Sunday, June 9, 2024
Homeआध्यात्मिकघटविसर्जन करताना या चूका कदापि करु नका.. जाणून घ्या योग्य मुहुर्त आणि...

घटविसर्जन करताना या चूका कदापि करु नका.. जाणून घ्या योग्य मुहुर्त आणि पद्धत.!!

नमस्कार मित्रांनो आमच्या मराठमोळ्या पेज वर तुमचं स्वागत आहे.!! मित्र-मैत्रिणींना 26 सप्टेंबर 2022 रोजी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे त्याचबरोबर अखंड दिवा देखील लावलेला आहे ज्यावेळी आपण गटाची स्थापना करतो. त्यावेळी नारळ, सुपारी, विड्याची पाने, फुले त्याचबरोबर कलश पुजण्यासाठी तांब्या अशा बऱ्याच वस्तू घेतलेले आहेत. आणि आपण गटाची स्थापना केलेली आहे. आजच्या लेखामध्ये आपण घटविसर्जनाचा मुहूर्त घट विसर्जन कसे करायचे. आणि घटविसर्जन करत असताना कोण कोणत्या चुका आपल्या हातून व्हायला नाही पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये आज आपण घेणार आहोत.

ज्यावेळी आपण घटस्थापना केली त्यावेळी गणपती म्हणून सुपारी ची पूजा केलेली होती. आणि घटाजवळ आपल्या कुलस्वामिनी चा फोटो किंवा टाक पुजलेला आहे. त्यासोबतच घटदेखील स्थापन केलेला होता व अखंड दिवा लावलेला होता. या सगळ्याचीच आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करायची आहे. ही पूजा करत असताना सगळ्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. त्यानंतर फुले व्हायचे आहेत. अक्षदा टाकून दिवा अगरबत्ती ओवाळ आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्यांची प्रथम पूजा करून घ्यायची आहे. कारण नऊ दिवसांसाठी आपल्या घरामध्ये साक्षात जगत माता विराजमान झालेला आहे.

माता जगदंबा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी विराजमान असतातच. मात्र दसऱ्यामध्ये जो आपण देवीच्या नावाने घट बसलेला आहे. त्या घटाचे आपण विसर्जन करणार आहोत. या नऊ दिवसांमध्ये आपल्या हातून कळत नकळत ज्या काही चुका झालेल्या आहेत. त्या चुकांबद्दल माफ करण्यासाठी आपण आईला म्हणजेच जगदंबा मातेला सांगायचे आहे. त्यांची माफी मागायची आहे. आणि मातेचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहण्यासाठी म्हणून मातीला विनंती देखील करायची आहे. आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करा. असे म्हणून मनोभावाने आणि श्रद्धेने पाया पडायचे आहे. देवीला प्रार्थना करायची आहे. नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या ज्या माळा आपण देवीला अर्पण केलेले आहे.

त्यातील एखादा फुल घ्यायचा आहे. आणि ते फुल आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून जगदंबा मातेचा आशीर्वाद अखंड आपल्यावर राहील. आणि आपण गणपती म्हणून गणपतीची मूर्ती किंवा मूर्ती नसल्यास सुपार पुजलेली आहे. ही सुपारी उत्तर दिशेला ठेवायचे आहे. कुणाच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा कोणाच्या घरामध्ये कलश स्थापन केलेला असेल कलश किंवा घट पाच वेळेला उचलून उत्तर दिशेला थोडा थोडा सरकवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही घट हलवू शकता. आणि माता जगदंबेला म्हणायचं आहे की यावर्षी जशी तुम्ही आमच्याकडून तुमची सेवा करून घेतला तसेच पुढच्या वर्षी देखील आमच्याकडून ही सेवा असंच करून घ्या.

वर्षभर तुमच्या आशीर्वाद आमच्यावर राहू द्या तसेच आमच्याकडून जमीन तशी तुम्ही सेवा करून घ्या. असे म्हणून पाया पडायचे आहे. आणि घटस्थापना करतेवेळी आपण घटाच्या खाली जे काही तांदूळ घातलेले आहे. ते तांदूळ घ्यायचे आहे. आणि त्या तांदळाची खीर बनवून त्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी तो प्रसाद म्हणून थोडा थोडा खायचा आहे. जे घाटामध्ये धान उगवून आलेले आहे ज्या वेदिका मध्ये जे धान्य उगवलेले आहे ते स्त्रियांनी ज्या पद्धतीने आपण आपल्या केसांमध्ये फुल माळतो, गजरा माळतो. त्या पद्धतीने ते धान्य आपल्या केसांमध्ये माळायचे आहे. व पुरुषांनी आपल्या खिशामध्ये ते धान्य ठेवायचे आहे किंवा टोपी घालत असाल तर टोपी मध्ये ते तुरे घालून टोपी घालायची आहे.

याने यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील त्यानंतर जी शिल्लक राहिलेले धान्य आणि वेदिका आहेत. त्या शेत असेल तर त्या ठिकाणी त्याचे विसर्जन करायचे आहे. शेत नसेल तर तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये देखील विसर्जित करू शकता. जर तुम्हाला त्याचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे नसेल, तर तुम्ही कोणत्याही झाडाच्या खाली ते ठेवू शकता. ज्यावेळी आपण घट हलवतो तो घट उत्तर दिशेला थोडासा सरकवायचा आहे. त्यानंतर तो घट घरातील प्रत्येक सदस्यांनी आपल्या प्रत्येकाच्या मस्तकाला लावायचा आहे. त्यानंतर आपण फुले विड्याची पाने घेतलेली होती. ते सर्व आपल्या घरापासून जवळ असलेल्या नदी किंवा विहिरीजवळ जी निर्माण्य आहे.

त्या निर्मला मध्ये टाकून द्यायचे आहे. नसेल तर एक खड्डा काढून त्या खड्ड्यांमध्ये सर्व घालून ते पुरायचा आहे. किंवा तुम्ही कोणत्याही झाडाखाली ते ठेवू शकता. आता प्रश्न असा येतो. की घट पुसताना आपण जो कलश घेतलेला होता. त्या कलशा मधले पाणी कोठे व त्याचे किंवा त्या पाण्याचे काय करायचे. तर ते पाणी तुळशीला किंवा इतर कोणत्याही झाडाला पोचू शकता. शक्यतो ते पाणी तुळशीलाच घालायचे आहे. नवरात्रीमध्ये आपण जो नऊ दिवस अखंड दिवा लावलेला आहे. त्यामध्ये जी आपण वात लावलेली असते ती वात बऱ्यापैकी शिल्लक राहिलेली असते. ती शिल्लक राहिलेली वात आपण विजवायची नाही.

ती स्वतःहून शांत होईपर्यंत तशीच तेवत ठेवायचे आहे. त्यानंतर जी शिल्लक राहिलेली वात आहे. ती कोणत्याही झाडाच्या खाली खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये ती वात घालायची आहे. आणि तो खड्डा बंद करायचा आहे. आणि आपण जी देवीची ओटी भरलेली आहे. ते सौभाग्याचे अलंकार म्हणून स्वतः वापरले तरी चालते. किंवा एखाद्या गरीब स्त्रीला ते दान केले तरी चालते. घटाचे विसर्जन कोणत्या वेळी करायचे आहे. तर कुणी घटाचे विसर्जन नवमी दिवशी करते तर कुणी दशमी दिवशी करत असते. घटाचे विसर्जन करत असताना 4 ऑक्टोंबर मंगळवारच्या दिवशी दोन वाजून एकवीस मिनिटांनी दशमी स्थिती सुरू होते.

म्हणजेच काय तर दुपारपर्यंत नवमी आहे. ज्यांच्या घरामध्ये नवमी दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. त्यांनी दुपारपर्यंत घटाचे विसर्जन करून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही दसऱ्या दिवशी देखील घटाची विसर्जन करू शकता. दसरा हा साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त आहे. त्या दिवशी देखील घटाचे विसर्जन करणे शुभ मानले जाते. दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही घटाचे विसर्जन करू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular