Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकअनंताच व्रत का करावं.? नियम काय असतात.. जाणून घ्या अनंत व्रत स्थापना...

अनंताच व्रत का करावं.? नियम काय असतात.. जाणून घ्या अनंत व्रत स्थापना ते उद्यापन कसे करावे.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत आहे. यावेळी अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर रोजी आहे. अनंत म्हणजे ज्याला सुरुवात किंवा शेवट माहित नाही. म्हणजेच ते स्वतः श्री हरी आहेत. चातुर्मास हा व्रत-वैकल्ये व सण-उत्सवांचा काळ मानला जातो. श्रावण महिन्यात व्रत-वैकल्यांची रेलचेल असते. भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजन, गणेश चतुर्थी, राधाष्टमी, परिवर्तिनी एकादशी, वामन द्वादशी साजरी केल्यानंतर भाद्रपद चतुर्थीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे.

श्रीविष्णूंना अनंत संबोधले जाते. त्यामुळे या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. हे व्रत आचरण्यामागे विशिष्ट कारण, उद्देश असल्याचे सांगितले जाते. या व्रताचरणात श्रीविष्णूंसह शेषनागाचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी एका विशिष्ट उद्देशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हा गणेशोत्सव दहा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला केली जाऊ लागली. त्यामुळे अनंत चतुर्दशी स्थितीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे? अनंत व्रताचा उद्देश, पद्धती यांविषयी जाणून घेऊयात…

अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णूंना अनुसरून केले जाते.

या व्रतामध्ये स्नान केल्यानंतर अक्षत, दुर्वा, शुद्ध रेशीम किंवा कापूस आणि हळदीने रंगवलेल्या चौदा गाठी अनंत ठेवून हवन केले जाते. मग अनंत देव यांचे चिंतन केल्यानंतर, हे शुद्ध अनंत, ज्याची पूजा केली जाते, ती पुरुषाने उजव्या हातावर आणि बाईने डाव्या हाताला बांधली आहे.

असे म्हणतात की, हे अनंत चतुर्दशीचे व्रत मुख्यतः हे गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीविष्णूंना अनुसरून केले जाते. याशिवाय या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते.

कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात, अशी मान्यता आहे. अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता श्रीविष्णू असतात, तसेच त्यामुळे शेषनाग आणि यमुना या अन्य देवताचीही पूजा केली जाते.

या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सुरू होते.

अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते, असे सांगितले जाते.

मग यानंतर भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर, त्याच्यापुढे 7 फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेषनाग ठेवून त्याच्यापुढे हळदीने रंगविलेला चौदा गाठींचा दोरा ठेवावेत. मग या कुंभाला वस्त्राचे वेष्टन बांधावे. तसेच शक्य असल्यास यमुना नदीचे पाणी द्यावे नाहीतर, कुंभातील पाण्याला यमुना मानावे.

शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची 16 उपचारांनी पूजा करवी. यामध्ये प्रामुख्याने नामपूजा, अंगपूजा, आवरणपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा यात समावेश केला जाते. पुष्पांजली झाल्यावर मग अर्घ्य देवून, भगवान विष्णूची मनोभावे प्रार्थना करावी.

मग यानंतर 14 गाठींचा दोरा हातावर बांधवा किंवा गळ्यात धारण करवा. वडे आणि घारगे यांचे वाण द्यावे. मग व्रत देवतांचे विसर्जन करतात. असे सांगितले जाते की, प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रत रूपात निर्माण झाली होती.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular