नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणार सण आहे. या दिवसात शेतामध्ये धन धान्य बहरलेलं असतं. त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो.
या दिवशी सकाळी आपले घर स्वच्छ करायचं असतं. सभावतालचाही परिसरही स्वच्छ करायचा असतो. दरवाजासमोर रांगोळी काढायचे. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवनवीन अलंकार धारण करतात.
या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढविणाऱ्या घटकांचा त्यामध्ये समावेश असतो. मित्रांनो भोगी हा इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातला पहिला सण आहे. हा पहिला सण जानेवारीच्या मध्यानात येतो. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. मित्रांनो या दिवशी इंद्र देवतेने आपल्या शेतजमिनीमध्ये उदंड पिक पिकवावी म्हणून त्याची प्रार्थना केली जाते अशीही मान्यता आहे.
ती पिक वर्षानुवर्षे पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती सुद्धा दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा तरी विसावा मिळतो.
मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तेलमिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उबदार प्रेमाचा अनुभव घेतो. त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यासाठी तो सज्ज होतो. मराठवाड्यात या भाजीला खेंगट अस म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरुवात होते.
या सणाला भारतभर वेगवेगळी नाव सुद्धा आहेत. म्हणजे तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा होतो. तर आसाममध्ये भोगली बिहू, पंजाबमध्ये लोहिरी आणि राजस्थानमध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.
नवा बदल केला जातो म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची असते. या भोगीच्या सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. खास करून या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी करतात.
या भोगीच्या भाजीमध्ये हरभरा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर इत्यादी भाज्या घातल्या जातात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्याच्यावर मस्त लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते.
त्यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याची पद्धत वेगवेगळ्या भागात वेगळी आहे. अशा प्रकारे सण साजरा केला जातो. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहवा अश्या शुभेच्छा दिल्या जातात.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!