Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकदेवघरात अन्नपूर्णा देवीची स्थापना कोणत्या दिवशी.. आणि कशी करावी.?

देवघरात अन्नपूर्णा देवीची स्थापना कोणत्या दिवशी.. आणि कशी करावी.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, अन्नपूर्णा मातेला हिंदू धर्म शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. अन्नपूर्णा माता हे सर्वांना अन्न पुरवत असते. म्हणून आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणे खूप गरजेचे आहे. यासाठी आज आपण अन्नपूर्णा मातेची स्थापना कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी व कशा पद्धतीने करावी? याची माहिती जाणून घेणार आहोत. देवघरात अन्नपूर्णा ची स्थापना कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी करावी? अवश्य तुम्ही हे जाणून घ्या.

अन्नपूर्णेची मूर्ती घरात स्थापन करावी कारण आपण जे खातो ते अन्न धान्य आपल्या घरात असतात त्याचा पुरवठा आपल्या घरात कायम स्वरूपी असायला पाहिजे. त्याची परत आपल्या घरात असायला पाहिजे म्हणून अन्नपूर्णेची पूजा आपण रोज करायलाच पाहिजे. त्याची कृपा आपल्यावर व्हावी. म्हणून घरात अन्नपूर्णा ची स्थापना आपल्या देवघरात अन्नपूर्णा ची स्थापना करायलाच हवी.

अन्नपूर्णा कशी ठेवावी? याचा एक नियम आहे की, अन्नपूर्णा ठेवण्यासाठी पहिले तर अन्नपूर्णेचे तुम्ही एकदम छोटी लहान मूर्ती घ्यावी आणि एका वाटीमध्ये तुम्ही तांदूळ घ्यावे. ते तांदूळ पूर्ण असायला पाहिजे ते खंडित म्हणजे तुटलेली त्याचे दाणे नसायला पाहिजे. त्या वाटीतल्या तांदळामध्ये अन्नपूर्णा उभी करायची आणि देवघरात ठेवायची. तर या रीतीने अन्नपूर्णा घरात स्थापन करू शकतात. आता मुख्य प्रश्न येतो तो म्हणजे कोणत्या दिवशी आणि कोणत्या समय कोणत्या वेळीअन्नपूर्णा घरात स्थापन करावी?

तर,यामध्ये खूप कठीण असे काहीच नाहीये. तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा शनिवारी अन्नपूर्णेची स्थापना करू शकतात. मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी. आता कोणत्या समय? तर अन्नपूर्णा स्थापन करायची असेल तर, दिवसाच्या 12 वाजेच्या आत दुपारी होण्याचा आत तुम्ही अन्नपूर्णा ची स्थापना घरात करून घ्यावी. आणि दुपारच्या एखादी नैवेद्य किंवा काही तरी गोड करून किंवा शिरा किंवा नाही जमेल तर दूध साखर तरी अन्नपूर्णाला दाखवावी. अशा रीतीने तुम्ही अन्नपूर्णा ची स्थापना तुमच्या घरात करू शकतात.

आता भरपूर भक्तांना असा प्रश्न पडतो की, आम्ही जे तांदूळ ठेवतो त्याचे करायचे काय ते किंवा बदलायचे? भरपूर सेवेकरी रोज ते तांदूळ बदलतात म्हणजे आजच्या वाटीमध्ये तांदूळ ठेवले आहेत ते दुसऱ्या दिवशी तांदूळ पक्षांना टाकतात आणि तिथे दुसरी तांदूळ भरून ठेवतात. आणि काही फक्त दर आठवड्याला एक दिवस ठरवतात की दर मंगळवारी ते तांदूळ बदलायचे आहेत तर ते दर मंगळवारी तांदूळ पक्षांना टाका तिला त्याच मंगळवारी सकाळी तांदूळ नवीन ठेवु शकता.

शेवटी त्याच्या अन्नपूर्णा ठेवतील तर तुम्ही या पद्धतीने ते करू शकता. तुम्ही विचार करा तुम्हाला तांदूळ रोज बदलायचे आहेत की, दर आठवड्याने तांदूळ बदलायचे आहेत तर तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular