Sunday, June 23, 2024
Homeवास्तूशास्त्रचुकून सुद्धा अशी घंटी देवघरामध्ये ठेऊ नका.. कलह वाढतील.. परिवारात फूट पडेल.!!...

चुकून सुद्धा अशी घंटी देवघरामध्ये ठेऊ नका.. कलह वाढतील.. परिवारात फूट पडेल.!! वास्तूशास्त्र..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रानो, आपण दररोज आपल्या घरातील देवांची मनोभावे पूजा करतो. ते आपले आद्य कर्तव्यच असते. कारण सुख आणि दुख हे आपल्या जीवनाचे अभिन्न अंग आहेत. जरी आपण सुखमय व शांततामय जीवन व्यतीत करत आहोत तर त्यासाठी आपल्याला परमेश्वराचे आभार व्यक्त करणे गरजेचेच नसून ते आपले कर्तव्य आहे.

मित्रांनो हे आभार प्रकट करण्यासाठी आपण देवघरामध्ये विधिवत पूजा करतो. पूजा पाठ आणि धार्मिक कार्य हे आपल्या जीवनाचा भागच असतात. विधीवत पूजा करताना जी पूजा सामग्री आपण उपयोगात आणतो व देवांची पूजा करतांना ज्या वस्तूंचा प्रयोग आपण करतो, जसं की देवाला अंघोळ घालायचे देवताम्हण, देवांना पुसायचे वस्त्र, कंकू, गुलाल, अष्टगंध, चंदन लावाण्यासाठीचे पात्र, इतरही बरीच पूजा सामग्री ठेवायची थाळी, प्रसादासाठी चे भांडे शंख किंवा घंटा.. इत्यादींचा वापर किंवा उपयोग करण्याचे सुद्धा काही नियम शास्त्रांमध्ये दिलेले आहेत.

आणि या नियमांचे पालन केले तरच आपल्या पूजेला काही अर्थ आणि महत्त्व मिळते. साधारण नेहमीच्या पूजा पाठ करण्याचे विधी नियम आपण सगळे जाणतोच परंतु आज आपण, पूजा करते वेळी कोणत्या गोष्टींचे ध्यान ठेवले पाहिजे, कोणती वस्तू कुठे ठेवली पाहिजे आणि पूजा मध्ये वापरली जाणारी घंटी याचे काय महत्त्व असते हे जाणून घेणार आहोत.

पहिली गोष्ट ज्या मूर्तीची तुम्ही पूजा करत आहात त्याला मूर्ती न समजता साक्षात भगवान तुमच्यासमोर आहेत अशी भावना मनात ठेवून तुम्ही पूर्ण विधिवत श्रद्धेने पूजा करावी. वेळेची कमतरता असेल तरीही आठवड्यातून एकदा तरी ईश्वर पूजन तुम्ही केले पाहिजे.

पूजा करण्याआधी देवाचे आवाहन करावे. त्यानंतर आसन, पाद्य, आघ्य, आचमन इत्यादी सर्व क्रिया क्रमाने कराव्यात. हे सर्व करून झाल्यावर शेवटी आरती अवश्य करा. त्यानंतर नैवेद्य दाखवून मनोभावे नमस्कार करावा.

पूजा करतेवेळी तुम्ही आसनावर बसूनच पूजा करावी परंतु देवाचे आसन हे तुमच्या आसनापेक्षा उंच असले पाहिजे. दररोज सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावा. नेहमी तेलाचा दिवा उजव्या बाजूला आणि तुपाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा.

घरामध्ये शंख, घंटा ठेवण्याची जी जागा आहे त्या जागेची नेहमी काळजी घ्या. शंख नेहमी उजव्या बाजूला तर घंटी डाव्या बाजूला ठेवा. सोबतच कलश नेहमी डाव्या बाजूला ठेवला पाहिजे. कलश मध्ये नेहमी पाणी भरूनच ठेवावे. तांबे, चांदी किंवा सोन्याचा कलश वापरावा अन्य कोणताही नाही.

देवाला कुंकू लावताना नेहमी अनामिकेचा वापर करावा. कारण अंगठ्याचा संबंध आत्म्याशी असतो, तर्जनी चा संबंध पितरांशी असतो तर माध्यमाचा स्वतःची संबंध असतो आणि अनामिकेचा देवतांशी, करंगळीचा संबंध ऋषीशी असतो.

घंटेच्या आवाजातून ध्वनी निघतो. हिंदू धर्मामध्ये ध्वनीचे खूप महत्त्व आहे. सृष्टी निर्माण झाली तेव्हा ध्वनीनाद झाला होता अशी मान्यता आहे. त्या ध्वनी मधून ॐ ची धुनी होती. घंटेच्या आवाजाला या ध्वनीचे प्रतीक मानले जाते.

मंदिरामध्ये वापरल्या जाणाऱ्याला घंटा म्हणतात आणि घरामध्ये वापरला जाणारीला गरुड घंटी म्हणतात. गरुड भगवान विष्णूचे वाहन आहे. घंटी नेहमी सप्तधातू ने बनलेली असते. घंटी मधून होणार्‍या ध्वनी मधून जे तरंग उठतात ते अत्यंत शुभ मानले जातात. यामुळे आपले चक्र जागृत होतात आणि आपले मस्तक सकारात्मक विचार करू लागते.

स्कंद पुराणानुसार देवांना आंघोळ घालताना, नैवेद्य चढवताना देखील घंटानाद केलाच पाहिजे. पूजा करण्याआधी सगळ्यात पहिले घंटी धुवून त्या घंटीची पूजा केली पाहिजे. पूजेच्या सुरुवातीला घंटी वाजवून च सांगता केली पाहिजे याचा अर्थ असा होतो की, तुम्ही देवतांना आवाहन करत आहात.

तुम्ही देवांना त्या पुजा स्थळी साक्षात उपस्थित राहण्याचे निमंत्रण देत आहात. धूपदीप करते वेळी देखील घंटानाद करावा. आरती करते वेळी देखील घंटानाद करावा. अशा प्रकारे वेगवेगळ्या वेळी घंटी नेहमी वाजवली पाहिजे. परंतु हे ध्यानात ठेवा पूजा व्यतिरिक्त कधीही घंटी वाजवू नये. केवळ पूजा मध्येच घंटेचा प्रयोग करावा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular