Saturday, June 8, 2024
Homeआध्यात्मिकअरे बाळा तुझी चांगली वेळ नक्कीच येईल.. आम्ही कशासाठी आहोत.? स्वामी वचन..

अरे बाळा तुझी चांगली वेळ नक्कीच येईल.. आम्ही कशासाठी आहोत.? स्वामी वचन..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो.. श्री स्वामी महाराज म्हणतात या ब्रह्मांडामध्ये अशी एकही वस्तू किंवा गोष्ट नाही ज्या आम्ही तुला देऊ शकणार नाही. तुझ्यावर आलेलं असं एकही संकट नाही, जे आम्ही बघू शकणार नाही. असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही क्षमऊ शकणार नाही. परंतु आम्ही तुझ्यामध्ये तुझ्या भक्तिभावामध्ये इतका विश्वास निर्माण करू की कितीही बिकट परिस्थिती असो ते सर्व तू पेलू शकशील.

कुठल्याही संकटा समोर निर्धाराने उभं राहू शकशील वादळात एकट्यानेच सर्व निभावून नेऊ शकशील. भलेही मग तुला चालता येत नसेल तर आम्ही तुला पळायला शिकवू, बोलता येत नसेल तर आम्ही तुला गर्जना करायला शिकवू.

पंख पसरून उडता येत नसेल तर आम्ही तुला गगन भरारी घ्यायला शिकवू, दृष्टी नसेल तरही आम्ही तुला सूर्याला पाहण्याचे सामर्थ्य देऊ. नंतर स्वामी महाराज म्हणतात मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे.

पक्षाच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. कैलासावर आणि गरुडावर ही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त मला हाक द्या‌. माझे नामस्मरण करा मी सतत तुमच्या पाठीशी राहील. तुमचे रक्षण करीन.

तर स्वामींचे हे अद्भुत वचन आपल्याला बऱ्याचदा अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन जातात. जर स्वामी आहेत आपल्या पाठीशी मग आपल्याला कुणाची काय गरज. तरीही आपण बोलतो की मी एकटा आहे मला सोबत कोणी येत नाही. म्हणून स्वामी मार्गावर आल्यानंतर सर्व काही स्वामी महाराजांच्या स्वाधीन करून भक्तिभावाने त्यांची सेवा करत राहण्यात परमार्थ असतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular