Saturday, June 22, 2024
Homeआध्यात्मिकसर्वात मोठी कार्तिक पौर्णिमा ‘येथे’ लावा 5 दिवे.. घरात सौख्य नांदेल.. भरभराटी...

सर्वात मोठी कार्तिक पौर्णिमा ‘येथे’ लावा 5 दिवे.. घरात सौख्य नांदेल.. भरभराटी होईल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो कार्तिक महिन्याचा प्रारंभ हा दीपोत्सवातल्या महत्त्वाच्या सणांनी होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही बलिप्रतिपदा म्हणून, तर द्वितीया ही तिथी यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज म्हणून साजरी केली जाते. याशिवाय याच महिन्यात एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचं पूजन केलं जातं. या महिन्यात अन्य तिथींप्रमाणे पौर्णिमेलाही विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. मित्रांनो या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा संबोधलं जातं. या दिवशीच भगवान शंकराने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता.

या आनंदात देवगणांनी दिवाळी साजरी केली होती. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णु यांची कृपा मिळवण्यासाठी खास दिवस असतो. यंदा 8 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे. मात्र खग्रास चंद्रग्रहण असल्याने सुर्योदयापासून सकाळी 8 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 नंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करू शकता. मित्रांनो दिवाळीच्या बरोबर 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते. हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

कार्तिक महिन्यातील पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. यावेळी कार्तिक पौर्णिमा मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी आहे. कार्तिक पौर्णिमा 2022 ही पौर्णिमा सर्वात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवाळीतही घरोघरी दिवे लावून पूजा केली जाते. असे म्हणतात की या पौर्णिमेच्या पूजेने देव नेहमी प्रसन्न होतो.या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा अंत केला होता. या आनंदात देवतांनी दिवा लावून हा दिवस साजरा करण्यात येते.

तसेच मित्रांनो आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये पाच दिवे लावायचे आहे हे मित्रांनो दिवे जर आपण आपल्या घरामध्ये या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लावले तर यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होईल आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीने आपल्याला या दिवशी पाच दिवे आपल्या घरात लावायचे आहे आणि ती कुठे कुठे लावायचे आहेत.

याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेऊया सकाळची देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरासमोरच बसून पाच दिवे तयार करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर त्यामधील सर्वात पहिला दिवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर लावायचा आहे, मित्रांनो जर तुमच्या देवघरांमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तिच्यासमोर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतरचा दुसरा जो आहे.

तो आपल्याला तुळशीमातेसमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतरचा तिसरा दिवा आहे तो आपल्या स्वयंपाक घरामध्ये गॅसच्या बाजूला म्हणजेच आपल्या गॅस कट्ट्यावरच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि उरलेले जे दोन दिवे आहेत ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजा समोर एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर असे हे पाच दिवे आपल्या घरामध्ये या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लावले त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करेल आणि तिचा आशीर्वाद ही आपल्या सोबत कायम राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular