स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो दिवा ज्याप्रमाणे अंधार दूर करतो. त्याप्रमाणे देवाची कृपा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करेल, अशी श्रद्धा त्यामागे असते. तुपाचा दिवा देवीच्या उजवीकडे, तर तेलाचा दिवा देवीच्या डावीकडे लावतात. नवरात्रात नऊ दिवस दिवा तेवत राहावा, म्हणून तो मोठा वापरतात. तशीच त्यातील वातही मोठी असते.
वातीवर खूप काजळी धरली असेल तर त्या ज्योतीने दुसरा एक छोटा दिवा लावून घ्यावा व त्यानंतर काजळी काढताना दिवा विझला तर तो व्यवस्थित करून पुन्हा लावावा. एखादवेळी रात्री झोपून उठल्यावर दिवा विझल्याचे लक्षात आले तरी घाबरण्याचे कारण नाही. आणि लक्षात आल्यावर लगेच एक छोटा दिवा लावून घ्या व नंतर मोठा दिवा स्वच्छ करून पुन्हा लावा.
शक्यतो दिवा विझू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. वारा लागू नये म्हणून दिव्याला काचेचे आवरण असावे, दिव्यातील तेल किंवा तूप संपणार नाही याकडे लक्ष ठेवावे. आणि त्याचबरोबर देवाच्या आरती संदर्भात आपल्या शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. शास्रानुसार आरती करताना दिवा विझणे अपशकून मानले जाते.
याच कारणामुळे या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते की, आरती पूर्ण होईपर्यंत दिवा अखंड चालू राहावा. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये ही असं सांगितलं आहे की, मित्रानो दिवा कोणताही लावा तेलाचं लावा किव्हा तुपाचा लावा मात्र हा दिवा आपण देवासमोर लावायलाच हवा. आपण जर तेलाचा दिवा वापरात असाल तर तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा.
म्हणजे मंदिरात ठेवताना तो आपल्या डाव्या हाताला असुद्या..जर आपण तुपाचा दिवा लावताय तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा आणि मित्रानो तेलापेक्षा तुपाचा दिवा लावणं कधीही चांगलं असत,कारण तुपामध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण तेलापेक्ष्या खूप जास्त असत. आणि आपली जी इच्छा असेल, आपली जी आकांक्षा असेल, महत्वकांक्षा असेल,आपली जी स्वप्ने असतील, आपलं देवाकडे जे काही मागणं असेल, ते जर लवकर पूर्ण करून घ्यायचा असेल तर श्रद्धे बरोबरच हा तुपाचा दिवा देखील आपल्याला मदत करू शकतो.
मात्र हे तूप घेताना शक्यतो देशी गाईचे घ्या. ते जर मिळत नसेल तर आपण इतर कोणतंही तूप वापरू शकता. मात्र एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा निरांजन जर आपण लावलं तर ते 24 तास जळत राहिले पाहिजे. म्हणजे ते विजता कामा नये..दिवा अगदी 5 ते 10 मिनिटे चालून विजला तरी चालतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी निरांजन वापरा, ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दिवा वापरा.
पुढची गोष्ट अशी की जी वात असते दिव्याची ती नेमकी कोणत्या दिशेला ठेवायची.? असा प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडतो, तर मित्रानो जर आपल्या आयुष्यात जर धन लाभ पाहिजे असेल तर, आपण या वातीची दिशा उत्तर बाजूला ठेवावी. जर आपल्या घरामध्ये सारख कोणी ना कोणी तरी आजारी पडत असेल तर, आपण या दिव्याची दिशा म्हणजे वातीची जी दिशा आहे, ती पूर्वेकडे ठेवायला हवी.
तर या दोन दिशा फार शुभ आहेत. उत्तर आणि पूर्व…ज्या उरलेल्या दोन दिशा आहेत पश्चिम आणि दक्षिण यातील जर आपण पश्चिम दिशेला वातीने तोंड केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःखच दुःख येणार आहे. आणि जर दक्षिण दिशेला जर ही वात असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊ शकतात. कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे आणि दक्षिणेकडे आपण कधीही दिव्याची वात करू नये आणि मित्रांनो शेवटची गोष्ट जर आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू असतील.
इतके प्रॉब्लेम की त्यापासून सुटकाच मिळत नसेल, पैसे ही येत नाहीत, कटकटी चालू आहेत, असे जर खूप प्रॉब्लेम असतील तर आपण आपल्या देवासमोर तीन वाती असणारा दिवा लावा. तीन वाती त्यामध्ये ठेवा, त्यामध्ये देशी गाईचे तूप आवश्य वापरा याचे अतीशय सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती मध्ये सकारात्मक ऊर्जा येईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!