नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो भगवद गीतेमध्ये एक वाक्य सांगितले आहे ते म्हणजे, ‘जे होतं ते चांगल्यासाठीच होतं” जर द्रोपदी चं वस्त्रहरण झालं नसत तर महाभारत घडलंच नसतं. आणि महाभारत असलेली भगवद गीता आपल्याला कधी समजलीच नसती. आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात. त्या गोष्टींचा भविष्याशी काहीतरी अर्थ असतो. आणि हा अर्थ नेहमी चांगला असतो. याविषयी एक प्रचलित कथा आहे ती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
एक साधू महाराज होते. ते नेहमी या गावातून त्या गावात असे भटकत असत आणि लोकांना भगवंताचे कार्य समजावून सांगत असत. त्यांच्याकडे एक देवाचा ग्रंथ, एक बकरी, एक गाढव, एक दिवा या अशा या चारच गोष्टी होत्या. गावामध्ये जात होते. त्या गावातून ते भिक्षा घेऊन आपला उदरनिर्वाह करत होते. आणि भगवंताचे कार्य करत आपला दिवस घालवत असत. आणि रात्री दिव्याच्या उजेडात मध्ये ग्रंथाचे वाचन करत असत. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता.
एकदा ते एका गावामध्ये गेले, या गावातील सर्वच लोक हे नास्तिक होते. ते कधीही भगवंतावर विश्वास न ठेवणारे त्यामुळे त्या गावात येणारा साधू ना ते कधी विचारतच नव्हते. “भिक्षा देणार नाही! आणि आमच्या गावांमध्ये तुम्ही थांबायचं नाही!!” असे त्या गावातील गावकरी साधुसंतांना म्हणत असे. त्याप्रमाणे बुवानाही अशी धमकी त्यांनी गावकऱ्यांनी दिली. हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटले.
असा प्रश्न पडला की, “इतक्या रात्री आता आपण कुठे जायचे?” असा विचार करत असताना त्यांच्याजवळ एक म्हातारी काठी टेकीत टेकीत आलि आणि म्हणाली, “मी एकटीच असते म्हणून मी थोडासा स्वयंपाक केला होता. आता हे थोडे जेवण उरली आहे. ते तुम्ही खाऊन घ्या!
माझी झोपडी खूप लहान आहे आणि गावातील लोकांनी तुम्हाला मी आसरा दिला आहे असे कळाले तर, ते मला गावातून बाहेर काढतील म्हणून मी तुम्हाला आसरा देऊ शकत नाही. त्यासाठी मला क्षमा करा! पण इथून थोडे पुढे अंतर चालत गेल्यावर जंगल लागेल त्या जंगलात तुम्ही एका झाडाखाली आश्रयाला थांबू शकतात!”
हे म्हातारीचे बोलणे ऐकून साधू महाराजांना खूप बरे वाटले. आणि त्यांनी म्हातारीला आशीर्वाद देऊन बोलले. “जे होतं ते चांगल्यासाठीच होतं!” असं बोलून ते पुढे जंगलाच्या दिशेने चालू लागले. जंगलात एका झाडाखाली गाढवाला बांधले.
थोड्या अंतरावर बकरीला बांधून व थोड्या अंतरावर आपला झोपण्याची जागा तयार केली. म्हातारीने दिलेली भाजी पोळी खाऊन ते दिवा लावून पुन्हा ग्रंथ वाचायला बसले. तेव्हा खूप सोसाट्याचा वारा सुटला आणि दिवा विजला. त्यांनी पुन्हा दिवा पेटवला तू पुन्हा वाराने विजला.
त्यावेळी साधू महाराजांना खूप वाईट वाटले. ते देवाला म्हणाले, “आता तू मला ग्रंथ तरी वाचू देणार आहेस की नाही!” असे बोलून त्याने पुन्हा दिवा लावला आणि तू ही दिवा पुन्हा विझला. असे घडल्याने साधुमहाराज खूप क्रोधीत झाले.
त्यांनी दोन्ही बाजूला ठेवून “जे होतं ते चांगल्यासाठीच होतं” असे म्हणून ते झोपत होत्या तोवर त्यांना त्यांच्या बकरीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी बघितले तर काही लांडगे बकरीला ओढून येत आहेत. असे त्यांना दिसले. ते देवाला म्हणाले, “तू आज माझी परीक्षा घेणार आहेस का? असो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं” असं म्हणून ते पुन्हा झोपी गेले.
मध्यरात्री त्यांना गाढवाचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी उठून पाहिले तर त्यांना समजले की दोन-तीन वाघ त्यांच्या गाढवाला ओढून नेत आहेत. हे पाहून त्यांना खूपच दुःख झाले ते भगवंतांना म्हणाले, “माझ्याकडे फक्त चारच वस्तू होत्या तर मला तू आता दोन काढून घेतल्यास.
पण असो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं!” तसं बोलून ते पुन्हा झोपी गेली. सकाळी उठून आपला दिवा व ग्रंथ घेऊन आपली यात्रा सुरु केली. त्यांच्या बरोबर त्यांचे गाढव बकरी नव्हते याचे त्यांना फार दुःख होते. ते परत त्या गावात आले.
तेव्हा त्यांना दिसलं की, सर्व लोक खूप दुःखी आहेत आणि रडत होते. म्हातारीच्या झोपडीजवळ जाऊन त्यांनी चौकशी केली तर त्यांना असे कळले की, रात्री द’रो’डेखोर येऊन खूप लु’ट’मार केली व त्यांना ज्यांनी विरोध केला त्यांना खूप मारले. गावातील सर्व संपत्ती त्यांनी घेऊन गेली आहे.
म्हणूनच गावातील सर्व लोक रडत आहे. साधू महाराजांनी म्हातारीला विचारले, “तुमच्याकडे चोरी झालय का?” म्हातारी बोलली, “माझ्याकडे काय आहे माझ्या झोपडीत चोरी करायला आणि जर आले असते तर त्यांना माझी दारिद्र्य बघून त्यांनाच माझी दया आली असती.”
म्हातारीचा अनुभवानं विचारले तुमची बकरी , गाढव कुठे आहेत? तेव्हा ते बोलले बकरीला लांडग्यांनी खाऊन टाकलं व गाढवाला वाघांनी खाऊन टाकलं. पण असो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हे बोलणे ऐकून म्हातारी सद्भावना मला म्हणाली, “तुमचं तर कालपासून खूप वाईट होत आहे.
तुम्हाला गावकऱ्यांनी गावात राहू देत आहे तुमची लांडगे व बकरी मेली तरीही तुम्ही म्हणताय जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असे का?” यावर साधु महाराज बोलले जर भगवंतावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर स्वाधीन झाले तर तो आपले उतरणीवर आहोत नक्कीच करतो.
गावातील लोकांनी मला भोजन दिले नाही कारण ते नास्तिक होते त्यांनी जर मला भोजन दिले असते आणि मीही ते खाल्ले असते तर मी ही नसतील झालो असतो. म्हणून भगवंताने मला त्यांच्याकडून दीक्षा मिळू दिली नाही. परंतु माझ्या पोटापाण्याची सोय तुमच्याकडे करून ठेवली होती. गावातील लोकांनी मला गावात राहू दिले नाही तेही बरे झालो कारण रात्री दरोडेखोरांनी मलाही मारला असतं.
रात्री माझा दिवा विझला होता म्हणून मी ग्रंथ वाचत बसलो नाही झोपी गेलो. ज्यावेळी लांडगे माझ्या बकरीला नेत होते त्यावेळी माझा दिवा चालू असता तर त्या लांडग्यांनी मलाही खाल्ला असतो आणि ज्यावेळी गाढवावर वाघाने हल्ला केला तेव्हा जर गाढव नसतो तर माझ्यावर हल्ला केला असता.
याप्रमाणे भगवंत आपल्यासमोर जे करतो ते चांगल्यासाठीच होतं. म्हणून मी आपल्याला असेच विचार साधना ठेवली पाहिजे की, “जे होतं ते भल्यासाठीच होतो चांगल्यासाठीच होतं” फक्त आपण त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ मिळतच असतो.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!