Friday, June 7, 2024
Homeआध्यात्मिकदिवसाची सुरूवात स्वामींच्या या सेवेने करा.. कोणत्याही प्रकारचा दोष दूर होईल.. जीवन...

दिवसाची सुरूवात स्वामींच्या या सेवेने करा.. कोणत्याही प्रकारचा दोष दूर होईल.. जीवन सुखी आणि समृद्ध होईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी आहात आणि नित्यनेमाने स्वामींची सेवा करित आहात तर आज तुम्हाला असं एक काम सांगणार आहे जे तुम्ही स्वामींच्या सेवेच्या आधी जर केलं तर तुमच्या आयुष्यात कोणते दोष राहणार नाही तुमच्या जन्मपत्रिकेत कोणतेही दोष राहणार नाहीत आणि तुमचे जीवन सुद्धा सुखी होईल.

परंतु हे काम तुम्हाला सेवा करण्याच्या आधी करायचे आहे म्हणजे दिवसाची सुरुवातच तुम्हाला याच कामाने करायची आहे तुम्ही जर स्वामींच्या केंद्रातून मठातून सेवा घेतली असेल आणि तुम्हाला एखादे काम सांगितले असेल की रोज दिवसाची सुरुवात ह्या कामाने करायची पण जर का तुम्ही कोणाचे ऐकून व्हिडिओच्या माध्यमातून सेवा करत असाल तुमच्या इच्छेने सेवा करत असाल जर तुम्हाला या कामाची माहिती नसेल तर दिवसाची सुरुवातच या कामाने करा.

नंतर दिवसभर तुम्हाला जे करायचे ते करा आता हे काम काय आहे आणि कसं करायचं मित्रांनो जेव्हा तुम्ही उठतात तेव्हा सकाळी आंघोळ वगैरे करून काहीच न करता काहीच न खाता पिता तांब्यात पाणी घ्या तांब्या कोणताही असला तरी काही हरकत नाही आणि त्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद एक चिमुटभर कुंकू थोडी अक्षद आणि फुले टाका.

ते पाणी घेऊन तुमच्या घराच्या बाहेर जा किंवा टेरेसवर जा आणि सूर्याच्या दिशेने म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहून आपल्या डोक्याच्या वर सरळ दिशेने तांब्या धरायचा आहे आणि तांब्यातील पाणी एका धारेमध्ये खाली सोडायचं आहे आणि सूर्य असेल तर त्या पाण्याच्या धारेमधून सूर्य देवाचे दर्शन घ्यायचे आहे.

पाणी सोडता सोडता अकरा वेळेस तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः असे म्हणत म्हणत हळूवार पाणी सोडायचे आहे सूर्यदेव म्हणजेच सुर्य हा ग्रह आपल्या पत्रिकेत सर्वोच्च स्थानावर असतो या उपायांमुळे आपल्याला कोणतेही दोष होत नाही पीडा होत नाही आणि आपले जीवन सुखी होते आणि यानंतर आपण कोणत्याही देवाची सेवा केली तरी ती लाभदायक असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular