Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकअशी वाईट वेळ कुणावरही येऊ नये.. दत्तकृपेचा सुन्न करणारा खतरनाक अनुभव नक्की...

अशी वाईट वेळ कुणावरही येऊ नये.. दत्तकृपेचा सुन्न करणारा खतरनाक अनुभव नक्की बघा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्त व श्रीदत्त कृपेचा हा अनुभव एका स्वामी सेवेकरी ताईंना आलेला आहे. त्या ताई सांगतात पुण्यात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेला माझा मुलगा चिरंजीव आनंद हा दिवाळीसाठी म्हणून धनत्रयोदशीच्या सायंकाळी जळगावत घरी आला, तोच तीव्र पोट दुखीची तक्रार घेऊन.

डॉक्टर श्री दशपुत्रे यांनी तपासले, त्यांनी मुतखड्याचा अंदाज व्यक्त करून सोनोग्राफीचा सल्ला दिला. त्याच रात्री सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आला. उशिरा रात्री पेन किलर घेऊन कसं बसा तो झोपला पण दिवाळीची पहाट झाली आणि आनंदला जाग आली. तो प्रचंड वेदनेने कळवळत होता, आणि आम्ही त्याला डॉक्टर कडे दाखवण्यासाठी घराबाहेर पडलो तर अनेक डॉक्टर दिवाळी म्हणून बाहेरगावी गेलेले.

एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले त्याला तरी यांनी पुन्हा सोनोग्राफी करवली, औषध दिले pn पोट साफ नाही झाले. दुखण्याने तो हैराण झाला होता दुसऱ्या दिवशी डॉक्टर बदलले. जळगावातील नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये हलवले. त्यानंतर कुठेच त्याला फरक नाही पडला. तोही चार दिवस वेदनेने कळवळत होता. निदान होत नव्हत. याला पुण्याला किंवा मुंबईला हलवावे असे विचार सुरू झाला आणि डिस्चार्ज घेऊन घरी आलो.

तो मधूनच तीव्र वेदनांनी ओरडत करत होता. आम्हाला ते पाहवत नव्हतं. कधी तरी त्याचा डोळा लागला. रात्री मी देवा समोर बसून पोट दुखीने त्रस्त झालेल्या ब्राह्मणाची पोट दुखी तुम्ही निवारण केली असं गुरुचरित्र मधील दहाव्या अध्यायात दाखवला आहे अस वाचत होते. सकाळी गुरुचरित्र मधील तेरावा अध्याय वाचण्याचा निश्चय केला. माझी रोजची देवपूजा आटवून मी तेरावा अध्याय वाचला.

डोळे मिटून दोन मिनिटे तसच बसले आणि आईने एक पाकीट आणून दिलं व म्हणाली की हे बघ तर कसले टप्पाल आहे आत्ताच पोस्टमन देऊन गेला. बघतो तर काय गाणगापूर येथील श्री नरसिंह भट पुजारी यांनी अंगारा व प्रसाद पाठवलेला. मी थक्क झालो डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अंगावर रोमांच उभे राहिले. मी परमेश्वराला हात जोडले, आनंदला अंगारा लावला.

पुन्हा देवापुढे बसून दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप सुरू केला. मला काहीच कळत नव्हते. गाणगापूर येथून टपाल आले. कसे दोन वर्षांपूर्वी आम्ही गाणगापूरला गेलो होतो तेव्हा याच गुरुजींकडे उतरले होतो. त्यांच्यामार्फत पूजा अभिषेक केला होता. त्यांच्याकडे आमचा पोस्टल एड्रेस होता इथपर्यंत ठीक आहे.

पण दोन वर्षात गुरुजींची कोणत्याही प्रकारचा संपर्क नसताना नेमकं आज त्यांच्याकडून प्रसाद अंगारा भस्म याचं पाकीट कसं काय आमच्या घरी आले होते. बरोबर एक तासाने मुलाने आश्चर्यकारक बातमी दिली म्हणाला बाबा सहा दिवस झाले कोठा साफ होत नव्हता आणि मग औषध घेऊन सुद्धा उपयोग होत नव्हता. मात्र आत्ताच पोट साफ झाले थोड्यावेळाने त्याची पोट दुखी सुद्धा थांबली. जय गुरुदेव दत्त.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular