Thursday, April 11, 2024
Homeआध्यात्मिकदेवघर कसे असावे.? देवघर बनविताना काय काळजी घ्यावी.? भाग - 1

देवघर कसे असावे.? देवघर बनविताना काय काळजी घ्यावी.? भाग – 1

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो आपल्या घरातील शांतता, निवांतपणा देणारी जागा म्हणजे देवघर.. थोडक्यात देवघर म्हणजे घराचा आरसा आहे असे म्हटले जाते. देव्हार्‍यातून प्रक्षेपित होणार्‍या सात्विक लहरी, सकारात्मकता याचा लाभ कुटुंबाला आणि वास्तूलाही होत असतो. घरामध्ये नियमित केली जाणारी देवपूजा मन प्रसन्न करते. दिवसभर कितीही थकून भागून आलो तरी देव्हार्‍याकडे पाहिल्यावर मन प्रसन्न वाटते. पूर्वीच्या काळी स्वतंत्र खोलीत देवघर असायचे .

परंतु शहराच्या ठिकाणी आता छोट्याशा जागेतच आता देव्हारा ठेवला जातो किंवा देवघर बनवले जाते. ज्या घरात देव्हारा नाही त्या घराला आध्यात्मिक दृष्ट्या काहीही महत्व नसते. देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे असुरी जीवन असते. प्रत्येक राहत्या घरी देव्हारा असणे आवश्यक आहे. कारण ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मी – नारायणाचा संसार असतो. ज्या घरात ईश्वरी अधिष्ठान नाही.

ते एकप्रकारे चतुष्पादांचा म्हणजे पशुतुल्य संसारी जीवनच असते. देवघर सुशोभित आणि सुंदर असावे. देवघराच्या इथे स्वस्तिक सारखे शुभचिन्ह काढलेले असावे. देवघर अथवा देव्हारा शक्यतो लाकडाचाच असावा. देवघर बनवताना शक्यतो खैर, साग, देवार्जुन, शिसम या लाकडापासून तयार केलेले असेल तर अतिउत्तम.

मित्रांनो जर तुम्हाला आपल्या घरातील देवघर लाकडाचे बनवणे शक्य नसेल तर संगमरवरी दगडाचे असेल तरी चालेल. नवीन देव्हारा खरेदी करताना शुभ दिवस बघूनच खरेदी करावा. देवघरात उजेड सतत येत राहावा यासाठी शुभ्र पांढरा प्रकाश देणारा बल्ब लावावा. त्याचबरोबर आपल्या घरातील देवघराची मांडणी करताना ही आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

मित्रांनो आपल्या देवघरातील देवांच्या मुर्त्यांची मांडणी करत असताना अतिशय काळजी बाळगावी. देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती कधीही ठेवू नयेत. देवपूजा करताना निर्माल्य आधी काढून घ्यावे आणि त्यानंतर नवीन फुले घालावीत. देवपूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करावा. असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज देवाला नैवेद्य अर्पण केला जातो तिथे कधीही कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. देवघरात अतिशय कमीत कमी मूर्ती आणि तसबिरी असाव्यात.क

त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा टाक, मूर्ती अथवा तसबी, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, छोटा बाळकृष्ण असावा. शंकराची पिंडी असेल तर ती धातूची असावी. देव्हार्‍यातील सर्व मूर्तींची तोंडे पश्चिमेस असावी. म्हणजे पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड पूर्वेस होईल. देवघरात मूर्तींची रचना करताना मागच्या बाजूला फोटो आणि समोर म्हणजे पुढच्या बाजूला मूर्ती असाव्यात.

परंतु मित्रांनो आपल्या देवघरातील मूर्तींची ऊंची जास्त नसावी, कमीत कमी तीन इंच ते चार इंच इतकीच मुर्त्यांची उंची असावी, अगदी हाताच्या अंगठ्याएवढी असली तरी चालेल. त्याचबरोबर आपल्या घरातील देव्हारा ईशान्य दिशेला असणे चांगले समजले जाते. कारण ईश्वराचे अधिष्ठान ईशान्य दिशेला असते.

ईशान्य कोपरा शक्य नसल्यास उत्तर भिंतीच्या बाजूला मध्यावर किंवा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून देव्हारा ठेवला तरी हरकत नाही. आपल्या घराच्या किंवा वास्तूच्या दक्षिण अथवा नैऋत्य कोपर्‍यात देव्हारा केव्हाही असू नये. असल्यास त्याचा त्रास घरातील सदस्यांना होण्याचा धोका असतो. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा असते.

घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान वास्तूच्या नियमांनुसार नसेल तर बर्‍याच संकटांना घरात सामोरे जावे लागते. म्हणूनच गृहसजावट करताना सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देवघर. देवघराची जागा ही अतिशय शांत आणि मंगलदायी असावयास हवी. देवघर बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular