Friday, June 7, 2024
Homeआध्यात्मिककोजागिरी पौर्णिमा चुकूनही करू नका ही  3 कामं.. माता लक्ष्मी कायमच्या घरातून...

कोजागिरी पौर्णिमा चुकूनही करू नका ही  3 कामं.. माता लक्ष्मी कायमच्या घरातून निघून जातील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो 9 ऑक्टोबर रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे. या कोजागिरी पौर्णिमेस माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विचरण करत असते. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेस माता लक्ष्मी ची पूजा करा. आपली जी इष्ट देवता आहे किंवा आपली जी कुलदेवत आहे, तिच्या मंत्रांचा जप करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपलं घर धनधान्य सुख संपत्तीने भरून जातं. त्या सोबतच अशी काही कामे आहेत जी करणं आपण सगळ्यांनी टाळलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते कामे.!!

सर्वात पहिल आणि महत्त्वाचं काम म्हणजे कोजागिरी पौर्णिमेस रात्री म्हणजेच सूर्यास्तानंतर आपण कुणालाही जिरे मोहरी किंवा हळद या तीन पैकी कोणतीही वस्तू उधार किंवा उसने म्हणून देऊ नये. मित्रांनो या वस्तू तंत्र मंत्र शास्त्रात टोटके करण्यासाठी, काही उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. आणि या वस्तू जर आपण इतरांना उधार दिल्या, दान दिल्या किंवा असल्या स्वरूपात दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते. वर्षभर आपल्या घरात धन धान्याची पैशाची तंगी भासते. तर अशा कोजागिरी पौर्णिमेस जो माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी हे काम आपण चुकूनही करू नका.

त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ही कोजागिरी पौर्णिमा कर्जमुक्तीची पौर्णिमा मानली जाते. चुकूनही आपण या दिवशी कोणालाही धन पैसे उधार, उसने किंवा कर्ज म्हणून देऊ नका. कारण या दिवशी उधार दिलेले किंवा कर्ज म्हणून दिलेले पैसे हे कधीही परत मिळत नाहीत. ते परत मिळवण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यामुळे आपण या दिवशी पैसे उधार उसने किंवा कर्ज म्हणून देऊ नका. या दिवशी जर आपण कोणाकडून कर्ज घेतलं तर ते फेडण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी येतात. ते कर्ज सहजासहजी फेडता येत नाही. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेस आपण चुकूनही कुणाकडून कर्ज घेऊ नका किंवा कुणालाही पैसे कर्ज उसने किंवा उधार म्हणून देऊ नका. यामुळे आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र येऊ शकते.

त्यानंतर महिलांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी रात्री केस विंचरणे कटाक्षाने टाळायच आहे. ज्या घरामधील महिला ही कोजागिरी पौर्णिमेस सूर्यास्त नंतर केस विंचरते अशा घरात नेहमी वाद वाद कलह होत राहतात. अशांतता राहते. सुखामध्ये समाधानामध्ये बाधा येतात. लोकांना याचे अत्यंत वाईट परिणाम बघायला मिळाले आहेत. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा, तिचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस आहे.

आपण दररोज देवपूजा करतो मंत्र जप करतो, प्रतिष्ठान देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. आपल्या घरात धनधान्य व सुख-समृद्धी यावी असे आपल्याला वाटते तर हे फळ देण्यासाठी माता लक्ष्मी या दिवशी आपल्या घरी येणार आहे, आणि म्हणून या दिवशी आपण रात्री जागरण नक्की करा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular