Sunday, December 10, 2023
Homeआध्यात्मिकDevshayani Ashadhiekadashi 2023 आज आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका,...

Devshayani Ashadhiekadashi 2023 आज आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा आयुष्यभर संकंट पाठीशी लागतील.!!

Devshayani Ashadhiekadashi 2023 आज आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा आयुष्यभर संकंट पाठीशी लागतील.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. (Devshayani Ashadhiekadashi 2023) या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. देवशयनी एकादशी नंतर भगवान निद्रावस्तेत जातात.

(Devshayani Ashadhiekadashi 2023) आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. देवशयनी एकादशी नंतर भगवान निद्रावस्तेत जातात.

आषाढी एकादशीनंतर चातुर्मास सुरु होतो. या वर्षी देवशयनी एकादशी 29 जून 2023 रोजी साजरी केली जाईल. एकादशीला भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. या दिवशी अनेक कामे करण्यास मनाई आहे. आज आम्ही तुम्हाला देवशयनी एकादशीचे व्रत करायचे असल्यास कोणत्या गोष्टी टाळायला हव्या हे जाणून घेऊया.

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. (Devshayani Ashadhiekadashi 2023) आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.

या चुका कदापि करु नका…

या दिवशी मासांहर करु नये तसेच कांदा लसूण व मद्य तसेच नशेपासून दूर राहावे.

एकादशीला भात खाणे वर्ज्य मानले जाते. (Devshayani Ashadhiekadashi 2023) पोहे, पुलाव यापासून बनवलेल्या वस्तू या दिवशी खाऊ नयेत. उपवास न ठेवणाऱ्यांनीही भात खाणे टाळावे.

हे ही वाचा : Garuda Purana मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसतात ‘हे’ लक्षणे, जाणून घ्या काय सांगतं गरुड पुराण..

देवशयनी एकादशीला ब्रह्मचर्य पाळावे. या दिवशी भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन मंत्रांचा जप करावा.

देवशयनी एकादशीला कोणाच्याही मनात वाईट विचार आणू नयेत. या दिवशी कोणाविषयी वाईट बोलू नये.

तुळशीला (Tulsi) जल अर्पण करू नये. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये. या दिवशी तुळशीची पानेही तोडू नयेत. तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते.

आषाढी एकादशीचे व्रत – आषाढी एकादशीला व्रत- उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात. एकादशीच्या आदल्या दिवशी (Devshayani Ashadhiekadashi 2023) अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे. हा संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा.

आषाढी एकादशी महात्म्य कथा – एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मरता केवळ एका स्त्री च्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले.

तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. (Devshayani Ashadhiekadashi 2023) या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular