Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिकरात्री झोपण्यापूर्वी उष्टं पाणी गुपचूप ठेवा इथे नशीब फळफळेल.. नकारात्मकता घराबाहेर जाईल..

रात्री झोपण्यापूर्वी उष्टं पाणी गुपचूप ठेवा इथे नशीब फळफळेल.. नकारात्मकता घराबाहेर जाईल..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! रात्री झोपताना ग्लासभर पाणी उष्ट करू इथे ठेवा, नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल. मित्रांनो अनेक लोक चिंताग्रस्त असतात की आम्ही इतके प्रयत्न केले मात्र यश मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी माघारच हाती पडते, यश मिळत नाही, चिडचिड वाढते कुटुंबांमध्ये आपला स्वभाव इतका विचित्र बनतो कि आपल्या घरच्यांशी आपलं पटत नाही. समाजापासून आपण दूर जाऊ लागतो. हे सगळं असं का होतंय ? मित्रांनो ज्याप्रकारे जगामध्ये चांगल्या शक्ती आहेत अगदी त्याच प्रमाणे वाईट शक्ती देखील आहेत.

ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी असं म्हणतो. जेव्हा जेव्हा एखादी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरात प्रवेश करते तुमच्या लाईफ मध्ये एन्ट्री करते तेव्हा तेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी अपयश पदरी पडू लागतं. प्रत्येक ठिकाणी अपयश. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही.

घरामध्ये सर्व गोष्टी आहेत सगळे आलबेल आहे परंतु सुख-शांती नाही. ही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला कोणत्याच पद्धतीने सुखाने जगू देत नाही. प्रत्येक माणसापासून आपल्या ती तोडायला पाहते आपल्याला निराश करू पाहते. आपण डिप्रेशन मध्ये जातो. आपले सर्व निर्णय कोणताही निर्णय सुरुवातीला तो बरोबर वाटतो मात्र नंतर तो निश्चितपणे चुकतो.

आपण स्वतःलाच मूर्ख समजू लागतो. हे सर्व निगेटिव्ह एनर्जीच्या आपल्यावर असणाऱ्या प्रभावामुळे घडत असत. या निगेटिव्ह एनर्जी पासून सुटका कशी करून घ्यावी ? मित्रानो तुम्ही कधी एखाद्या नदीकिनारी गेलात, स्मशानात गेला किंवा निर्जनस्थळी गेलात एखाद्या सुनसान जागी गेलात तर अशा वेळी चुकून अशा काही चुका आपल्याकडून घडतात.

काही वस्तूंना स्पर्श होतो, काही वस्तू पायाने ओलांडल्या जातात त्यावर पाय पडला जातो किंवा ज्या व्यक्तीला तुमचं भलं पाहवत नाही चांगलं पाहवत नाही त्या व्यक्ती आपल्यावर ती काही ना काही वाईट बाधा निर्माण करतात. तर मित्रानो अशावेळी घाबरून जाऊ नका. एक अत्यंत प्रभावशाली उपाय आज सांगत आहे.

आपण झोपताना एक ग्लासभर पाणी घ्यायच आहे. थोडसं पाणी त्यातल प्या , तोंड लावून प्या. हे पाणी उष्ट करा आणि त्यानंतर हे ग्लासभर पाणी आपण आपल्या बेडखाली जो तुमचा बेड आहे , कॉट आहे त्या कॉट खाली ठेवायचे आहे. जर कॉट नसेल आणि तुम्ही खाली जमिनीवर झोपत असाल तर तुमच्या डोक्याच्या शेजारी किंवा तुमच्या पलीकडे अगदी जवळपास कुठेही शरीराच्या जवळपास तुम्ही तो ग्लास ठेवू शकता.

परंतु ठेवल्यानंतर धक्का लागून तो ग्लास सांडणार सांडणार नाही याची मात्र काळजी घ्या. यासोबतच एका सफेद रंगाच्या कागदावर आपण लिहायच आहे की जी निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे तिने घरातून निघून जाव. किंवा आपली इच्छा लिहायची आहे की वाईट शक्तींपासून माझी सुटका वही माझी माझ्या कुटुंबियांच्या सुटका व्हावी.

फक्त अशी आपली इच्छा त्या कागदावर लिहायची आहे. हा कागद ती इच्छा लिहिल्यानंतर पालथा घालायचा आहे. म्हणजे इच्छा जी आहे ती खाली जमिनीला स्पर्श करेल. कागद पालथा घातल्यानंतर त्यावर तो ग्लास ठेवायचा आहे. जर तुम्हाला अशी शंका आहे कि तुमच्या घरात एखाद्या विशिष्ट खोलीमध्ये एखाद्या विशिष्ट कोपऱ्यामध्येच ही नकारात्मक शक्ती वास करते.

तर त्या ठिकाणी कागद न ठेवता फक्त उष्ट पाणी जर तुम्ही दररोज ठेवू लागलात तर रात्री झोपताना ही वाईट शक्ती तुमच्यापर्यंत येत सुद्धा नाही हे पाणी तिला त्या ठिकाणी अडवून धरतं. अगदी अविश्वसनीय अशा प्रकारच्या गोष्टी आहेत मात्र आपण नक्की करून पहा. तर मित्रानो अशाप्रकारे रात्रभर हा कागद हे पाणी त्या ठिकाणी असेल.

सकाळी उठल्यानंतर पहिलं काम आपण हे करायच आहे. हे जे पाणी आहे त्या पाण्याला स्पर्श न करता ग्लास उचलायचा आहे आणि जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे तोंड करून ते ग्लासभर पाणी त्या ठिकाणी फेकून द्यायच आहे.पाण्याला स्पर्श करू नका. दुसरी गोष्ट जो कागद आहे पालथा घातलेला तो कागद घेऊन आपण थोडासा कापूर आपल्या लागेल.

जर शामवर्णाचा म्हणजेच थोडासा काळा कापूर असेल तर अतिउत्तम. नसेल तर आपला सफेद पांढरा कापूर सुद्धा चालेल. तर अशा कापराच्या सात ते आठ वड्या कागदात घ्यायच्या आहेत. त्यानंतर घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत किंवा घराच्या छतावर जाऊन एका खोलगट भांड्यात हा कागद टाकायचा आहे.

आता तो कागद त्या भांड्यात जाळून टाकायचा आहे. जाळण्यास सुरुवात केल्यानंतर आपण लांब जाऊन थांबा , दूर जाऊन थांबा. जाळल्यावर जो धूर येईल तो तुमच्यापर्यंत येणार नाही याची काळजी घ्या. तो कागद संपूर्ण जाळल्यानंतर आपण थोडंस पाणी घ्यायच आहे. ग्लास दोन ग्लास पाणी त्या भांड्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून ती जी जळालेली राख आहे..

ती त्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि नंतर या पाण्याला अजिबात सुद्धा स्पर्श न करता हे पाणी आपण टॉयलेटमध्ये फ्लश करायच आहे. ज्यांना फ्लश करता येत नसेल त्यांनी गटार असेल किंवा घाण पाणी वाहत त्या पाण्यात टाकून द्या. धुराचा किंवा त्या पाण्याचा तुम्हाला स्पर्श होणार नाही याची मात्र काळजी घ्या.

पहिल्याच दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसून येईल. तुमची काम होऊ लागतील. लोक जे तुमच्या पासून दुरावलेले आहेत तुमच्या जवळ येऊ लागतील. मित्रानो आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. पहिल्याच वेळी तुम्हाला रिझल्ट आलेला दिसेल आणि तर रिझल्ट आला नाहीच तर ती वाईट शक्ती खूपच शक्तिशाली आहे.

आणि अशा वेळी तुम्ही दररोज हा उपाय करू शकता. मित्रानो मसाल्यामधील जो तेजपत्ता आहे तो नेहमी तुमच्या जवळ ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटू लागेल , कोणीतरी आजूबाजूला आहे असा भास होईल तेव्हा एक तेजपत्ता जाळा. माचीस सुद्धा नेहमी जवळ ठेवा.

मी माचीस ज्याच्या जवळ असत त्याच्या जवळ निगेटिव्ह शक्ती शक्यतो येत नाहीत. माचिसने हा एक तेजपत्ता जाळा त्याचा धूर होऊ द्या. निगेटिव्ह एनर्जी त्या दिवसापुरती त्या रात्री पुरती तुमच्या जवळ भटकणार सुद्धा नाही. मात्र हा उपाय तात्पुरता आहे. या निगेटिव्ह एनर्जीला कायमस्वरूपी तुमच्या जीवनातून बाहेर काढायच असेल तर हा रात्री झोपताना करावयाचा उष्ट्या पाण्याचा उपाय नक्की करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular