Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकअंगणातील तुळस सारखी सारखी सुकते का.? हा एक उपाय करा.!!

अंगणातील तुळस सारखी सारखी सुकते का.? हा एक उपाय करा.!!

आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… प्रत्येकाच्या घरी एक तरी तुळस लावलेली असते. खेडेगावात तर तुळशी वृंदावन असते. शहरात जागेच्या अभावी ते पाहायला मिळत नाही. तुळशीची नित्य नियमाने पूजा अर्चा, पाणी सर्व केले तरी तुळस लवकर वाढत नाही. काहींची तुळस तर लवकर सुकून जाते.

बऱ्याचदा तुळशीची पाने मोठीच होत नाहीत छोटीच राहतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुळशीवर ज्या मंजुळा ( बीज ) असते ते सुकण्याच्या आतच तुम्हाला ते काढायचे आहे. सुकून गेल्यावर ते गळून पडतात आणि तुळशीला हानी पोहोचवतात.

म्हणून लक्षात असुद्या कि बियांना सुकण्याआधीच काढायचे आहे. तुळस जर वाढत नसेल तर रोज रोज पाणी घालू नका. जेव्हा माती सुकलेली दिसेल तेव्हाच पाणी घाला. जास्त पाणी घातल्याने तुळशीची मुळ ओली राहून सडतात.

त्यामुळे तुळशीची वाढ पूर्ण पणे थांबते. चला तर मग जाणून घेऊ तुळस डेरेरदार व्हावी यासाठी नक्की कोणत्या गोष्टीचा वापर करायचा आहे. इप्सम मिठाचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. हो इप्सम मीठ हे तुळस वाढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. त्याचा वापर दोन पद्धतीने करू शकतो.

मीठ पाण्यात मिसळून ते पाणी तुळशीच्या पानांवर स्प्रे करू शकता किंवा एक चमचा इप्सम मीठ घेऊन ते खोडाला किंवा मातीत सोडू शकतो. लक्षात ठेवा स्प्रे करत असाल तर एक लिटर पाण्यात एक चमचा इप्सम मीठ घ्यायचे आहे.

जास्त घ्याल तर पाने पिवळी पडून जाळून जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पाण्यात मीठ मिक्स झाल्यानंतर पाच मिनिटांने स्प्रे करू शकता. लक्षात असुद्या जर तुम्ही तुळशीची पाने नित्यनियमाने खात असाल तर पानांवर स्प्रे करू नका, डायरेक्ट माती मध्ये मीठ सोडा. दोन ते तीन दिवसांतच तुम्हाला फरक उघड्या डोळ्यांनी दिसेल.

तुमच्याही दारासमोरील तुळशीची वाढ थांबली असेल तर एकदा नक्की हा उपाय करून पहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular