Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकभद्रा काळात चुकूनही भाऊरायाला राखी बांधू नका.. जाणून घ्या शुभ दिशा आणि...

भद्रा काळात चुकूनही भाऊरायाला राखी बांधू नका.. जाणून घ्या शुभ दिशा आणि विधी.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी जर राखी बांधण्याच्या वेळेबाबत तुमच्या मनात पेच निर्माण असेल तर.. याचे कारण आहे भद्रा नक्षत्र. भद्रा नक्षत्रामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास शास्त्रानुसार मनाई आहे.

यावेळी रक्षाबंधन गुरुवार 11 ऑगस्ट रोजी साजरे होणार आहे. रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते म्हणून याला रक्षाबंधनाला म्हणतात.

यावेळी क्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याच्या वेळेबाबत पेच निर्माण झाला आहे का.? याचे एकमेव कारण भद्रा नक्षत्र आहे. या भद्रा नक्षत्रामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यावर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती आहे. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रक्षाबंधनची तिथी – काशी पंचांग नुसार, श्रावण महिन्याची पौर्णिमा गुरुवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 09:34 पासून सुरू होते आणि दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 05:58 पर्यंत असते. 12 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सूर्योदयाच्या आधी संपत आहे. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत 11 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस श्रावण पौर्णिमा असल्याने या दिवशी रक्षाबंधन साजरे करणे योग्य आहे.

राखी बांधण्याची वेळ – 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वात मोठी समस्या भाद्रच्या मुहूर्ताची आहे. 11 ऑगस्ट रोजी भद्रा सकाळी 09:34 ते संध्याकाळी 04:26 पर्यंत आहे. त्यामुळे संपूर्ण भाद्र काळात राखी बांधता येणार नाही. अशा स्थितीत 11 ऑगस्टला 04:26 मिनिटांपासून पुढे तुम्ही राखी बंधू शकता.

राखी बांधताना ही असावी दिशा -‌ राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे असे ज्योतिषी सांगतात. त्याचबरोबर भावाची पाठ पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावी. त्याचबरोबर भावाने राखी बांधताना डोक्यावर रुमाल किंवा छोटेसे कापड नक्की ठेवावे. डोक्यावर रुमाल ठेवल्यानंतर बहिणीकडून तिलक लावून घ्यावा आणि मगच राखी बांधून घ्यावी. हेच शुभ असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular