Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकदुःख काय आहे व ते का होते.? त्याला कसे संपवावे.?

दुःख काय आहे व ते का होते.? त्याला कसे संपवावे.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आपल्या सर्वांच्याच मागे काही दुःख असते. पण सर्व कोणत्या ना कोणत्या कारणाने दुखी असतो. असा विचार कधीच करत नाही दुःख काय आहे? का होते व त्याला कसे संपवावे.? जर कोणाला विचारले जातील दुःख काय आहे असे सांगत असे असतात की, या जगामध्ये दुःखच दुःख आहे. आपले उत्तर नाही. म्हणून आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेणार आहोत.

एकदा स्वामी महाराज व त्यांचे काही भक्त काशी विचारणा करीत असताना. एका जंगलातून जात असतात. बराच वेळ या जंगलातून जात असताना एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबतात. त्या झाडाखाली एक वेगळ्याच प्रकारची शांती. या शांती मध्ये या सर्व जण खूप शांक्तपणे विश्रांती घेत होते. त्यावेळी अचानक पणे त्यांच्यातील एका भक्ताने स्वामींना प्रश्न केले की, “स्वामी मला एक प्रश्न विचारायचा आहे! मी विचारू शकतो का?”

त्यावेळी स्वामी म्हणले, “विचार की!” त्यावेळी ते म्हणाले, “स्वामी मी जेव्हा केव्हा तुम्हाला बघतो तुम्ही कायम प्रसन्न असतात. तुमच्या मनात कधीही दुःख नसते. आणि तुमच्या या असल्याला चेहऱ्यामुळे आम्हाला दुःख नाही. तुमचे हे असणारी मुख पाहून आमचं मन प्रसन्न होते. पण जेव्हा आम्ही तुम्हाला भेटायचे होतो त्याच्या आधी मला खूप दुःख होते. हे दुःख काय असते आणि हे दुःख का येते?”

स्वामी हसले व म्हणाले, “दुःख हे एका व्यर्थ विचारापेक्षा काही नाही.” यावर सगळे अाश्चर्या होतात व स्वामी म्हणतात, “स्वामी विचार तर येतच राहतात आणि ते जातात देखील. परंतु दुःख एकदा आले तर, ते लवकर जातच नाही.” त्यावर स्वामी हसतात व सर्वांना म्हणतात, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.!! ऐका, एक शेट असतो व त्याचा एक इमानदार नोकर असतो. त्या नोकरावर त्याचा पूर्ण विश्वास असतो. कारण तो आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करत असतो.

एके दिवशी काही कामासाठी शेठ बाहेर गावी जातो व त्या बाहेर गावावरून परत येत असताना एक किमती वस्तू तो घेऊन येतो. ती किमती वस्तू आपला खोलीत खूप चांगल्या पद्धतीने सजवून ठेवतो. आणि नोकराला सांगतो की, “या वस्तूची तुला खूप काळजी घ्यायचे आहेत. ती खूप किमती वस्तू आहे.” तो हा बोलतो, आणि त्याची काळजी घेऊ लागतो. एके दिवशी नोकर साफ-सफाई करत असतो.

त्यावेळी ही तो त्या किमती वस्तूंची देखील साफसफाई करण्यासाठी जातो. आणि साफसफाई करत असताना चुकून त्याच्या हातून ती वस्तू खाली पडते व तुटते. हे त्या शेटला समजते. समजल्यावर शेट खूप नाराज होतो. खूप चिडतो, ओरडतो आणि त्याला धमकी देतो. कारण तो त्याला कामावरून काढू शकत नव्हता. कारण तो खूप जुना होता व प्रामाणिकपणे आपले काम करत होता.

त्या दिवशी रात्री शेटला ती किमती वस्तू तुटल्याचा कारणाने झोप लागत नाही. पण तो बाहेर येऊन बघतो. तर, नोकर खूप छान पद्धतीने झोपला होतात. यावर तो एक युक्ती सुचवतो आणि दुसऱ्या दिवशी त्यां नोकराला म्हणतो, “अरे मी ही वस्तू तुझ्यासाठी आणली होती. परंतु ही वस्तू आता तुटली.” असे म्हटल्यावर त्या नोकराला खूप वाईट वाटते. ते आपल्यासाठी एवढी किमती वस्तू आणली होती. परंतु ती वस्तू आपल्याकडूनच तुटली.

या विचाराने तो खुप दुःखी होतो. आणि त्या रात्री शेट मात्र खूप छान झोपतो. नोकराला झोपच लागत नाही. यावरून असे समजते की, दुःख हे फक्त आपल्या विचारांवर अवलंबून असते. आपण त्याच गोष्टींचा विचार करत असतो ती जी गोष्ट आपल्याला कधीही मिळणार नाही. परंतु जी गोष्ट आपल्यासाठी असते त्या गोष्टीचा जास्त विचार करतो. आणि त्या मध्ये आपल्याला आपल्या वाटेला दुख येते. याची आपल्याला कल्पना असावी. ती वस्तू काही कालांतराने आपल्या कडुन जाते. नंतर ती आपल्यासाठी नसते. म्हणून तिचा जास्त विचार करून दुःखी होऊ नये आणि हे दुःख हे काल्पनिक असते आणि ते आपल्या विचारात असते.

टिप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं हे पेज लाइक करा..!! तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेयर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular