Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकचुल पुजन.. कशासाठी करावं आणि कधी करावं.?

चुल पुजन.. कशासाठी करावं आणि कधी करावं.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चुलीचे पूजन का कराव? कधी कराव? आणि कशासाठी कराव?. हल्ली शहरामध्ये चुलीच दर्शन सुद्धा होत नाही. पण गावाकडच्या काही भागात आजही आपल्याला चूल पाहायला मिळते. मग आपल्या घरात चूल आहे का? चुलीवर कधी जेवण केले आहे का?.

अग्नि हे नारायण आणि अन्न हे ब्रह्म स्वरूप आहे. आणि हे आपल्या प्रमुख देवतांपैकी एक आहेत. हे दोन्ही देव मानवावर रोज कृपा करतात असे म्हणायला हरकत नाही. आणि कृपा करण्याचे साधन असते चूल.

म्हणून चुलीला आपल्या पूर्वजांनी देवताचे स्वरूप दिले आहे. रोज नाही तरी मंगल प्रसंगी तरी चुलीचे पूजन करावे असेही सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला यामागचे शास्त्र सांगणार आहोत. मित्रांनो पूर्वी घरोघरी मातीच्या चुली होत्या.

नंतर शेगड्या आल्या, नंतर रॉकेलचे स्टोव आले. त्यानंतर विद्युत शेगड्या आल्या. आणि आता तर घरोघरी गॅस आहे. तसेच इंडक्शन देखील आहे. चूल तर जवळजवळ इतिहास जमा होत चालली आहे.

परंतु तरीसुद्धा तिच्या पूर्व स्वरूपी जुन्या मंडळीच्या मनात अजुनही जाग्या आहेत. एवढेच काय तर आधुनिक काळात प्राशन म्हणून चुलीवरच्या जेवणाची पद्धत नव्याने रूढ होताना दिसत आहे. जिच्यात अग्नी प्रज्वलित केली जाते ति चूल. मग तिचे स्वरूप पारंपारिक असो किंवा आधुनिक.

तिचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. मित्रांनो स्वयंपाक झाला आणि चूल शांत झाली की स्त्रिया शेणाने चूल सारवून ठेवत असत. दुसऱ्या दिवशी चूल चालू करण्या आधी दोन बोटाने हळद-कुंकू वाहत असत.

अन्न शिजवल्यानंतर पान वाटण्यापूर्वी चार शिते त्यावर तूप टाकून प्रथम ते चुलीत अग्नित टाकले जात असत. हा दैनंदिन कुलाचार होता. चुलीला देवताचे स्वरूप दिले असल्याने सुतकामध्ये तिला शिवत नसत.

आणि त्यात घरात जर कोणतं लग्न कार्य असेल तर घरात सर्वात आधी मीठाची मोठी चूल घातली जाते. आज या पद्धती शिल्लक नाहित. गॅस आणि अनेक उपकरणाने अन्न शिजवण्याची प्रक्रिया सोपी झालेली आहे.

परंतु त्यामागेही शक्ती आहेच. आणि त्याच शक्तीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज रांगोळी जरी नाही काढली तरी निदान गॅस सुरू करण्यापूर्वी शेगडी ला स्पर्श करून आपण कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो.

गृह प्रवेश वास्तु शांती च्या वेळी आजही शेगडी चे पूजन केले जाते. परंतु मंगल प्रसंगी सणवारी अवश्य तिचे पूजन करावे. हात जोडावे आणि चुकूनही अपघात होऊ नये अशी प्रार्थना करावी. निर्जीव वस्तूला काही कळत नाही असं आपल्याला वाटतं.

मित्रांनो पण आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्यच आहे की तिने चराचरात आपल्याला परमेश्वर बघायला शिकवल आहे. अशा उदात्त त्या संस्कृतीचा आदर बाळगून छोट्या छोट्या कृतीतून मोठी परंपरा आपल्याला नक्कीच जतन करता येईल. जेव्हा जेव्हा तुम्ही या गॅस जवळ जाल त्यावेळी हात जोडून नक्की कृतज्ञता व्यक्त करावी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular