Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकबहिणीने भावाला ओवाळताना ही एक वस्तु ताटात ठेवावी.. भावाला संपन्नतेबरोबर दिर्घायुष्यही लाभेल.!!

बहिणीने भावाला ओवाळताना ही एक वस्तु ताटात ठेवावी.. भावाला संपन्नतेबरोबर दिर्घायुष्यही लाभेल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो.. आपल्या हिंदू धर्मात सर्वच सणांना अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, त्यातील रक्षाबंधनचा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जातो. यावेळी हा पवित्र रक्षाबंधन सण 11 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यावर्षी रक्षाबंधन हा सण गुरुवार, 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी, बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर शुभ मुहूर्तावर रक्षणासाठी धागा बांधतात. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा हा सण आहे. राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.

शास्त्रनुसार पुरुषाच्या उजव्या हाताच्या मनगटावर सुर्यनाडी व स्त्रीच्या डाव्या हाताच्या मनगटावर चंद्रनाडी असते या सोबत मनगटावर असणाऱ्या तीन मानिबंध कंकन रेखा ही असतात. या रेखा शास्त्रनुसार पुरूषाला 120 वर्षे व स्त्रीला 108 वर्ष आयुष्य असते हे आयुष्य वाढावे व रक्षणासाठी होण्यासाठी हे रक्षाबंधन करतात.

रक्षाबंधनाचा सण वास्तू नुसार कसा साजरा करावा हे जाणून घेऊया. दाराचा उंबरा हे पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरी ग्रहण करण्याचे आणि त्या पुन्हा पाताळात संक्रमित करण्याचे उत्तम माध्यम आहे. दाराच्या चौकटीमध्ये या त्रासदायक लहरी घनीभूत झालेल्या असतात. दारात उभे राहिल्याने या रजतमात्मक लहरींनी भारित क्षेत्राचा जिवाला त्रास होतो.

जिवाभोवती या त्रासदायक लहरींचा कोश निर्माण होतो. याचा जिवाच्या मनोमयकोशावर परिणाम होऊन तेथील रजतम कणांचे प्राबल्य वाढल्याने जीव चिडचिडा बनतो. या कारणास्तव दारात औक्षण करणे, हे हिंदु धर्माला संमत नाही. दारात औक्षण करण्यापेक्षा दाराच्या आतल्या भागात, म्हणजेच वास्तूत, शक्यतो देवघरासमोर औक्षण करावे.

देवघरासमोर रांगोळीचे स्वस्तिक काढून त्यावर पाट मांडून मगच औक्षण करावे. असे केल्याने देवतेचे आशीर्वादरूपी बळ मिळण्यास साहाय्य होते. भावाला राखी बांधतांना योग्य दिशेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जर बहिण भावाला राखी बांधत असेल तर बहिणीने पश्चिम दिशेला तोंड करून राखी बांधावी. म्हणजेच भावाला पूर्व दिशेने चेहरा करून बसवावं.

इतर दिशेला चेहरा करून राखी बांधल्यास नकारात्मक प्रभाव पडतो. राखी बांधतांना भावाला लाकडी पाटावर बसवावे आणि बहिणीने चटईवर बसून राखी बांधावी. वास्तू नुसार तीच राखी बांधावी जी नैसर्गिक पद्धतिने बनवली गेली असेल.

वास्तू नुसार लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची राखी बांधणे हे अतिशय शुभ ठरते. निळा, जांभळा, काळ्या तसेच मरुन रंगाची राखी बांधू नये असे सांगितले जाते. राखी बांधत असतांना आपल्या घराच्या खिडक्या उघड्या कराव्या यामुळे सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये संचार होईल आणि आरोग्यदायी वातावरण घरात बनून राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular