्त आपल्याला स्वामींचा आलेला अनुभव सांगत असतात.

मित्रांनो आज आपण अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव सविस्तरपणे पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो हा अनुभव आहे सौ अरूणा बर्वे यांचा आणि त्या त्यांना आलेला अनुभव सांगताना असे की,

मला आठवतोय तो दिवस ज्या दिवशी माझ्या ओळखीच्या एका काकांनी मला सिंहगड रोडवर असणाऱ्या एका स्वामी भक्ताच्या बंगल्यावर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमास जाण्यास सांगितले होते आणि मीही माझ्या पतीसोबत त्या दिवशी तिथे बंगल्यावर पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर मला खूप अस्वस्थ वाटत होतं कारण त्या काकांनी मला आणि माझ्या पतीला स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर उभ केलं होतं आणि त्यांनी आमच्या दोघांच्या हातामध्ये स्वामी समर्थांची पंचधातूची एक मुर्ती दिली आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघितल्यानंतर त्या मूर्तीचा स्वीकार केला.

त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली त्या घरांमध्ये सर्व वातावरण प्रसन्न आणि भक्तीमय झाले होते प्रत्येक जण स्वामींच्या भजनामध्ये तल्लीन झाला होता, शेवटी स्वामींच्या आरती आरती नंतर कार्यक्रम संपन्न झाला आणि आम्ही दोघेही घरी निघालो घरी पोहोचल्यानंतर मला आठवले की कार्यक्रमात एका व्यक्तीने आमच्या दोघांच्या हातातील मूर्ती पाहून असे म्हटले होते की चार चार वर्षे स्वामींची सेवा करूनही अनेकांना स्वामींची ही पंच धातूची मूर्ती मिळत नाही आणि तुम्हाला तर लगेच मिळाली तुम्ही खूप नशीबवान आहात! हे त्या इसमाने म्हटलेले वाक्य माझ्या वारंवार मला आठवत होते आणि मी त्याचाच विचार करत होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवपूजा करत असताना मी आणि माझ्या पतीने दोघांनीही त्या मूर्तीची आमच्या देवघरामध्ये विधिवत पूजा करून स्थापना केली मला मनापासून प्रसन्न आणि खूप चांगले वाटत होते आणि त्याचबरोबर माझ्या मनामध्ये वारंवार एकच विचार येत होता की मी या गोष्टीकडे कसे काय आकर्षित झाले कारण या आधीही मला माझ्या जवळपासचे लोक असे म्हणत होते की तु तुझ्या निवृत्तीनंतर स्वामींची सेवा करण्यास सुरुवात कर तेव्हा मी त्यांची ही गोष्ट चेस्ट वारी नियत होते आणि मला त्यात काहीही इंटरेस्ट नाही असे त्या लोकांना अगदी बिनधास्त पणे सांगत होते.

परंतु आता तर मी झोपतानाही आणि झोपेतही स्वामींचा विचार करत होते आणि जिकडे तिकडे, वारंवार माझ्या मनामध्ये स्वामींच विचार येत होता आणि त्याच बरोबर मी जिथे हि असेल त्या ठिकाणी स्वामी समर्थांचे दर्शन मला होत होते. त्याचबरोबर मी जिथे हि काम करत असे किंवा बसलेले असे त्या ठिकाणी मला स्वामींची अस्तित्व असल्याचे भास होत होता. स्वामींनी मला आपण होऊन यामध्ये ओढले होते आणि मीही स्वामींकडे आता पूर्णपणे आकर्षित झाले होते परंतु आता मी खुश होते आणि मनापासून मला स्वामींची सेवा करण्यात आनंद मिळत होता त्याचप्रमाणे स्वामींच्या नामस्मरणात आणि सेवेमध्ये आता मला खूप आनंद आणि शांती मिळत होती.

टिप –‌ मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular