Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकब्राह्मणास न बोलवता तुलसी विवाह कसा करावा.? तुलसी विवाहाचा विधी.. आणि संपूर्ण...

ब्राह्मणास न बोलवता तुलसी विवाह कसा करावा.? तुलसी विवाहाचा विधी.. आणि संपूर्ण पूजा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! दिवाळीची लगबग संपून होते तोच आता सर्वांना तुळशी विवाहाची ओढ लागून असते. कारण आपल्या हिंदू धर्मात तुळशीचा विवाह झाल्याशिवाय विवाह संस्कार साजरे केले जात नाहीत. म्हणजेच तुळशीचा विवाह सोहळा एकदा संपन्न झाला की, त्यानंतरच लग्नाच्या तारखा निघतात. आपल्याकडे घरोघरी तुळस असते व तिचा विवाह सोहळा प्रत्येक घरी आनंदात साजरा केला जातो. मी आज तुम्हाला तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त, त्याचे योग्य वेळ आणि पूजा विधी सांगणार आहे. कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षात जी कार्तिकी एकादशी येते तिला आपण देवउठनी एकादशीही म्हणतो. त्या एकादशीला तुळशीचा विवाह लावला जातो.

हा एक अ ध्या त्मि क व मंगलकारी उत्सव आहे. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी तुळशीचा विवाह श्रीहरी विष्णूंशी लावला जातो. कारण या दिवशी श्रीहरी विष्णू चार महिन्याच्या निद्रेतून उठतात. श्रीहरी विष्णूना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीचे एक नाव वृंदा ही आहे. ज्यावेळी नारायण निद्रेतून जागे होतात त्यावेळी सर्वात आधी ते हरी वल्लभा तुळशीचे म्हणणे ऐकतात. म्हणून तुळशी विवाहाला देव जागराणाचा पवित्र मुहूर्त मानले जाते. यावर्षी तुळशी विवाह शनिवारी 5 नोव्हेंबरला म्हणजेच आज आहे.

तुळशी विवाह लावल्याने अन्नदानाचे फळ प्राप्त होते आणि हिंदू धर्म शास्त्रानुसार गो दान व कन्यादान हे सर्वात मोठे दान मानले जाते. म्हणून तुळशी विवाह करणे अत्यंत आवश्यक आहे. तुळशी विवाह शालिग्राम ठेवून संपूर्ण विधीवत केले जाते. परंतु काही व्यक्ती मंदिरात जाऊन किंवा घरी ब्राह्मणाला बोलावून तुळशी विवाह करू शकत नाहीत. म्हणून आज मी तुम्हाला आपण घरच्या घरी ब्राह्मण न बोलावता कशाप्रकारे तुळशीचा विवाह करू शकतो ते पाहणार आहोत.

सर्वात आधी तुळशीच्या विवाहासाठी कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता आहे ते आपण पाहूया. एक तांब्या, आंब्याची पाने, पाणी, नारळ, लाल रंगाची ओढणी, पिवळे कापड, गंगेचे पाणी, पांढरे तीळ, हळद, कुंकू, कापूर, धूप, दीप, ऊस आणि वेलची, सुपारी, शृंगाराच्या वस्तू, आवळा व 5 फळे, 5 प्रकारची मिठाई खिरपुरी पंचामृत मसाला पान फुले माळा तुळशीची कुंडी शालिग्राम व दोन चौरंग ही सर्व सामग्री घेऊन तुळशी विवाहाची तयारी करावी.

त्यानंतर विवाह विधीची सुरुवात करावी. तुळशी विवाह सायंकाळी गोरख मुहूर्तावर केला जातो. त्यासाठी तुळशीच्या आसपासची जागा स्वच्छ करून शेणाने सारवावी आणि त्यावर सुंदर रांगोळी काढावी. आणि त्यानंतर 2 चौरंग मांडून एका चौरंगावर तुळस असलेली कुंडी व दुसऱ्या चौरंगावर शालिग्रामची किंवा श्री विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करावी. वरती ऊसाचा मंडप टाकावा. तुळशीच्या चौरंग श्री विष्णुंच्या उजव्या बाजूला ठेवावा.

त्यानंतर श्रीहरी विष्णूंच्या चौरंगावर कुंकवाने अष्टदल कमळ बनवावे आणि त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. आंब्याच्या पानांना कुंकू लावून ती कलशावर ठेवावे. त्यानंतर एक नारळ घेऊन ते एक लाल कापडात गुंडळावे व कलशावर ठेवावे. त्यानंतर तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. कारण अग्नीला साक्षी मानूनच तुळशीचा विवाह संपन्न केला जातो.

त्यानंतर गंगेच्या पाण्यात एक फूल बुडवून ते पाणी ओम तुळसीय नमः या मंत्राचा जप करीत ते पाणी तुळशीवर शिंपडावे. त्यानंतर त्याच फुलाने गंगेचे पाणी ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत शालिग्राम किंवा श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवर शिंपडावे. त्यानंतर तुळशीला हळद कुंकू आणि श्रीहरी विष्णूंना चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर दुधात हळद टाकून तुळशीला किंवा श्रीहरी विष्णूंना लावावी.

नंतर ज्याप्रमाणे आपण लग्नात वधुवरांना हळद लावतो त्याप्रमाणे हळदीचा विधी संपन्न करावा. त्यानंतर शालिग्रामवर किंवा श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवर तुळशीच्या मंजिरी व्हाव्यात. तुळशीला लाल ओढणी टाकावी. लाल रंगाच्या बांगड्या अर्पण कराव्यात आणि सौभाग्याच्या सर्व वस्तू अर्पण कराव्यात. त्यानंतर शालिग्रामला पंचामृताने स्नान घालावे.

आणि पिवळी वस्त्रे अर्पण करावीत व नंतर कलशावर एक फूल अर्पण करावे. त्यानंतर तुळशीला व श्रीहरी विष्णूंनाही फुल अर्पण करावे. त्यानंतर श्रीहरी विष्णूंना व तुळशी मातेला माळा अर्पण कराव्यात व त्यानंतर 1 लाल वस्त्र घेऊन त्याने त्यांचे गठबंधन करावे. त्या गट बंधनाच्या कापडात एका बाजूला फुल, वेलची व थोडीशी दक्षिणा ठेवावी.

त्यानंतर घरातील एखाद्या पुरुषाने तुळस असलेली कुंडी उचलून शालिग्राम ठेवलेला चौरंगाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. सातवेळा प्रदक्षिणा झाल्यानंतर तुळशीला तिच्या ठिकाणी स्थानापन्न करावे. त्यानंतर शालिग्रामला तीळ अर्पण करून कापूर व धूप ओवाळावा. तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर तुळशीला व श्रीहरी विष्णूंना मिठाई खीर पुरी व फळांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर तुळशीची आरती करावी आणि श्रीहरी विष्णूंची आरती करावी.

अशाप्रकारे तुळशी विवाह विधीवत संपन्न झाल्यानंतर तुळशीला शालिग्रामासोबत मंदिरात फिरवून आणावे. अशाप्रकारे अगदी साध्या व सोप्या पद्धतीने तुम्ही तुळशीचा विवाह घरच्या घरी संपन्न करू शकता. ज्यांना मुलगी नाही त्यांनी तुळशी विवाह जरूर करावा. कारण कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आणि तुळशी विवाह केल्याने आपल्याला श्रेष्ठ कन्यादानाचे फळ प्राप्त होते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular