Tuesday, May 21, 2024
Homeआध्यात्मिकदेवघरामध्ये.. किती देव ठेवावे.?

देवघरामध्ये.. किती देव ठेवावे.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! हिंदू धर्मातील प्रत्येक घरात देवघर असतेच आणि आपण कोणतेही काम करण्या अगोदर दररोज भगवंतांना नमस्कार करतो आणि मगच आपल्या कार्याला सुरुवात करतो. यामुळे आपल्याला आंतरिक शक्ती एक ऊर्जा मिळते. देवांचा फक्त दर्शनाने आपल्या कितीतरी पापांचा नाश होतो. आपल्या देवघरात कितीतरी प्रकारच्या देव देवतांच्या मूर्ती आणि फोटो असतात.

काही व्यक्तींच्या देवघरात एकाच देवी-देवतांचे अनेक फोटो किंवा मूर्ती असतात. काही जण जिथे तीर्थ क्षेत्राला जातात, कोणत्याही थराला गेले तेथून देवी देवतांच्या प्रतिमा किंवा फोटो आणून देवघरात मांडून ठेवतात म्हणूनही एखादी फ्रेम किंवा प्रतिमा त्याचीही स्थापना करतात.

अशा प्रकारे एकाच देवी-देवतांचा एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देव घरात होतात. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की देवघरात कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती असाव्यात याविषयी माहिती दिली आहे तसेच देवी-देवतांच्या किती मूर्ती असाव्यात तेही सांगितले आहे. पहिली मूर्ती म्हणजे गणपती बाप्पा, गणपती बाप्पा हे विघ्नविनाशक आहेत आणि प्रत्येक पूजेचे त्यांना अग्रपूजेचा मान आहे, घरात श्री गणेशाची मूर्ती असणे शुभ असते आणि त्याशिवाय पूजा अपूर्ण आहे.

तसे इतर बहुतेक घरांमध्ये श्री गणेश यांच्या अनेक प्रतिमा आणि मुर्त्या असतात पण असे म्हटले जाते की गणपती बाप्पांचे स्वरूप सम संख्यामध्ये असते म्हणून घरात गणपती बाप्पाचे फोटो किंवा मुर्त्या ठेवताना एक / तीन किंवा पाच असू नये म्हणजेच विषम असू नये. 2/4 किंवा 6 याप्रकारे सम संख्येत गणपती बाप्पांच्या प्रतिमा किंवा मूर्ती असाव्यात परंतु शक्‍यतो कमी मूर्ती असतील तर त्यांचे पूजन व्यवस्थित होते तसेच घरात गणपती बाप्पांच्या कमीत कमी दोन फोटो किंवा मूर्ती असणे शुभ असते.

याचबरोबर, दुसरी देवता महादेवाचे शिवलिं ‘ग, शिवलिं ‘ग म्हणजे पिंडीचे दर्शन होताच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. देवघरात शिवलिं ‘ग आवश्य असावे परंतु त्याची उंची आपल्या अंगठ्या पेक्षा मोठी नसावी कारण अंगठ्या पेक्षा मोठी मूर्ती देवघरातील न राहता मंदिरातील मूर्ती होते आणि तिचे दिवसातून तीन वेळा पूजन करून नैवेद्य देणे अनिवार्य होते आणि आपल्याला हे शक्य नसल्याने कोणतीही पिंड अंगठ्या पेक्षा लहान असावी.

आपल्या घरात फक्त एकच शिवलिं ‘ग असावे. एकापेक्षा जास्त शिवलिं ‘ग असू नयेत. हनुमान किंवा बजरंग बली हनुमानाची एकच मूर्ती असावी कारण हनुमान हे शिवाचे म्हणजे रुद्राचे अवतार आहेत. देवघरातील त्यांची मूर्ती बैठ्या स्वरूपात असावी. घरातील इतर भागांमध्ये उभ्या हनुमानाचा फोटो तुम्ही लावू शकता. घराच्या मुख्य द्वाराजवळ उडणाऱ्या हनुमानाचा फोटो लावू शकतो परंतु पती-पत्नीच्या बेडरूममध्ये हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती अजिबात लागू नये.

बेडरूम मध्ये तुम्ही राधा कृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता. देवीच्या प्रतिमा किंवा मूर्ती देवघरात असाव्यात, अन्नपूर्णा, दुर्गा देवी, देवी लक्ष्मी देवीच्या मुर्त्या असू नये, तुम्ही या देवाच्या दोन मुर्त्या ठेवू शकता पण तीन मुर्त्या ठेवू नये, तसेच देवघरात कोणत्याही देवी-देवतांच्या एकच मूर्ती असाव्यात म्हणजे त्यांचे पूजन व्यवस्थित करता येते व मनही प्रसन्न राहते. देवांची संख्या कमीच असावे.

तेव्हा जितक्या जास्त मुर्त्या असतील तेवढा जास्त वेळ पूजेसाठी लागतो आणि देवपूजा करण्यास टाळाटाळ केली जाते. देवघरात देवांची संख्या कमी असेल तर देवपूजा ही नियमित होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular