नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! घरी किंवा ऑफिसमध्ये घोड्यांचे चित्र लावण्याचे खूप लाभ होतात असे आपले हिंदू धर्म शास्त्र सांगते. साधारणपणे कोणतीही शक्ती मोजताना ती हॉर्स पावरमध्ये मोजली जाते, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. गाडीच इंजिनची शक्ती किती आहे? टोटल किती हॉर्सपॉवरची आहे?
आपण रोजच्या जीवनामध्ये बघतो. अश्वशक्ती नक्की कशी आणि कुठे कामाला येते हे कदाचित सगळ्यांनाच माहीत असेलच असं नाही. अश्व म्हणजेच घोडा. हा अतिशय शक्तिवान प्राणी मानला जातो, ही शक्ती जर माणसाच्या अंगात आली तर माणूसच सर्वात शक्तिमान बनेल. पण वास्तवात देवाने प्रत्येक प्राण्याला वेगवेगळे शक्तीचे वाटप केले आहे. वातावरणामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो.
आपल्या घरामध्ये ज्या ऊर्जेचा प्रभाव जास्त त्या प्रकारचे वातावरण आपल्या घरामध्ये तयार होते. सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असेल तर आनंदी, प्रसन्न, आर्थिक दृष्ट्या समृद्ध वातावरण तयार होते आणि याउलट नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असेल तर दुःख, घरात वादविवाद होणे, आर्थिक तंगी अशा प्रकारचे वातावरण तयार होते. आपण जर आपल्या घरामध्ये अधिक ताकदवान सकारात्मक ऊर्जा तयार केली तर नकारात्मक ऊर्जा ही रिकामी होते.
जास्त असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा पळवून लावण्याचे काम अशा काही सकारात्मक गोष्टी करत असतात. सकारात्मक ऊर्जा याद्वारे येत असते जर घरात भरपूर सूर्यप्रकाश असेल, मनाला आनंद देतील अशा काही गोष्टी घडतील, शक्ती देतील अशा काही गोष्टी घरात आणल्या तर या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो. घरातलं वातावरणच बदलून जातं. त्यातील एक महत्त्वाची सकारात्मक गोष्ट म्हणजे टाच मारल्यावर धावत जाणारे पांढरे घोड्यांचे एक मस्त चित्र किंवा फ्रेम घरात लावायची.
सातच घोड्यांची फ्रेम लावण्याचं देखील कारण आहे, शास्त्रानुसार सात हा आकडा शुभ मानला जातो आणि बऱ्याच गोष्टी ह्या सात आहेत. इंद्रधनुष्य सप्तरंगी असते. लग्नात सप्तपदी असते. आपल्या प्रमुख नद्या सात आहेत. एखादा घोडा पळताना पाहिला तरी आपल्या अंगात एक प्रकारची शक्ती आल्यासारखे होते. आपल्या सगळ्या घरात सकारात्मकतेतून नकारात्मक ऊर्जा घालवण्याचे काम ही फ्रेम करते. शुभशक्तीमुळे अशुभ शक्तीचा नाश होईल आणि घरात आनंदी वातावरण तयार होईल अशी सात धावणाऱ्या घोड्याची प्रेम घरात किंवा ऑफिसमध्ये लावून बघावी.
वास्तुशास्त्रानुसार वास्तूमध्ये धावत्या घोड्याचे फोटो लावण्याचे देखील सांगितले जाते, त्यामुळे वास्तूमध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते. यशस्वी होण्याकरता मनुष्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे ते म्हणजे सतत ऊर्जावान राहणे. स्वस्थ राहणे, ऊर्जेने परिपूर्ण राहणे आणि सदैव कार्यक्षम राहणे यासाठी शरीरात व आजूबाजूला वातावरण देखील एनर्जेंटिक हवे.
तेव्हा यश मिळायला वेळ लागणार नाही. वास्तुशास्त्रानुसार जर आपण घरात, ऑफिसमध्ये पळणाऱ्या घोड्याची फोटो फ्रेम लावली तर आपल्या कार्यात प्रगती मिळते. जे फोटोमध्ये पळणारे घोडे सात आहेत ते व्यवसायामध्ये प्रगतीचे प्रतीक मानले गेले आहेत, कारण अंकशास्त्रानुसार सात हा अंक सार्वभौमिक आहे. प्राकृतिक आहे. इंद्रधनुष्याचे रंग पण सात असतात. सप्तऋषि पण सात. लग्नातील फेरे सुद्धा सात. जन्म सुद्धा सात म्हणून सात हा आकडा शुभ मानला गेला आहे.
व्यापार उन्नतीसाठी ऑफिस केबिन मध्ये सात पळणाऱ्या घोड्याची फोटो फ्रेम लावावी परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ही फ्रेम घरामध्ये किंवा प्रवेशद्वाराच्या समोरील भिंतीवर किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावी. अशी फोटो फ्रेम खरेदी करताना फोटोतील घोड्यांची मुद्रा ही प्रसन्नचित्त मुद्रा असावी, संतापी नसावी. फ्रेम लावल्यावर घोड्याच्या फ्रेमचे तोंड हे दरवाज्याकडे होईल असे लावावे.
घरात किंवा ऑफिसमध्ये तुटकी-फुटकी अंधुकशी कोणतीही फ्रेम ठेवू नये. या फोटोमध्ये घोडे वेगवेगळ्या दिशेला पळताना असतील तर तशी फ्रेम अजिबात घेऊ नये त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मध्ये एकमत राहत नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी पांढऱ्याशुभ्र धावत्या सात घोड्यांची फ्रेम नक्की लावा व त्याचे सकारात्मक अनुभव घ्या.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!