तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…. नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत जवळ जवळ सर्वच घरांमध्ये सकाळी उठल्यावर देवपूजा केली जाते. परंतु आपण पूजा करण्यासाठी वापरलेले पाणी इकडे तिकडे कोठेही टाकत नसतो. जर कसं कुणीही करत असतील तर तसं चुकूनही करु नये.
रोज सकाळी उठल्यावर आपल्या द्वारे केलेली ही ईश्वरसेवा अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते. सकाळच्या वेळेला आपण देवघर स्वच्छ धुऊन स्वच्छ करतो व नंतर देवतांना देखील स्नान घालून शुद्ध करतो.
तसेच स्वच्छ कापडाने पुसून त्यांना व्यवस्थित कोरडे करुन गंधही लावतो व पून्हा त्यांची स्थापना त्यांच्या आहेत त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे आपल्या देवघरातील वातावरण अत्यंत प्रसन्न होते.
परंतु देवपुजेनंतर देवांना आपण ज्या पाण्याने स्नान घालतो ते पाणी कोठे टाकायचे हे बहुतांश लोकांना माहिती नसते. खरं तर बरेच लोक ते पाणी अशा ठिकाणी टाकतात की ज्या ठिकाणी टाकायला नको आहे.
मित्रांनो म्हणूनच आजच्या या लेखामध्ये तुम्हाला हे पाणी नक्की कुठे टाकायचे आहे याच बद्दलची माहिती सांगणार आहोत. बऱ्याचदा सर्व लोक देवपूजेनंतर उरलेले पाणी तुळशीच्या कुंडीमध्ये ओतत असतात.
तर मित्रांनो, आपण हे पाणी तुळशीच्या मुळांशी चुकूनही ओतायचे नाहीये. कारण शास्त्रांमध्ये तुळशीला शुद्धतेचे व मांगल्याचे प्रतीक मानले गेले आहे. देवांना स्नान घातल्यानंतर ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या आजूबाजूला किंवा दाराच्या उंबऱ्यामध्ये देखील टाकायचे नाही.
किंवा त्या उरलेल्या पाण्याने सडा देखील आपण घालायचा नाहीये. पूजेनंतर उरलेले पाणी कोणाच्याही पायाशी येणार नाही किंवा त्या पाण्याला प्रत्यक्ष कुणाचेही पाय लागणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी.
मग आता मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आता असा प्रश्न पडला असणार, की पूजेनंतर उरलेलं पाणी नक्की कुठे टाकायला हवे? तर मित्रांनो सोपा आणि सरळ उपाय आहे जेव्हा आपण सकाळी देव पूजा करतो ते’व्हा कुंकूवाचे पाणी किंवा देवांचे अंघोळ घातलेले पाणी किंवा काहीतरी तर आपण जे साफसफाई करत असतो.
आपल्या देवघरात त्याचे पाणी हे सगळे पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये टाकावे. जिथे कोणाचाही पाय पडणार नाही. आपण ते पाणी एखा’द्या झाडांला टाकावे. तर मित्रांनो, हे पूजा झाल्यावर उरलेलं पाणी जे आहे पाणी आपण एक तुळशी सोडून इतर दुसऱ्या कोणत्याही झाडाला किंवा फुलझाडाला ओतू शकतात.
भरपूर लोक ही चूक करत असतात. जे देवपूजा झा’ल्या’नंतर सकाळी ते पाणी ते तुळशीला टाकतात आणि त्यांच्या हातून ही खूप मोठी चूक होते. कारण तुळशी खूप पवित्र मानली गेली आहे. ती एक ल’क्ष्मी’चा अवतार मानली गेलेली आहे. तसेच तुळस वि’ष्णु’प्रि’या आहे. म्हणून तिच्या मुळाशी कधीच देवांचे धुतलेले पाणी कधीच टाकू नये.
मग ते झाड कोणत्याही फुलाचे असो वा फळांचे असो अशा ठिकाणी आपण हे पाणी व ओतून दिलेले चालते. तसेच, घराच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आपण हे पाणी ओतू शकतो.
फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की, ते म्हणजे त्या पाण्यावर चुकूनही कोणत्याही माणसाचा किंवा प्राण्याचा पाय पडता कामा नये. मित्रांनो, थोडक्यात काय पूजेचे पाणी कुणाच्याही पायांखाली जाईल, अशा ठिकाणी ते आपण टाकायचं नाहीए.
मित्रांनो, या पुजेच्या पाण्याचा अनादर ज्या ही घरांमध्ये होत असतो अशा घरांमध्ये कधीही बरकत येत नसते. माता लक्ष्मी नांदत नसते. अशा घरांवर माता लक्ष्मी रुक्ष होऊन बसतात.
त्यांचा वास्तव्य अशा घरात कधीही चिरकाल टिकत नाही. अशा घरात नेहमी कलह वाढतात. त्यामुळे या पुढे देवपुजेनंतर उरलेलं पाणी योग्य त्या ठिकाणीच जाऊन टाकावे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!