Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकनवरात्रामध्ये घराचे पावित्र्य टिकविण्यासाठी शिंपडा ही एक गोष्ट.. सुख समाधान भरभराट लाभेल.!!

नवरात्रामध्ये घराचे पावित्र्य टिकविण्यासाठी शिंपडा ही एक गोष्ट.. सुख समाधान भरभराट लाभेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो नवरात्रीमध्ये आपले घर पवित्र रहावे, प्रसन्न रहावे, घरामध्ये आनंद शांतता राहावी, हे सगळ्यांनाच वाटत असते. कारण आता तर सणवार सुरू झाले आहेत आणि सनवारामध्ये कटकटी भांडण घरात नको व्हायला पाहिजे याची चिंता सगळ्यांना असते. परंतु मित्रांनो भांडण कटकटी या नाही पण झाल्या तरी घरामध्ये ती पवित्रता प्रसन्नता आणि समाधान नसतेच.

यासाठी काय करावे? तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की नवरात्र सुरू होण्याआधीच आपण घराची स्टाफ सफाई करत असतो, घर चांगले धूत असतो आणि साफसफाई करून घर स्वच्छ करत असतो. पण मित्रांनो ते घर पवित्र होते का? प्रसन्न होते का? समाधानी होते का? घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते का? तर याचे उत्तर आहे नाही. तर मित्रांनो आता तर नवरात्र सुरू झाली आहे. माता आपल्या घरात विराजमान झाली आहे.

तर आता तुम्ही घरामध्ये ही एक गोष्ट नक्की शिंपडा. मित्रांनो ही एक गोष्ट खूप सोपी गोष्ट आहे. यासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तूंची गरज आहे. एक तर गोमूत्र आणि दुसरी हळद. आता तुम्हाला या दोन्ही गोष्टी एकत्र मिश्रित करायचे आहे. म्हणजे तुम्हाला एका वाटीमध्ये गोमूत्र घ्यायचे आहे त्यामध्ये एक दोन चिमूटभर हळद ची पावडर टाकायची आहे. जे आपण स्वयंपाकात वापरत असतो ती पावडर एक-दोन चिमूट आपल्याला गोमूत्रामध्ये टाकायचे आहे आणि त्याला व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचे आहे.

हळद गोमूत्रामध्ये व्यवस्थितरित्या मिश्रित करायची आहे आणि ते झाल्यानंतर ते गोमूत्र तुम्ही संपूर्ण घरामध्ये शिंपडावे. तुमच्या देवघरात अवश्य शिंपडावे कारण देवघर अत्यंत प्रसन्न हवे. नंतर सगळ्या रूममध्ये तुम्ही शिंपडावे. घराच्या बाहेरून सुद्धा तुम्ही शिंपडू शकता. भिंतीवर आणि व्यवस्थित कोपऱ्यांमध्ये सुद्धा ते शिंपडावे कारण कोपऱ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्त असते.

टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा हळद मिश्रित गोमूत्र नक्की शिंपडावे. याने घर स्वच्छ पण होईल पवित्र पण होईल आणि शुद्ध नक्कीच होईल. तर मित्रांनो गोमूत्र आणि हळदीचे हे मिश्रण नवरात्र मध्ये तुमच्या घरात नक्की शिंपडा. याने लगेच तुमच्या घरात चमत्कार व्हायला सुरू होतील, म्हणजे पवित्रता कायम राहील आणि प्रसन्न वातावरण पण घरात टिकून राहील. तर मित्रांनो हे अवश्य करून बघा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular