Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकभोलेनाथांचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी.. पावन श्रावण महिन्यात खरेदी करा या गोष्टी.. एका...

भोलेनाथांचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी.. पावन श्रावण महिन्यात खरेदी करा या गोष्टी.. एका महिन्यात फळ मिळेल.!!

मित्रांनो, श्रावण महिन्यात काही खास गोष्टी घरी आणल्याने सुख-समृद्धी वाढते. या महीन्यात भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्व सांगितले आहे. श्रावण सोमवारी भगवान शंकराची आराधना केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या शुभ मुहूर्तावर शिवलिं*गावर जल, दूध, धतुरा, भांग, बेलपत्र इत्यादी अर्पण केल्यास सर्व संकट दूर होतात. ज्योतिषांच्या मते, श्रावणामध्ये काही खास गोष्टी घरी आणल्याने सुख-समृद्धी वाढते अशी मान्यता आहे. भस्म- शास्त्रानुसार जिथे इतर देवी-देवतांना सुंदर वस्त्र आणि अलंकार आवडतात, तिथे भगवान शिवाचे रत्न अतिशय वेगळे आहे.

त्याचबरोबर मित्रांनो भगवान शिव यांना भस्म खूप प्रिय आहे. हे भस्म ते त्यांच्या शरीरावर लावतात. श्रावण महिन्यात तुम्ही भस्म घरी आणू शकता. पूजेच्या दुकानात भस्म विकत मिळते. शिवलिंगावर भस्म लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे त्रिशूल. मित्रांनो त्रिशूल हे भगवान शंकराचे शस्त्र आहे. असे म्हटले जाते की, ज्या घरात भगवान शंकराचे त्रिशूळ असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुम्ही चांदीचा त्रिशूळ आणून मंदिरात ठेवू शकता. जर तुम्हाला चांदीचे त्रिशूल खरेदी करता येत नसेल तर तुम्ही तांब्याचे त्रिशूळ देखील घेऊ शकता.

त्याचबरोबर मित्रांनो त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष. मित्रांनो महापुराणानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती ही महादेवांच्या अश्रुमधून म्हणजेच डोळ्यांच्या पाण्यातून झालेली आहे. आणि म्हणून त्यांना भगवान शिव शंकराचे अंश म्हंटले जाते. श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ नक्की घेऊन या. घरामध्ये सुख , समृद्धी येईल. घरामध्ये काही समस्या असतील तर त्या नक्की दूर होतील. रुद्राक्षाची माळ श्रावण महिन्यामध्ये घालणे अतिशय शुभ आहे. वैवाहिक जीवनामध्ये काही अडचण असेल किंवा सतत भांडणे होत असतील तर हा गौरी शंकर रुद्राक्ष नक्की घरी घेऊन या.

मित्रांनो पुढची वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र. मित्रांनो प्रत्येक सोमवारी तुम्ही महादेवांना बेल पत्र वाहतच असाल. चांदीचे बेल पत्र हे खूप कमी किमतीमध्ये मिळते. जर तुम्हाला जमत असेल तर हे नक्की घेऊन या. पाण्याने स्वच्छ धुवून ते पुन्हा वापरू शकता.श्रावण महिना संपल्यानांतर हे बेलपत्र तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवावे. सुख समृद्धी आणि कामातले अडथळे नक्की दूर होतात. गंगाजल किंवा कोणत्याही नदीचे पवित्र जल कोणत्याही तीर्थस्थानी किंवा मंदिराच्या बाहेर दुकाने असतात तिथे हे गंगाजल नक्की मिळते. गंगा आणि भगवान शिवशंकराचे खूप जवळचे नाते आहे.

मित्रांनो हे गंगाजल घरी आणल्या नंतर धनाची सर्व समस्या दूर होतात. पैसा सातत्याने वाढत जातो. नंतर सुद्धा हे गंगाजल देवघरामध्ये ठेवून द्या. त्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाही. आणि त्याचबरोबर मित्रांनो डमरू मधून जो विशिष्ट प्रकारचा आवाज बाहेर पडतो त्याने नकारात्मक गोष्टींचा अंत होतो. घरातील बाधा दूर करतो. श्रावण महिन्यामध्ये एक डमरू खरेदी करून नक्की घेऊन या आणि दररोज संध्याकाळी देवपूजा करत असताना हे डमरू नक्की वाजवा. जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर घरामध्ये हे डमरू ठेवून द्या. त्या घरातून भय निघून जाते.

मित्रांनो बरेच लोक श्रावण महिन्यामध्ये चांदीचा नाग खरेदी करून आणतात आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवतात . वाईट शक्तींनी घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून हा उपाय केला जातो. तुम्ही सुद्धा चांदीची किंवा तांब्याची नाग मूर्ती खरेदी करा. नीट व्यवस्थित पूजा करून मुख्य दरवाजाजवळ लावा. कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. मित्रांनो वर सांगितलेल्या वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये आणली तर यामुळे भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून भगवान शंकर तुमची सुटका करतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular