Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकदेवघर कसे असावे.? देवघर बनवताना कोणती काळजी घ्यावी.? भाग - 2

देवघर कसे असावे.? देवघर बनवताना कोणती काळजी घ्यावी.? भाग – 2

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे. घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते. घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतो.

परंतु देवघर आणि देव्हारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेकजण घेत असतात. त्याचबरोबर मित्रांनो पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात.

घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघरासाठी योग्य दिशा कोणती? आणि त्याचबरोबर देवघराशी संबंधित काही खास गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता.

देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे, जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल.

आपल्या वास्तुशास्त्र नुसार ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते, असे सांगितले जाते. पूजा घरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे.

पूजा घरात पांढऱ्या, पिवळसर रंगाची संमगरवरी फरशी जरुर बसवावी.आपल्या शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे, असे सांगितले जाते. तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे.

अन्य देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये.त्याचबरोबर आपल्या देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे, असे सांगितले जाते.

आपल्या देवघरात महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पूजले जाऊ नयेत, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवघरात शनीची पूजा करू नये. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरात ठेवू नये, असे म्हटले जाते. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. गुरू व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये, असे सांगितले जाते.

देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत. आपल्या वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या देवघरामध्ये एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती व तसबीर किंवा फोटो असेल तर हरकत नाही. देवघरात देवपूजेचे साहित्य ठेवत असताना आणि त्याची मांडणी करताना तेल, वाती, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे.

शिवाय हात पुसायला रुमाल लागतात. देवाचे वस्त्र असतात. ताम्हण, तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी. देवघरातील सजावटीचे सामानपण तिथेच राहील, याची काळजी घ्यावी. काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते. तिथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते.

अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे. योग्य त्या प्रकाशव्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते. त्याचबरोबर आपण देवघरामध्ये गेल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. आपल्या घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते. त्याच बरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular