Saturday, July 13, 2024
Homeआध्यात्मिकअशा प्रकारे देवतांचे पावित्र्य जपावे.. असा करावा.. देवी देवतांचा मान सन्मान..

अशा प्रकारे देवतांचे पावित्र्य जपावे.. असा करावा.. देवी देवतांचा मान सन्मान..

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. सर्व स्वामी सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, ग्रामदेवातांचे मान सन्मान कसा करावा हे आज आपण जाणून घेऊयात..

1) दर अमावस्याला आपल्या परिसरातील ग्रामदेवतांचा मान सन्मान केल्यास बऱ्याच अडचणी संकटे दूर होतात.

2) एक नागीनीचे पान घ्या (देठासहित) त्यावर दक्षिणा, सुपारी, खारीक, भीमसेनी कापूर देवीसमोर या देवासमोर दक्षिणोत्तर ठेवायचा. ( दक्षिणेकडे देठ आला पाहिजे )

3) एक श्रीफळ हातात घेऊन मी स्वामी समर्थ आज्ञेने आपला मान सन्मान करतोय की माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील, संकटे आहेत ते दूर होऊ दे, असं म्हणून महाराजांचा जयजयकार करून त्या देवतेंचा जयजकार करून तो श्रीफळ त्यांच्या चरणी ठेवावा.

4) त्याचबरोबर जे काही असेल फुलहार खडीसाखर म्हणून नैवैद्य दाखवावा.

5) ठराविक पणे आपण सर्वानी जर दर अमावसेला हा कार्यक्रम केला तर आपल्या घरावरील अनेक अशा अशुभ शक्तींचा त्रास कमी होतो.

6) सद्याच्या स्थितीत अनेक प्रकारचे Viruses आजार घरोघरी पोहोचत आहेत आपल ह्यातून संरक्षण होण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे.

7) ज्यांना ग्रहांचा त्रास आहे शनिची पीडा आहे त्यांनी आवर्जून दर शनिवारी मारुतीच दर्शन घ्यायला पाहिजे त्याचबरोबर मारुतीच्या मंदिरात स्वतः चा चेहरा पणतीत बघून तें तेल मारुती देवळात दिव्यात टाकणे तिथेच बसून हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, लांगुलास्त्र स्तोत्र म्हटले पाहिजे. त्यानं ग्रहपीडा नाहीशी होते.

8) प्रत्येक स्त्रीने मंगळवार शुक्रवार बघुनच देवीच्या मंदिरात जाऊन एक पाठ दुर्गा सप्तशती करणे, त्याने घरातली बरीच कामे मार्गी लागतात अलक्ष्मी निघून जाते, लक्ष्मी स्थिर होते.. आणि आपल्या घरात कुलदेवीचा वास राहतो.

🌹श्री स्वामी समर्थ 🌹
वरील दिलेली सेवा सर्वानी करून बघा नक्कीच प्रचिती मिळेल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular