Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकअसे मिळतील स्वामी तुमच्या आसपास असल्याचे संकेत.. स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत की...

असे मिळतील स्वामी तुमच्या आसपास असल्याचे संकेत.. स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत की नाही असे ओळखा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांचे अगदी मनापासून सेवा पूजाच्या करत असतात आणि मित्रांनो या पूजेचे फळ म्हणून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आपले स्वामी आपल्याला हे संकेत देत असतात. या संकेता वरूनच आपण ठरवू शकतो. की स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर आहे, की नाही तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल किंवा त्यांचे भक्त असाल तर असे अनुभव तुम्हाला देखील येत असणारच.

भक्तहो हे संकेत समजण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असावा लागतो. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास आहे. त्या लोकांना याचे अर्थ समजत असतात. स्वामी समर्थ महाराज त्यांची नित्य सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना स्वामीभक्तांना वेगवेगळे संकेत देत असतात. त्यातील ते संकेत प्रत्येकालाच ओळखता येतात असे नाही आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने खूश झाले आहेत की नाहीत किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही हे कसे ओळखावे.

मित्रांनो आज आपण या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, की हे संकेत जर आपल्याला मिळत असतील तर स्वामी समर्थ महाराज आपल्यावर खुश आहेत, त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर आहे असे समजावे. त्यातील पहिला संकेत आहे. ज्या वेळी आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो. त्यांचे पारायण करतो, किंवा त्यांची नामस्मरण करतो आणि ही सेवा जर आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने करत असाल किंवा देवघरासमोर किंवा स्वामींचा फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे बसून ही सेवा जर तुम्ही करत असाल‌..

तेव्हा अचानकच आपल्याला चांगला वास येतो. त्या वेळेस आपले मन अगदी प्रसन्न होते. त्यावेळी जर आपले मन प्रसन्न होत असेल तर ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करत असतो. त्यावेळी जर आपले मन प्रसन्न झाले असेल किंवा आपल्या घरामध्ये सुगंधी वातावरण निर्माण झाले असेल तर स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत. व त्यांचा शुभ आशीर्वाद सदैव आपल्या बरोबर आहे असे समजावे.

स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या अवतीभवती आहेत. ते आपले सदैव वाईट गोष्टींपासून संरक्षण करतात. व त्या आपल्या पाठीशी उभा राहिले आहेत हे समजावे. कारण स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या भक्तांना सेवेकऱ्यांना सदैव म्हणत असत की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याप्रमाणे ते आपल्या सदैव पाठीशी असतात.

आता दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा संकेत म्हणजे ज्या वेळी आपण रात्री झोपतो. व झोपल्यानंतर स्वामी समर्थ महाराज आपल्या स्वप्नांमध्ये येतात. स्वामी समर्थ महाराज यांच्या स्वप्नांमध्ये येऊन दर्शन देतात. त्यांनी आपल्याला खूप भाग्यवान समजावे. कारण स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या स्वप्नात येतात. जे भक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा नित्यनियमाने व श्रद्धेने करतात त्यांनाच ते दिसतात स्वप्नात का असेना पण स्वामी येऊन आपल्याला दर्शन देणे ही बाब खूप नशीबवान व पुण्य कमवलेल्या लोकांच्या वाट्याला येत असते.

त्यामुळे स्वामी स्वप्नात येऊन आपला आशीर्वाद देणे किंवा दिसणे हे खूपच शुभ संकेत आहेत. हे दोन संकेत ज्या स्वामी सेवेकऱ्यांना किंवा भक्तांना मिळतात. त्यांनी आपल्या बरोबर स्वामी सदैव आहेत. याची जाणीव ठेवून आपली सर्व कार्य करावीत. व कोणतेही कार्य करत असताना. घाबरून न जाता स्वामी समर्थ महाराजांवर दृढ विश्वास ठेवावा. व माझे सर्व कामे तुम्हीच मार्गी लावा असे म्हणून त्यांना नमस्कार करावा.

असे जे जे लोक करतात त्यांची सर्व कामे पूर्ण होता. ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये हे संकेत देतात. त्यांनी स्वतःला खूपच नशिबवान समजावे. व स्वामी समर्थ महाराज आपल्या बरोबर असल्याचे समाधान देखील मानावे हे सुख सर्वांच्याच वाटेला येते असे नाही.जे अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात. व त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या बाबतीत हे सर्व घडत असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular