Thursday, June 20, 2024
Homeलाइफस्टाइलबाहेर असो की घरी‌.. बायकोनं निदान असं तरी वागावं.. हे प्रत्येक पुरुषाला..

बाहेर असो की घरी‌.. बायकोनं निदान असं तरी वागावं.. हे प्रत्येक पुरुषाला..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. रोमँटिक चित्रपट पाहिल्यानंतर महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा असतात. यात नवीन काही नाही. पण.. महिलां इतकं पुरुषांना त्यांच्या भावना व्यक्त करायला जमत नाही. बऱ्याचदा पुरुषांना त्यांच्या पार्टनरच्या काही गोष्टी आवडत नाहीत किंवा त्यांनी ते करू नये, असं वाटतं; पण पुरुषांना ते बोलून दाखवता येत नाही. कारण बोलल्यामुळे कदाचित त्याचा नात्यावर परिणाम होईल किंवा ते वेगळ्या अर्थाने घेतलं जाईल, अशी भीतीही त्यांना असते. अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात..

एखादा विषय ताणणं – पुरुषांना असं वाटतं, की स्त्रिया कधीकधी संवादातला एखादा विषय खूप ताणतात आणि ही गोष्ट पुरुषांना अजिबात आवडत नाही. भांडण किंवा वाद होत असताना विनाकारण प्रकरण ताणण्यापेक्षा तोडगा काढणं गरजेचं असतं. जेव्हा स्त्रिया तो विषय सोडण्यास नकार देतात आणि ताणतात, तेव्हा पुरुष निराश होण्याची दाट शक्यता असते.

पार्टनर शांत असताना त्याला त्रास देणं – सर्व महिलांना त्यांच्या जोडीदारांशी बोलायचं असतं, संवाद साधायचा असतो; पण बऱ्याच पुरुषांना शांत राहायला आवडतं. अशा परिस्थितीत ते एखाद्या गोष्टीचा खोल विचार करत असतात. परंतु अशा वेळी स्त्रिया त्यांना दोष देतात आणि विचार करतात की तो शांत आहे तर काही तरी चुकीचं आहे. परंतु प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. पुरुषांना फक्त शांत राहणं आणि काही काळ एकटं राहणं आवडतं.

अवास्तव अपेक्षा ठेवणं – रोमँटिक चित्रपट पाहिल्यानंतर महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा असतात. यात नवीन काही नाही; पण चित्रपटांमध्ये पात्रांनी सेट केलेला बार खूप हाय आणि अवास्तव असतो. तरीही स्त्रिया पुरुषांकडून अशा अपेक्षा करतात. त्यामुळे पुरुषांवर दडपण येतं. महिलांनी या गोष्टी करणं टाळायला हवं.

कोड्यात बोलणं – काही वेळा स्त्रिया त्यांच्या पार्टनरला त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला लावण्यासाठी काही हिंट देतात. परंतु पुरुषांना या गोष्टी कदाचित समजू शकत नाहीत. त्यांना पार्टनरने दिलेले इशारे काही वेळा समजत नाहीत. त्यामुळे पुरुषांना वाटतं की ती कोड्यात बोलत आहे आणि यामुळे गोंधळ वाढतो.

पार्टनरच्या आवडी आवडत असल्याचं भासवणं – जेव्हा पार्टनरचा एखादा छंद आवडत नसतानाही तो आवडतो, असं भासवण्याचा प्रयत्न स्त्रियांकडून केला जातो, ते पुरुषांना अजिबात आवडत नाही. पार्टनरबरोबर वेळ घालवण्यासाठी स्त्रिया ढोंग करू शकतात. हे करताना पार्टनरला कळत नाही, असं त्यांना वाटतं. पण तसं नसतं. त्यामुळे असे ढोंग करणं स्त्रियांनी थांबवावं, असं पुरुषांना वाटतं.

तयार होण्यासाठी 10 मिनिटांऐवजी एक तास लावणं.. अनेक पुरुषांना असं वाटतं की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना तयार होण्यास जास्त वेळ लागतो. स्त्रिया म्हणतात की त्यांना तयार होण्यासाठी 10 मिनिटं लागतात. परंतु त्यांचे केस, मेकअप, ड्रेस-फिटिंग या सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांना एक तास लागतो. पुरुषांना इतका वेळ वाट पाहणं अजिबात आवडत नाही, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular