Friday, December 1, 2023
Homeआध्यात्मिकदेव्हाऱ्यातील देवपूजेचे शास्त्रोक्त 20 नियम.. जे तुम्ही यापूर्वी कधी ऐकले नाहीत.!!

देव्हाऱ्यातील देवपूजेचे शास्त्रोक्त 20 नियम.. जे तुम्ही यापूर्वी कधी ऐकले नाहीत.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… घरातील देवपूजा करताना या 20 नियमांचे पालन करायलाच हवे. ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते, नित्य देवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तेथे सुख, समृद्धी आणि सकारात्मक व पवित्र वातावरण नेहमीच असते. दुःख, दारिद्र्य दूर होते. नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो.

घरातील वातावरण शुद्ध राहते. हिंदु पुराणानुसार देवपुजेचे काही महत्वाचे नियम ठरवलेले आहेत. या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते. भगवंताची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते. महालक्ष्मी सह सर्व देवी-देवता आपल्यावर प्रसन्न राहतात.

तर मित्रांनो, असे आहेत पूजा करताना लक्षात ठेवायचे नियम –

1) तुळशीची पाने 11 दिवसा पर्यंत शिळी होत नसतात. त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात.

2) दिवा नेहमी परमेश्वराच्या मुर्तीसमोर ठेवला पाहिजे. तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी.

3) पूजेकरिता कधीही तुटलेला भग्न दिवा वापरू नये. तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही.

4) शिवजींना बेलाची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी.

5) कोणत्याही पुजेच्या वेळी आपल्या स्वेच्छेने देवाला दक्षिणा हिनक्की द्यावी. दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे. निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते. ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.

6) प्रत्येक पुजेमध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचे स्थान असते. पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे. तुकडे झालेले तांदूळ वापरू नये. हळदीचे पाणी करुन त्यात तांदूळ पिवळे करुन मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते. नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे.

7) विड्याची पाने देखिल पूजेसाठी अवश्य ठेवावी. वेलची, लवंग, गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर अतिउत्तम.
पूजेच्या मध्यभागी दिवा मधेच विझू नये याकडे विशेष लक्ष द्यावे. जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.

8) कोणत्याही देवाला पूजा, ध्यान, आसन, स्नान, धूप-दीप, अक्षत (तांदूळ), कुमकुम, चंदन, फुले (फुले), प्रसाद इत्यादींना आमंत्रित (आमंत्रित) करणे आवश्यक आहे.

9) भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये.

10) पूजेच्या ठिकाणी स्वचछता आणि पवित्रता यांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये. चामड्याची कोणतीच वस्तू पुजा अर्चा करताना जवळ बाळगू नये. पूजाघर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. म्हणतात ना “हात फिरे तिथे लक्ष्मी वसे”

11) भगवान श्री विष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे. देवी दुर्गा, सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

12) कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता, इष्टदेवता, वास्तु देवता, ग्रामदेवता यांचे स्मरण करुन त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे. पूजेसाठी सर्व देवतांचे आवाहन करायला हवे. पुजेच्या आधी देवांना स्नान घालावे, धूप दीप प्रज्वलित करावे, हळदी कुंकू लावावे तसेच पुष्प, बेलपत्र, चंदन, अक्षदा असणे गरजेचे असते.

13) आपण पुजेकरिता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकावू नये ते नेहमी हाताने सरकवावे.

14) आपण दररोज तूपाचे निरांजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात.

15) देवघराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेऊ नये.

16) देवतांना पुष्पहार, ताजीतवानी फुले, पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.

17) भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात, श्री विष्णूला चार, श्री गणेश यांना तीन आणि शिवजींना आर्धी प्रदक्षिणा घालावी.

18) घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंच लोकपाल, षोडश माता, साती आसरा यांचीही उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे.

19) या सर्वाबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात पंडित कडून मिळू शकते. विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे, जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल.

20) भगवान सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गामाता, शिवजी आणि श्रीविष्णू ह्या पंचदेवतांची पूजा अवश्य करावी. दररोज पूजा करताना या पंचदेवांचे ध्यान केले पाहिजे. यामुळे लक्ष्मीची कृपा व समृद्धी मिळते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular