Saturday, December 9, 2023
Homeराशी भविष्यBappas Blessings Sankasht Chaturthi Revati Nakshatra संकष्ट चतुर्थी 2 राजयोग.. 5 राशींवर...

Bappas Blessings Sankasht Chaturthi Revati Nakshatra संकष्ट चतुर्थी 2 राजयोग.. 5 राशींवर बाप्पांची असीम कृपा बरसणार धनवृद्धी सोबत भरपूर लाभ.!!

Bappas Blessings Sankasht Chaturthi Revati Nakshatra संकष्ट चतुर्थी 2 राजयोग.. 5 राशींवर बाप्पांची असीम कृपा बरसणार धनवृद्धी सोबत भरपूर लाभ.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… तिसरा श्रावणी रविवार, (Bappas Blessings Sankasht Chaturthi Revati Nakshatra) आज 3 सप्टेंबर रोजी आहे. विशेष म्हणजे या दिवशी श्रावणातील संकष्ट चतुर्थी आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. काही दिवसांनी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी होईल. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते.

या संकष्ट चतुर्थीला दोन शुभ मानले गेलेले राजयोग जुळून येत आहेत. रविवार हा नवग्रहांचा राजा सूर्य याला समर्पित असल्याचे मानले जाते. या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि वृद्धी योग जुळून येत आहेत. (Bappas Blessings Sankasht Chaturthi Revati Nakshatra) हे दोन्ही अतिशय शुभ तसेच राजयोगांप्रमाणे मानले जातात, असे सांगितले जाते. याशिवाय रेवती आणि अश्विनी नक्षत्राचा प्रभाव पाहायला मिळू शकतो.

या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भूत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगितले जात आहे.

चंद्र मीन राशीत असेल, त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करेल. वृद्धी योगाच्या शुभ प्रभावामुळे जीवनात उन्नती साध्य करता येऊ शकेल. (Bappas Blessings Sankasht Chaturthi Revati Nakshatra) समस्यातून दिलासा किंवा बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल, असे सांगितले जाते. एकूण ग्रहमानाचा पाच राशीच्या व्यक्तींना चांगला लाभ होऊ शकतो. गणपती बाप्पाचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊयात…

हे सुद्धा पहा : Horoscopepost Raahu Shani Yuti In Mesh Rashi सूर्य, शनि व राहु यांची वक्रदृष्टी या राशींवर पडणार.. 4 राशींच्या जातकांना जपूनच रहावं लागणार..

मेष रास – राशीच्या व्यक्तींना तिसऱ्या श्रावणी रविवारी आलेली संकष्ट चतुर्थी शुभ ठरू शकेल. सामाजिक कार्यामुळे सन्मान मिळू शकतो. कौटुंबिक व्यवसायासाठी वडिलांचा सल्ला चांगला नफा आणि संपत्ती तसेच सन्मान वाढवणारा ठरू शकेल. मित्रांच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण करू शकाल. सर्वार्थ सिद्धी योगाच्या शुभ प्रभावाने चांगले लाभ मिळतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवेल. सूर्य चालिसा पठण किंवा श्रवण करावी.

कर्क रास – राशीच्या व्यक्तींना तिसऱ्या श्रावणी रविवारी आलेली संकष्ट चतुर्थी सुखद ठरू शकेल. अडकलेली घरगुती कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. आदर वाढू शकेल. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. समाजात सन्मान वाढेल. (Bappas Blessings Sankasht Chaturthi Revati Nakshatra) व्यावसायिकांसाठी दिवस चांगला राहील. कामात व्यस्त राहून व्यवसाय विस्ताराचे नियोजन करू शकता. सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सूर्य बीज मंत्राचा जप करावा.

कन्या रास – राशीच्या व्यक्तींना तिसऱ्या श्रावणी रविवारी आलेली संकष्ट चतुर्थी लाभदायी ठरू शकेल. वृद्धी योगाच्या शुभ प्रभावामुळे मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक समृद्धीचा शुभ संयोग घडेल. कुटुंबात नवीन ओळख मिळेल. भावंडांसोबत संबंध चांगले राहतील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. पालकांशी संबंध मजबूत राहतील. वडिलांच्या मदतीने नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीची योजना बनवू शकाल. सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. लाल फुले अर्पण करावीत.

तूळ रास – राशीच्या व्यक्तींना तिसऱ्या श्रावणी रविवारी आलेली संकष्ट चतुर्थी शुभ ठरू शकेल. सर्वार्थ सिद्धी योगाच्या शुभ प्रभावामुळे कार्य यशस्वी होईल. सन्मान वाढेल. सासरच्या बाजूने चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार रणनीतींवर काम करतील. (Bappas Blessings Sankasht Chaturthi Revati Nakshatra) उत्पन्नाच्या स्रोतांवरही काम करू शकतात. व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांची प्रगती पाहून मनही प्रसन्न राहील. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. शक्य असल्यास वडाच्या झाडाला दूध अर्पण करावे.

मीन रास – राशीच्या व्यक्तींना तिसऱ्या श्रावणी रविवारी आलेली संकष्ट चतुर्थी शुभ फलदायी ठरू शकेल. वृद्धी योग आणि रेवती नक्षत्राच्या प्रभावामुळे अडकलेले पैसे मिळू शकतील. सरकारकडून सन्मान मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवतील. अवघड कामे कमी वेळेत पूर्ण करू शकाल, ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि फायदा होईल. (Bappas Blessings Sankasht Chaturthi Revati Nakshatra) नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस अतिशय शुभ असू शकेल.

सर्वार्थ सिद्धी योगाच्या प्रभावामुळे चांगले पैसे मिळतील. ज्या गोष्टीची खूप दिवसांपासून वाट पाहत होता ती पूर्ण होऊ शकते. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दिवस अतिशय अनुकूल आहे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. – सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular