Sunday, December 10, 2023
Homeआध्यात्मिकचांगली वेळ येण्यापूर्वी अंगणातील तुळस देते हे संकेत.!!

चांगली वेळ येण्यापूर्वी अंगणातील तुळस देते हे संकेत.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मामध्ये फार शुभ मानल जात. तुळशीला देवी लक्ष्मीच रूप मानल जात. धर्म, ज्योतिष याशिवाय वास्तुशास्त्रात देखील तुळशीला फार महत्त्व दिल गेल आहे. ज्या घरामध्ये तुळशीचे वास्तव्य असत, त्या घरात नेहमी सुख-समृद्धी नांदत असते व तिची रोज पूजा केली जाते. याशिवाय तुळशीच्या रोपामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता येते. त्यामुळे प्रत्येक घरात योग्य ठिकाणी तुळशीचे रोप लावणे चांगले मानल जात. घर आनंदी राहणे प्रत्येकाचेच स्वप्न असते आणि घरामध्ये सकारात्मक उर्जा टिकवण्याकरिता आपण अनेक गोष्टी करतो.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील प्रत्येक हिंदू घराची ओळख ही या दारामध्ये असलेल्या तुळशी वृंदावनाने होत असते. तुळशीची पाने छान हिरवीगार व भरलेली दिसली की, घरामध्ये आनंद दिसतो. कधीकधी घरामधील तुळशीमध्ये बदल होतो. म्हणजे तुळशीची पाने गळू लागतात. तुळस सुकू लागते. जर तुमच्या घरामधील तुळशीमध्ये असा काही बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण घरामधील तुळस काही संकेत देत असते. तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात ते जाणून घेऊया.

तुळशीचे रोप लावताना त्याच्याशी संबंधित काही नियमांचे पालन करणे फारच गरजेचे आहे. उदाहरणार्थ, तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये. तसेच शूज व चप्पल घालून तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीचे रोप अतिशय पवित्र आहे, आंघोळीनंतर तिला नेहमी स्पर्श करावा. याशिवाय रविवारी व एकादशीला कधीही तुळशीला पाणी देऊ नये. या दिवशी तुळस भगवान विष्णूकरिता उपवास ठेवतात व जल अर्पण करून उपवास तोडतात. याशिवाय रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली दिवा लावावा.

आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामधील हिरवी तुळस अचानक सुकली तर काही संकट येण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी सावध होऊन वाळलेल्या तुळशीचे रोप लगेच काढून परत लावावे. तसेच भगवान विष्णूची पूजा करावी. सुकलेली तुळस ही घराकरिता चांगली नसते. सुकलेली तुळस घरात ठेवणे हे अशुभ मानले जाते. काही कारणास्तव तुमच्या घरामधील तुळस सुकली असेल तर घरात काहीतरी भांडण-तंटे अथवा काहीतरी नकारात्मक उर्जा येण्याची शक्यता असते. तुळस सुकायला लागली असेल तर ती लगेच काढून टाका. त्याजागी नवी तुळस घरामध्ये आणून लावा. असे म्हणतात घरची तुळस ही घरावर येणारे संकट आपल्यावर ओढून घेत असते. त्यामुळे तुळस सुकत असते. घऱामधील तुळस काहीही न करता सुकत असतील तर तातडीने काळजी घ्या.

मित्रांनो घरात आपोआप तुळस उगवणे किंवा आपल्या घरातील बागेत आपोआप तुळस उगवली तर शुभ संकेत मानावा. घरामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे यामुळे समजते आणि त्याचबरोबर घराच्या बागेत आपोआप दुर्वा उगवणे हे शुभ संकेत मानले गेलेले आहे. दुर्वा ज्या आपण श्री गणेशाना अर्पण करतो त्या उगवल्यास समजावे घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत आणि काही व्यक्ती यावर विश्वासही ठेवणार नाहीत. पशु पक्षीही चांगल्या वेळेचे संकेत देतात. जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळेचे संकेत देतात.

आणि जर एखाद्या माकडाने आंबा खाऊन त्याची कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होणार आहे. असा याचा अर्थ होतो. आणि घरात धन धान्याची भरभराटही येते आणि जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही सकाळी सकाळी काही कामा निमित्त घराबाहेर पडलात व लहान बालक तुम्हाला खळखळून हसताना दिसले तर हे सुद्धा भगवंताद्वारे चांगल्या वेळेची सुरुवात आहे . परंतु काही जणांच्या घरी तुळशीचा वाढ होत नाही पण तुळशीची पाने गळत राहतात. पाने पिकणे म्हणजे घरामध्ये आजारपण येणे असे म्हणतात.

घरामधील एखादी व्यक्ती आजारी पडणार असेल तरी तुळशीमध्ये बदल होऊ लागतो. तुळशीच्या कुंडीतून हळूहळू पानगळती होऊन कोरडी होण्याकडे जाते. तुळशीची पाने अशी गळू लागली की, आरोग्याकडे जातीने लक्ष द्यायला हवे. तुळशीला योग्य पाणी घालणे, उन देणे हे सगळे करावे. घरामध्ये नवीन तुळशीचे रोप लावले व ते दोन दिवसामध्ये सुकून गळत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण आहे. पितृदोषामुळे घरामध्ये भांडणे होतात, ही दोन्ही चिन्हे दिसल्यास पितृदोष दूर करण्याचे उपाय ताबडतोब करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular