नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये जर धन संबंधित समस्या आहेत, भरपूर मेहनत करताय प्रयत्न करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना यश येत नाहीये, कोणत्याही कार्यामध्ये सफलता मिळत नाहीये, घरात अशांतता पसरलेली आहे तर हा उपाय आजच्या दिवशी तुम्ही नक्की करा. तर या उपयासाठी तुम्हाला कच्चा धागा घ्यायचा आहे.
वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी वापरतात तोच कच्चा धागा या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. एक ते दोन फूट हा धागा घेतल्यानंतर त्या धाग्याला आपण सात गाठी मारायचे आहेत. प्रत्येक गाठ बांधताना ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र बोलायचा आहे. अशाप्रकारे सात गाठी मारल्यानंतर हा धागा आपण मनोभावे श्री गणेशांना अर्पण करायचा आहे.
जर मंदिरात जाऊन हा उपाय करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरातील देवघरात सुद्धा हा उपाय करू शकता. घरातील बाप्पाच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला हा धागा अर्पण करायचा आहे. त्यांनतर आपण ओम् गण गणपतेय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.
मनोभावे, एकाग्र चित्ताने हा मंत्र जप केल्यानंतर आपल्या मनातील इच्छा गणपती बाप्पा समोर बोलून दाखवायची आहे. आपल्या घरात मोठ्या प्रमाणात धन पैसा यावा, आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्यामधे आपल्याला सफलता मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो ही सर्व पूजा करत असताना आपण गणपती बाप्पांना लाल रंगाचं एखाद फुल अर्पण कराव. त्यांनतर दुर्वा ज्या श्री गणेश यांना अत्यंत प्रिय आहेत या एकवीस दुर्वा सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण कराव्यात. गायीच्या तुपाचा एखादा दिवा प्रज्वलित करा. बाप्पांना लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य अर्पण करा.
अशाप्रकारे मनोभावे पूजा करून त्यांनतर थोडा वेळ हा धागा आपण गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ राहू द्यायचा आहे. अगदी पाच ते दहा मिनिटा नंतर हा धागा त्या ठिकाणाहून उचलायचा आहे आणि आपल्या पर्स मध्ये, पाकिटात किंवा आपल्या घरातील तिजोरीत हा धागा व्यवस्थित ठेऊन द्यायचा आहे.
या उपायामुळे मोठ्या प्रमाणात धन पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता पसरली जाईल. श्री गणेशाची असीम कृपा आपल्यावर नक्की बरसेल आणि आपल्या मनातील कोणतीही इच्छा नक्की पूर्ण होईल.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!