Saturday, June 8, 2024
Homeआध्यात्मिकभिक्षा आणि भीक या दोघांमध्ये काय फरक आहे.? जाणून घ्या स्वामींच्या मुखातून.!!

भिक्षा आणि भीक या दोघांमध्ये काय फरक आहे.? जाणून घ्या स्वामींच्या मुखातून.!!

नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! भिक.. भिक्षा.. भिक्षावळ हे शब्द दिसायला जरी एक सारखे असेल तरी त्या प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. पौराणिक कथा वाचताना भिक्षा मागून जगत होता असा उल्लेख अनेकदा आपल्याला वाचायला मिळतो. अध्या त्मात भिक्षेला महत्त्वाचे स्थान आहे.

भिक्षेने देहबुद्धी कमी करता येते आणि वैराग्याचा उदय होतो. भगवंतालासुद्धा भिक्षा पसंत आहे. भगवान शिव शंकर, गुरुदत्तात्रेय, गोररक्षनाथादी सिद्ध पुरुष भिक्षा मागतात असे सांगितले आहे. ‘भिक्षा’ हा शब्दप्रयोग भीक शब्दापेक्षा थोडा उच्च आणि सन्माननीय आहे. तो शब्द संस्कृत भाषेतील आहे.

बहुतांशी ब्राह्मणांमध्ये तो वापरला जातो. भिक्षा मागून राहणारा अर्थात ब्राह्मण. ब्राह्मणाकडेच भिक्षा मागून निर्वाह करणारा तो ब्रह्मचारी किंवा संन्यासी असतो. तो केवळ स्वत:च्या गरजेएवढे अन्न, धान्य मागतो. कारण तो एकटा राहतो. त्याला धनसंग्रहाची आवश्यकता नसते. मोह नसतो. निर्वाहासाठी अशी भिक्षा मागणाऱ्या ब्राह्म णाला ‘भिक्षू’ किंवा बटू म्हणत. आता ते फक्त मुंजीत असतात.

ज्या ब्राह्मण, ब्रह्मचाऱ्याची मुंज झालेली असेल, तो ब्रह्म चारी काही घरांत भिक्षा अर्थात दान मागतो. त्या दानाला ‘भीक’, ‘भिक्षा’ न म्हणता ‘भिक्षाळ’ किंवा ‘भिक्षावळ’ म्हणून संबोधतात. तसा विधी मुंजीत असतो. धार्मिक रूढी, संस्कार म्हणून त्याला त्या काळात भिक्षा मागावी लागते.

त्या ब्रह्मचाऱ्याला ‘बटू’ किंवा ‘बटूक’ असे संबोधले जाते. पुराणकथेनुसार विष्णूने वामनावतारात भिक्षेचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्यमात्र जन्मत: भिक्षुकच असतो, कारण त्याला आईकडून दूध मिळते, गुरुकडून शिक्षण वगैरे. वामन हा बटू म्हणून जन्म घेतो आणि बळी राजा ला त्याच्या राज्यात स्थित करून त्याचा अहंकार संपवतो. त्यामधूनच व्रतबंधात बटूने भिक्षांदेही मागण्याचा संस्कार आला.

‘भिक्षुकी’ हा शब्द त्यातूनच व्यावसायिक कारणाने निर्मा ण झाला. ‘भिक्षुक’ हा शब्दप्रयोग विशेषत: याज्ञिकीवर निर्वाह करणाऱ्या ब्राह्मणांसाठी वापरला जातो. त्याला ‘याज्ञिक’ही संबोधतात. याज्ञिक हा अग्नी ठेवून होम करण्याचे शास्त्रोक्त कर्म करतो. तो लग्न, मुंज इत्यादी धर्मकृत्ये चालवण्याचे अनुष्ठान जाणणारा असतो.

तो त्यांच्या परिवाराचा निर्वाह धर्मकृत्यातून मिळणारे दान ‘दक्षिणा’ या वर करतो. त्याला जे काही धन-धान्य लग्न, मुंज, श्राद्ध अशी वेगवेगळी धार्मिक कृत्ये केल्यावर यजमानांकडून दिले जाते त्याला दान, भीक म्हणता येत नाही. तो त्याच्या कामाचा, श्रमाचा मोबदला असतो. त्याला दक्षिणा किंवा बिदागी म्हणतात.

समर्थ संप्रदायात भिक्षेचे नियम दिलेले आहेत. मेखला, शिरोवस्त्र, झोळी, कमरेस बांधावयाचे राम नामांकित वस्त्र व भगवे निशाण अशी पंच वस्त्रे भिक्षेच्या वेळी असावीत. भिक्षा मागून झाल्यावर मनोबोधातील शेवटचा श्लोक म्हणून झोळी देवापुढे ठेवावी व तिची पूजा करून ‘सुरवरवरदायिनी’ ही आरती म्हणावी, असा भिक्षेच्या आचाराचा भाग समर्थ रामदासांनी सांगितला आहे. समर्थांनी ‘भिक्षा निरुपण’ या समासात भिक्षेचे फायदे, पद्धती समजून सांगितल्या आहेत.

ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा॥ ईश्वराचा अगाध महिमा। तोही भिक्षा मागे॥ दत्तगोरक्ष आदिकरुनी । सिद्ध भिक्ष मागती जनी॥ निस्पृहता भिक्षेपासुनी। प्रगट होये ॥

आता भिक मागणे म्हणजे काय? गरजवंत मनुष्य गरज भागण्यासाठी दुसऱ्याकडे गरजेच्या वस्तूची मागणी करतो, हात पसरतो. म्हणजे याचना करतो. त्याला ‘भीक मागणे’ असे उपहासाने म्हटले जाते. दरवाज्यावर आलेल्या किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या पुढे हात पसरणा ऱ्याला ‘भिकारी’ म्हणून संबोधले जाते.

‘भिकारी’ मंदिरे, तीर्थक्षेत्रे, जत्रा अशा ठिकाणी असतात. भीक हा हीन, कमी प्रतीचा, निंदार्थी शब्द आहे. भीक लागणे, भिकेचे डोहाळे लागणे, भीक घालणे असे वाक्प्रचारही त्या पासून तयार झाले आहेत. एखादी वस्तू, माल खरेदी केला गेला आणि दुसऱ्याच्या दृष्टीने ती वस्तू, सामान हलकी ठरली तर त्या वस्तूला ‘भिकार’ असे म्हटले जाते.

भिकार म्हणजे टाकाऊ, हीन, खालच्या दर्ज्याची. ‘भिकारडा’ असाही शब्द आहे. पु.ल. देशपांडे यांच्या ‘तीन पैशांचा तमाशा’मध्ये भिकारी आणि भीक मागणे हा कसा संघटित मोठा गुन्हा बनला आहे त्याचे दर्शन होते.
भीक, भिक्षा, भिकारी, भिकार ही नामे, विशेषणे सर्वसामान्य याचकांसाठी वापरली जातात. ती दारोदार जाऊन अगर एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्याकडे दान मागतात, त्यांच्यासाठी आहेत.

ती एक प्रवृती समाजात वाढत गेलेली आहे. ती संबोधने विशिष्ट व्यक्ती अथवा जमाती यांच्यासाठी वापरली जात असत. कालांतराने, ती समस्त याचक प्रवृत्तीसाठी वापरली जाऊ लागली. भीक हा शब्द उपहासात्मक, निंदार्थी, तुच्छतादर्शक वाटतो, म्हणून त्या सर्व शब्दांना एकच सोज्वळ, चकचकीत शब्द निर्माण करण्यात आला.

तो म्हणजे ‘माधुकरी’ त्यात भीक, भिकारी आणि भिक्षा या दोन्ही संकल्पना सामावलेल्या आहेत. प्राचीन भारतात भिक्षा मागण्याची प्रथा अध्यात्मिक परंपरेचा एक भाग होता. एक अध्यात्मिक साधक आपल्या दरवाज्यावर येऊन भिक्षा मागतोय त्याला अन्नदान करणे म्हणजे मोठं भाग्य असे समजले जात होते. स्वतःमधील मी पणा कमी करण्याचे साधन म्हणूनही भिक्षेकडे पाहण्यात येते.

एक संन्यासी अध्यात्मिक उन्नतीसाठी भिक्षा मागतो. एक भिक्षुक होणं ही काही छोटी बाब नाही असे सद्गुरु म्हणतात. म्हणून भिक्षा, भिक, भिक्षावळ या सगळ्याचा अर्थ वेगळा आहे. एका ठिकाणी मी वाचलं होतं भीक मागणे ही वृत्ती आहे, प्रवृत्ती नव्हे. भिकेची सोपी व्याख्या म्हणजे जी परावलंबी बनवते ती भीक आणि जी स्वावलंबी बनवते ती मदत असते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular