Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकचांगल्या लोकांच्या सोबतच नेहमी वाईट का घडते.? भगवान श्रीकृष्णांनी दिले उत्तर.. जरुर...

चांगल्या लोकांच्या सोबतच नेहमी वाईट का घडते.? भगवान श्रीकृष्णांनी दिले उत्तर.. जरुर वाचा..

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, चांगला लोकांसोबतच वाईट का घडत असते.? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. असे वाटत असते की, आपण कोणाचे वाईट केले नाही. कोणाची वाईट चिंतले नाही. काही सर्वांचे चांगले जावे असा विचार केला. सर्वांची मदत केली. तरी देखील माझ्यासोबतच वाईट का घडत असत? चांगले कर्म करणार्‍यांच्या मागे कायम दुखत असते. व वाईट कर्म करणार्‍यांच्या मागे कायम सुख का असते? या प्रश्नाचे उत्तर आज आपण या लेखातून जाणून घेणारा आहोत.

अर्जुनाने भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाला प्रश्न केला कि, नेहमी चांगल्या व्यक्तींसोबत अस वाईट का होते? यावर श्रीकृष्णाने उत्तर दिले की, एका गावामध्ये दोन व्यक्ती राहत होते. एक होता. तो व्यापारी होता. आणि तो खूप प्रामाणिक व चांगला होता. तो दररोज सकाळी सर्वात प्रथम मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन मग आपल्या कामाला सुरुवात करत होता. कोणाला वाईट बोलत नव्हता. कुणाचे वाईट चिंतत नव्हता.

याउलट तो दुसरा माणूस होता तो दुसऱ्यांचे कायम वाईटच करत होता. दुसऱ्यांचे वाईट करणे, लोकांना छळणे हाच त्याचे काम होते. तो असुरी प्रवृत्तीचा होता. तो देवतांना कधीही मानत नव्हता. तो देवतांचे नावही कधी घेत नव्हता. परंतु अधून मधून मंदिरात जाऊन मंदिरातल्या पैसे चोरत होता. एके दिवशी त्या गावांमध्ये खूप पाऊस पडत होता. त्यामुळे त्या गावातील कोणतीही व्यक्ती घरातून बाहेर पडली नव्हती.

अशावेळी त्या चोराने मंदिरात जाऊन दानपेटीतील सर्व पैसे चोरून व पळून गेला. नंतर तो चांगला माणूस देवाच्या मंदिरात देव दर्शनासाठी गेला असता त्याच्यामागून तेथील पंडित आला. त्यावर त्यांनी पाहिले की, मंदिरातील दान पेटी तील सर्व पैसे चोरले आहेत आणि तो पंडित आरडाओरडा करू लागला. त्यावर सर्व गावातील लोक मंदिरात गेले व त्या चांगल्या माणसावर संशय घेऊ लागले.

तो चांगला माणूस खूप दुःखी झाला व मंदिरातून बाहेर गेला आणि जात असताना त्याला एका गाडीने धडक मारली. त्याला खूप लागले. त्याचे अंग दुखू लागले. तो तसाच पुढे चालत जाऊ लागला. दुसरीकडे तो चोर पैसे घेऊन पळत असताना त्याला वाटे मध्ये अजून एक पैशाचे घाटोळे सापडले. त्याला असे वाटले की, मंदिरातील इतके पैसे चोरून अजून आपल्याला एवढे पैसे सापडले. आपण खूप लकी आहोत. असा विचार करून तो खूपच खूश झाला व अजून जोरात पळू लागला.

हे त्या व्यापाराला समजले. त्याला खूप दुःख झाले मी कुणाचे वाईट केले नाही तरी देखील माझ्या वाटेला इतके दुःख का.? असे म्हणून तो खूप दुःखी झाला व घरी गेला व त्याला त्याचा देवाचा असलेला विश्वास पूर्णपणे उडाला. पुढे काही कालांतराने त्याचा मृ’त्यू झाला. यम देवाला त्यांनी प्रश्न केला की, कोणाचे कधीच वाईट केले नाही तरीदेखील माझ्या वाटेला तसे का घडले? व तो व्यक्ती इतके वाईट करूनही त्याच्या वाटेला इतके सुख कसं का मिळाले?

त्यावर यमदेवांनी उत्तर दिले की, ज्या दिवशी ती चोरी झाली त्या दिवशी तुझा मृ’त्यू होता. परंतु तुझी देवावरची असलेली भक्ती आणि श्रद्धा आणि तुझे चांगली वर्तणूक यामुळे तो मृ’त्यूची वेळ सरली आणि त्याच दिवशी त्या चोराचा राजयोग होता. परंतु काही पैशाने त्याचा उपयोग टाळावा व त्याच दिवशी त्याचा मृ’त्यू झाला.

यावरून आपल्याला असे कळते की, आपण केलेले चांगले व वाईट काम याचे फळ आपल्याला मिळतच असते. प्रत्येक फळ हे आपल्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून नेहमी चांगले काम करत राहा. त्याचे फळही तुम्हाला चांगलेच मिळत राहील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular